३० एप्रिल रोजी सूर्यग्रहणानंतर १५ दिवसांनी म्हणजेच १६ मे राजी चंद्रग्रहण होणार आहे. या दिवशी वैशाखची पौर्णिमा आहे. असे मानले जाते की चंद्रग्रहण नेहमी पौर्णिमेच्या दिवशी होते. यावेळी लागणारे ग्रहण पूर्ण चंद्रग्रहण असेल. एवढेच नाही तर या दिवशी चंद्र लाल रंगात दिसणार आहे. त्यामुळे याला ब्लड मून असेही म्हणतात. ब्लड मून कोठे आणि केव्हा दिसेल ते जाणून घेऊया.
या वेळी १६ मे रोजी होणारे चंद्रग्रहण १५ मेच्या रात्री १० वाजून २८ मिनिटांनी सुरू होईल आणि १६ मे रोजी पहाटे १ वाजून ५५ मिनिटांपर्यंत राहील. यावेळी चंद्रग्रहण जगातील अनेक भागांत दिसणार असले तरी भारतात ते दिसणार नाही. १६ मे रोजी होणारे चंद्रग्रहण दक्षिण अमेरिका आणि उत्तर अमेरिकेच्या पूर्व भागात दिसणार आहे. त्याचवेळी, ते युरोप आणि आफ्रिकेच्या काही भागांमध्ये देखील पाहिले जाऊ शकते.
Chandra Grahan 2022 : यंदाचे चंद्रग्रहण ‘या’ राशींच्या लोकांसाठी ठरणार शुभ; मिळतील खूप फायदे
शास्त्रज्ञांच्या मते, चंद्रग्रहणाच्या वेळी चंद्रावर पूर्ण ग्रहण होते तेव्हा त्याला ब्लड मून म्हणतात. यामध्ये चंद्र पूर्णपणे लाल रंगाचा दिसतो. ही एक खगोलीय घटना आहे. जेव्हा पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येते आणि तिची सावली चंद्राच्या प्रकाशात अडथळा आणते तेव्हा चंद्रग्रहण होते. जेव्हा चंद्र पृथ्वीच्या जवळ येतो तेव्हा त्याचा रंग गडद लाल होतो. त्याला ब्लड मून म्हणतात.
१६ मे रोजी होणारे वर्षातील पहिले चंद्रग्रहण भारतात दिसणार नसल्याचे सांगितले जात आहे आणि चंद्रग्रहण भारतात दिसणार नसल्याने त्याचा सुतक कालावधी वैध नसावा. तसे, सुतक कालावधी चंद्रग्रहणाच्या वेळेच्या ९ तास आधी सुरू होतो. चंद्रग्रहण नेहमी पौर्णिमेच्या दिवशी होते आणि सूर्यग्रहण अमावस्येला होते.