वर्षाचे पहिले चंद्रग्रहण १६ मे रोजी दिसणार आहे. हे चंद्रग्रहण भारतात दिसणार नसल्याने त्याचा सुतक कालावधीही वैध राहणार नाही. सुतक काळात अनेक गोष्टी करणे वर्ज्य आहे अन्यथा ग्रहणाचा जीवनावर नकारात्मक परिणाम होतो. मात्र, चंद्रग्रहण ही देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्याचीही चांगली संधी आहे. या दिवशी काही विशेष उपाय केल्यास धनाशी संबंधित सर्व समस्या दूर होऊ शकतात.
चंद्रग्रहणापूर्वी आंघोळ करून पिवळे वस्त्र परिधान करावे. नंतर उत्तरेकडे तोंड करून बसून ताटात कुंकूपासून स्वस्तिक किंवा ओम बनवावे. त्यानंतर त्यावर महालक्ष्मी यंत्र बसवावे. यानंतर दुसऱ्या ताटात शंख ठेवावा. त्यामध्ये मूठभर कुंकूमधले तांदूळ टाकावेत. तुपाचा दिवा लावा आणि नंतर स्फटिकांच्या हाराने ‘सिद्धि बुद्धी प्रदे देवी भक्ती मुक्ति प्रदायिनी’ या मंत्राचा जप करावा.
‘देवी महालक्ष्मी नमोस्तुते’ या मंत्राचाही जप करा. चंद्रग्रहण संपल्यावर ही संपूर्ण सामग्री नदी, तलाव किंवा वाहत्या पाण्यात टाकून द्या. या उपायाने देवी लक्ष्मी प्रसन्न होईल आणि धनप्राप्ती होईल.
१६ मे रोजी होणारे चंद्रग्रहण भारतात सकाळी ८ वाजून ५९ मिनिटे ते १० वाजून २३ मिनिटांपर्यंत राहील. हे संपूर्ण चंद्रग्रहण आहे पण ते भारतात दिसणार नाही. त्यामुळे त्याचा सुतक काळ मानला जाणार नाही. हे चंद्रग्रहण दक्षिण अमेरिका आणि उत्तर अमेरिकेच्या पूर्व भागांव्यतिरिक्त युरोप आणि आफ्रिकेच्या काही भागांमध्ये दिसणार आहे. यानंतर पुढील चंद्रग्रहण ८ नोव्हेंबर २०२२ रोजी होणार आहे.
(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)