Moon Transit in Pisces: वैदिक ज्योतिषशास्त्रात चंद्राला विशेष महत्त्व दिले गेले आहे. चंद्र हा मनाचा कारक आहे आणि तो सर्वात वेगाने राशी आणि नक्षत्र बदलतो. चंद्राच्या राशी किंवा नक्षत्रातील बदलाचा लोकांवर शुभ किंवा अशुभ परिणाम होतो. वैदिक ज्योतिषशास्त्रात चंद्राला शुभ ग्रह मानले जाते. आज शुक्रवार, २५ एप्रिल रोजी शुक्रवारी पहाटे ०३:२५ वाजता चंद्राने कुंभ राशीतून निघून त्याच्या गतीनुसार मीन राशीत प्रवेश केला आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, चंद्राच्या राशी परिवर्तनामुळे काही राशींना मोठा लाभ होऊ शकतो. या राशींचे भाग्य उजळू शकेल. जाणून घेऊया त्या राशी कोणत्या आहेत?
‘या’ राशींना होणार धनलाभ?
मिथुन
चंद्र गोचरमुळे मिथुन राशीच्या लोकांना मोठा लाभ होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी दिलासादायक वातावरणामुळे तुम्ही आनंदी असाल. गुंतवणुकीसाठी हा काळ उत्तम ठरु शकतो. अचानक या राशीच्या लोकांना धनलाभ होऊ शकतो. उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळून बचत वाढू शकते. तुम्ही नवीन योजनांवर काम करु शकता. या राशीच्या लोकांच्या धन-संपत्तीत चांगली वाढ झालेली दिसून येऊ शकते. त्याचप्रमाणे तुम्हाला तुमच्या मुलाकडून एखादी शुभवार्ता ऐकायला मिळू शकते. तसेच, तुमच्या सुख-सुविधांमध्ये चांगली वाढ झालेली दिसून येऊ शकते.
कर्क
चंद्र ग्रहाची तुमच्यावर कृपादृष्टी असू शकते. या काळात तुमच्या कामाची प्रशंसा होऊ शकते. जे नोकरी करतात, त्यांच्या पगारात लवकरच वाढ होऊ शकते. विद्यार्थी यावेळी त्यांच्या करिअरमध्ये नवीन उंची गाठू शकतात. सरकारी नोकरीत काम करणाऱ्या लोकांची चांगल्या ठिकाणी बदली होऊ शकते. पदोन्नती आणि बढतीचे योगही आहेत. रखडलेली कामे मार्गी लागू शकतात. या काळात नफा वाढल्यामुळे बँक बॅलन्स वाढू शकतो. तुमचे संबंध मजबूत होऊ शकतात.
कन्या
कन्या राशीच्या लोकांसाठी हा काळ एखाद्या वरदानापेक्षा कमी नाही. नोकरी- व्यवसायात लाभाचे संकेत दिसत आहेत. नोकरीत प्रगतीचे नवीन मार्ग खुले होऊ शकतात. व्यापारात चांगले प्रस्ताव मिळण्याची शक्यता आहे. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते. जीवनशैलीतील बदलामुळे कौटुंबिक जीवन सुखकर होऊ शकतो. तुमचा पगार वाढवण्यात येणार असून पैसे कमवण्यात तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला मिळू शकतात. धनलाभाची शक्यता आहे. व्यापार- धंद्यात प्रगती होऊ शकते.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)