वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, चंद्र आणि सूर्य यांचे ग्रहण वेळोवेळी होत असतात, या ग्रहणांचा परिणाम मानवी जीवनावर आणि पृथ्वीवर दिसून येतो. अशातच आता ५ मे रोजी चंद्रग्रहण होणार आहे. चंद्र ग्रहणाच्या या दिवशीच बुद्ध पौर्णिमा आहे. हे चंद्रग्रहण तूळ राशीत आणि स्वाती नक्षत्रात होत आहे. त्याचबरोबर या दिवशी चतुर्ग्रही होत असून १२ वर्षांनी हा योग तयार होणार आहे. या दिवशी सूर्य, बुध, गुरु आणि राहूच्या चतुर्ग्रही योगात चंद्रग्रहण होत आहे. त्यामुळे या ग्रहणाला विशेष महत्त्व आहे. या ग्रहणाचा १२ राशींवर परिणाम होणार आहे. परंतु या राशींपैकी ३ राशी अशा आहेत ज्यांना या काळात धनलाभ होण्याची शक्यता आहे. तर त्या राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया.
मेष राशी –
मेष राशीतील लोकांसाठी चंद्रग्रहण शुभ सिद्ध होऊ शकते. यावेळी तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. तसेच नोकरदारांचे प्रमोशन होण्याची शक्यता आहे. शिवाय कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी मिळू शकते. दुसरीकडे व्यापारी वर्गाला चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. नवीन ऑर्डर मिळू शकतात. तसेच या काळात तुमच्या आत्मविश्वासात वाढ होऊ शकते तर अडकलेले पैसेही मिळू शकतात.
धनु राशी –
धनु राशीच्या लोकांसाठी चंद्रग्रहण अनुकूल ठरू शकते. या काळात तुमच्या इच्छा पूर्ण होऊ शकतात. यासोबतच तुमची आर्थिक स्थिती सुधारण्याचीही शक्यता आहे. तुम्हाला मुलांकडून काही चांगली बातमी मिळू शकते. तर घरात एखादा धार्मिक किंवा शुभ कार्यक्रम होण्याची शक्यता आहे.
सिंह राशी –
सिंह राशीसाठी चंद्रग्रहण फायदेशीर ठरू शकते. या काळात तुम्हाला अचानक पैसे मिळण्याची शक्यता आहे. शिवाय प्रेमप्रकरणात यशही मिळू शकते. ग्रहणाच्या काळात तुमच्या इच्छा पूर्ण होऊ शकतात. तसेच तुमचे उत्पन्न वाढण्याचीही शक्यता आहे. त्याचबरोबर भागीदारीतही यश मिळू शकते. तुमच्या योजना यशस्वी होऊ शकतात.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)