Chandra Gochar 2025 on Mahashivratri 2025: महाशिवरात्री हा हिंदू धर्मातील सर्वात खास सण मानला जातो. हा महादेव आणि पार्वतीला समर्पित दिवस असतो. पौराणिक कथेनुसार, या दिवशी शिव आणि पार्वतीचा विवाह केला जातो.
हिंदू पंचांगनुसार, फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तिथीला महाशिवरात्री सण साजरा केला जातो. या वर्षी महाशिवरात्री बुधवार २६ फेब्रुवारीला साजरा केली जाणार आहे
ज्योतिषशास्त्रानुसार, यंदाची महाशिवरात्री अत्यंत खास असणार आहे. कारण या दिवशी चंद्र देव धनिष्ठा क्षत्रामध्ये प्रवेश करणार आहे.
याचा काही राशींना खूप जास्त फायदा होऊ शकतो.
मेष राशी
या वर्षी महाशिवरात्री मेष राशीच्या लोकांसाठी अत्यंत शुभ ठरणार आहे. मेष राशीच्या लोकांचे चांगले दिवस सुरू होईल. करिअरशी संबंधित आनंदाची बातमी मिळेन. व्यवसाय करणाऱ्या लोकांना धनलाभ मिळू शकतो. कामाच्या ठिकाणी मान सन्मान मिळू शकतो. नोकरीमध्ये प्रमोशन मिळू शकते याशिवाय धनसंपत्तीशी संबंधित अडचणी दूर होतील. खर्चावर नियंत्रण ठेवावे. कुटुंबात मांगलिक कार्य संपन्न होऊ शकतात. अपत्याशी संबंधित शुभ वार्ता मिळू शकते.
कर्क राशी
या राशीच्या लोकांना या वर्षी महाशिवरात्री अत्यंत शुभ ठरणार आहे. या दिवशी कर्क राशीच्या लोकांना व्यवसायात नफा मिळेल. तसेच धनलाभाचे योग जुळून येईल. याशिवाय माता लक्ष्मीची कृपा दिसून येईल. जीवनात आनंद दिसून येईल. वैवाहिक जीवनात या लोकांना भरपूर आनंद मिळेन. नोकरी शोधणाऱ्या लोकांना चांगली संधी मिळू शकते. वैवाहिक आयुष्यात जोडीदाराचे सहकार्य लाभेन. अपत्य सुख प्राप्त होऊ शकते. शिवची या राशीवर विशेष कृपा दिसून येईल.
धनु राशी
धनु राशीशी संबंधित लोकांना या वर्षी महाशिवरात्री विशेष शुभ ठरणार आहे. या दिवशी करिअरमध्ये या लोकांना प्रगती दिसून येईल. नोकरी व्यवसायाशी संबंधित सर्व कामात यश मिळू शकते. विदेश यात्राचे योग दिसून येईल. कार्यक्षेत्रात या लोकांच्या कामाची प्रशंसा केली जाणार. वरीष्ठांचे सहकार्य लाभेन. आरोग्य उत्तम राहीन. कुटुंबात आई वडील किंवा मोठ्यांकडून आर्थिक सहकार्य लाभू शकते.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)