Chandra Gochar 2024 Date: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह त्याच्या ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतो. ज्योतिष शास्त्रानुसार चंद्र हा सर्वात वेगाने फिरणारा ग्रह मानला जातो. चंद्र एका राशीत सुमारे अडीच दिवस राहतो. अशा स्थितीत चंद्र कोणत्या ना कोणत्या ग्रहाशी जोडला जातो.ज्यामुळे शुभ किंवा अशुभ योग निर्माण होतात. दरम्यान, येत्या २५ डिसेंबर २०२४ रोजी चंद्र तूळ राशीमध्ये प्रवेश करणार असून चंद्राच्या या राशी परिवर्तनाने १२ राशींपैकी काही राशीच्या व्यक्तींना त्याचा शुभ प्रभाव पाहायला मिळेल.

चंद्राचे राशी परिवर्तन

मेष

mahakumbh 2025
आज महाकुंभमेळ्यातील शेवटचे अमृत स्नान! बुधादित्य योगामुळे ‘या’ ३ राशींचा होईल भाग्योदय, करिअर -व्यवसायात मिळेल भरपूर यश
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Saturn and Sun Yuti 2025
शनी-सूर्याची युती बक्कळ पैसा देणार; ‘या’ तीन राशीच्या व्यक्ती कमावणार पद, पैसा अन् मान-सन्मान
saturn transit 2025
येणारे ५६ दिवस शनी देणार गडगंज श्रीमंती; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींचे प्रेम संबंध अन् आर्थिक स्थिती सुधारणार
Shani Gochar 2025
फेब्रुवारी महिन्यात शनि देव बदलणार चाल, ‘या’ तीन राशींचे धनी होणार! मिळणार धन-संपत्ती आणि ऐश्वर्य
seven Navpancham Yog
तब्बल ५५९ वर्षानंतर निर्माण होतोय सात नवपंचम राजयोग, ‘या’ तीन राशींची होईल चांदीच चांदी! धन लाभ अन् भाग्योदय होण्याचा प्रबळ योग
Mars Gochar 2025
पुढील ५७ दिवस मंगळ देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींचे भाग्य चमकणार
february 2025 grah gochar budh surya mangal gochar
फेब्रुवारीमध्ये ‘या’ ४ राशींची होईल चांदीच चांदी! अचानक धन लाभ अन् भाग्योदय होण्याचा प्रबळ योग

मेष राशींच्या व्यक्तींसाठी चंद्राचे राशी परिवर्तन लाभदायी सिद्ध होईल. आयुष्यात धनलाभ होईल. अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील. कुटुंबीयात आनंदाचे वातावरण राहिल. या काळात आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील. कुटुंबीयांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. धार्मिक कामात मन रमेल. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. प्रेमसंबंध सुखमय होतील.

सिंह

सिंह राशीच्या व्यक्तींसाठी चंद्राचे राशी परिवर्तन खूप शुभ फळ देणारे ठरेल. या काळात तुम्हाला कुटुंबीयांची साथ मिळेल. या काळात तुमच्या आयुष्यात सुख-समृद्धी वाढेल आणि गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. जोडीदाराकडून आनंदी वार्ता मिळेल. कुटुंबीयांसोबत प्रवास घडेल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. तुमच्या मान-सन्मानात वाढ होईल.

हेही वाचा: २०२५ मध्ये ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार बक्कळ पैसा; अस्त बुध करणार मालामाल

कुंभ

कुंभ राशीच्या व्यक्तींसाठीही चंद्राचे राशी परिवर्तन अत्यंत फायदेशीर ठरेल. या काळात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. विद्यार्थ्यांसाठीदेखील हा उत्तम काळ आहे. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल आणि त्यांच्यासोबत पिकनिकचा प्लानदेखील कराल. कुटुंबीयांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. समाजात मान-सन्मान वाढेल. भाग्याची पुरेपुर साथ मिळेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. तुमची आर्थिक चणचण दूर होईल.

(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)

Story img Loader