Chanakya Niti : आचार्य चाणक्य हे कुशल राजनितीज्ञ होते. त्यांचे जन्मनाव विष्णुगुप्त होते. चणक नावाच्या आचार्याचे ते पुत्र असल्याने त्यांचे नाव चाणक्य असे पडले. ते एक महान विद्वानांपैकी एक होते. त्यांच्या नीतीशास्त्रासाठी ते ओळखले जातात. अनेक लोक त्यांच्या नीती फॉलो करतात. आचार्य चाणक्य यांनी राजकारण, व्यवसाय, आणि वैयक्तिक जीवनाविषयी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. माणसाने आयुष्य कसं जगावं, यावर आधारित त्यांच्या नीती आहेत. त्यांनी सांगितलेल्या गोष्टी व्यक्तीला आयुष्य जगताना मदत करतात.

चाणक्य यांच्या मते काही गोष्टी गुपित ठेवायला पाहिजे. काही गोष्टी आपण कधीही कोणालाही सांगून नये. चाणक्य सांगतात की आपण काही गोष्टी कधीच कुणाला सांगू नये, यामुळे आपल्याला त्रास होऊ शकतो. त्या गोष्टी कोणत्या, हे आज आपण जाणून घेऊ या.

वैयक्तिक आयुष्याविषयी सांगू नये (Personal Things)

चाणक्य सांगतात की कधी चुकूनही कुणाला आपल्या वैयक्तिक आयुष्याविषयी सांगू नये. विशेषत: पती पत्नीने आपल्या नात्यातील चढ उतार कधीच कुणाजवळही शेअर करू नये. या अत्यंत वैयक्तिक गोष्टी नेहमी गोपनीय ठेवाव्या. इतर कोणालाही तुम्ही या गोष्टी सांगितल्या तर ते लोक भविष्यात याचा गैरफायदा घेऊ शकतात. त्यामुळे वैयक्तिक बाबींवर कधीही चर्चा करू नये.

गुप्त दानाविषयी कुणालाही सांगू नये. (Secret Donation )

दान हे सर्वश्रेष्ठ असते. त्यामुळे आपण केलेले दान हे कधीही कुणालाही सांगू नये. चाणक्य नीतीनुसार, जर तुम्ही एखादे गुप्त दान केले असेल तर त्याविषयी कुणालाही सांगू नये. दान करणे पुण्याचं काम आहे त्यामुळे या गोष्टी कुणालाही सांगू नये नाहीतर तुम्ही केलेले दान व्यर्थ जाईन.

खरे वय कुणालाही सांगू नये (Age)

चाणक्य नीतिच्या मते, खरे वय कुणालाही सांगू नये. असे केल्याने तुम्ही इतरांच्या तुलनेत आणखी निरोगी आणि तरुण दिसणार आणि कुणीही तुम्हाला कमकुवत समजणार नाही. त्यामुळे आचार्य चाणक्य सांगतात की कधीही कुणाला वय सांगू नये.

(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)