वैदिक ज्योतिष शास्त्रात दिलेल्या माहितीनुसार, कोणत्याही ग्रहणाचा थेट परिणाम मानवी जीवनावर होत असतो. आज ८ नोव्हेंबरला चंद्रग्रहण होणार आहे. हे ग्रहण मेष राशी आणि भरणी नक्षत्रात होणार आहे. त्याचबरोबर या ग्रहणानंतर पाच ग्रहांच्या मार्गामध्ये बदल पाहायला मिळणार आहे. अनेक वर्षानंतर हा संयोग तयार होणार असून याचा परिणाम सर्व राशींवर दिसून येईल. मात्र, तीन राशींच्या लोकांना या काळात विशेष धनलाभ होण्याची शक्यता आहे.

वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, ११ नोव्हेंबरला धन आणि वैभवाचे देवता शुक्र ग्रह संकरण करणार असून १३ नोव्हेंबरला ग्रहांचा सेनापती मंगळ ग्रह आणि व्यापाराचा कारक बुध ग्रह संक्रमण करतील. यानंतर १६ नोव्हेंबरला ग्रहांचा राजा सूर्य राशी परिवर्तन करेल. तर, २३ नोव्हेंबरला गुरु ग्रह मीन राशीत मार्गी होईल. अशाप्रकारे नोव्हेंबर महिन्यात तब्बल पाच ग्रह संक्रमण करणार असून याचा मजबूत फायदा तीन राशींना होणार आहे. या राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया.

वृश्चिक राशीतील ‘त्रिग्रही’ योगामुळे ‘या’ राशींना होऊ शकतो आकस्मिक धनलाभ; कुटुंबियांनाही होईल फायदा

  • मकर

मकर राशींच्या लोकांसाठी या पाच ग्रहांमधील बदल विशेष लाभदायक सिद्ध होऊ शकतात. या काळात या लोकांना नोकरीचे नवे प्रस्ताव येऊ शकतात. तसेच ते आपले कुटुंबीय किंवा मित्रपरिवारासह फिरायला जाण्याची योजना आखू शकतात. व्यवसायात नवीन ऑर्डर्स मिळाल्यामुळे चांगला धनलाभ होण्याची संभावना आहे.

  • कुंभ

पाच ग्रहांच्या संक्रमणाचा कुंभ राशींच्या लोकांना खास फायदा होईल. त्याचबरोबर या लोकांना शेअर बाजारामध्ये फायदा होऊ शकतो. या काळात उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होण्याची संभावना आहे. तसेच या कालावधीत व्यवसायाचा विस्तारही होऊ शकतो. कार्यक्षेत्रात सहकाऱ्यांची मदत मिळू शकते.

१३ नोव्हेंबरनंतरचा काळ ‘या’ राशींसाठी ठरेल नाजूक; मंगळाच्या वक्री अवस्थेमुळे नातेसंबंधांमध्ये विघ्न येण्याची शक्यता

  • तूळ

नोव्हेंबर महिन्यात पाच ग्रहांमध्ये होणार बदल तूळ राशीच्या लोकांसाठी सकारात्मक सिद्ध होऊ शकतो. शुक्र ग्रहाच्या प्रभावामुळे या लोकांना नशिबाची साथ मिळण्याचे संकेत आहेत. तसेच या काळात रखडलेली कामे मार्गी लागू शकतात.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)

Story img Loader