सोमवार १६ मे २०२२ रोजी चंद्रग्रहण होणार आहे. हे वर्षातील पहिले चंद्रग्रहण असून ते वैशाख पौर्णिमेच्या दिवशी होईल. हे ग्रहण संपूर्ण चंद्रग्रहण असले तरी भारतात ते दिसणार नाही. त्यामुळे या ग्रहणाचा सुतक काळ ग्राह्य राहणार नाही. यानंतरही या ग्रहणाचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर राहील. १६ मे रोजी हे चंद्रग्रहण वृश्चिक राशीत होत आहे. याशिवाय या दिवशी विशाखा नक्षत्रही असेल. या चंद्रग्रहणाच्या दिवशी तयार होणाऱ्या ग्रह आणि नक्षत्रांचा संयोग ३ राशीच्या लोकांसाठी खूप शुभ सिद्ध होईल.

मेष :

या चंद्रग्रहणाची मेष राशीच्या लोकांवर कृपादृष्टी राहील. विशेषतः हा काळ त्याच्या करिअरसाठी खूप चांगला असेल. त्यांची प्रगतीही होईल आणि पैसाही मिळेल. नोकरी आणि व्यवसाय करणाऱ्यांसाठी ही स्थिती शुभ आहे. त्यांना सन्मान मिळेल. गुंतवणुकीसाठीही हा काळ उत्तम राहील.

गालावर खळी असणाऱ्या मुलींमध्ये असते ‘ही’ खास गोष्ट; देवी लक्ष्मीची असते विशेष कृपादृष्टी

सिंह :

सिंह राशीच्या लोकांसाठी हे चंद्रग्रहण खूप शुभ राहील. या लोकांना नोकरीमध्ये जोरदार लाभ मिळण्याची शक्यता आहे. त्यांना प्रमोशन मिळू शकते. उत्पन्न वाढू शकते. धनलाभ होईल.

धनु :

धनु राशीच्या लोकांवर चंद्रग्रहणाचा सकारात्मक परिणाम होईल. त्यांना प्रगतीच्या नवीन संधी मिळू शकतात. नोकरी करणाऱ्यांची प्रगती होईल, तर व्यावसायिकांना मोठी ऑर्डर मिळू शकेल. एकूणच, या लोकांवर संपत्ती आणि वैभवाचा खूप पाऊस पडेल. त्यांच्या सर्व आर्थिक समस्या दूर होतील.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)

Story img Loader