Chandra Grahan 2023 : उद्या वर्षातील पहिले चंद्रग्रहण होणार आहे. हे तूळ राशीत आणि स्वाती नक्षत्रात होणारे उपछाया चंद्रग्रहण असेल. तब्बल १३० वर्षांनंतर बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी चंद्रग्रहण होत आहे. सूर्यग्रहणाप्रमाणेच चंद्रग्रहणाचाही आपल्या जीवनावर मोठा प्रभाव पडतो. चंद्रग्रहणाबाबत लोकांमध्ये प्रचंड संभ्रम असला तरी, ते कुठे दिसणार? चंद्रग्रहणाची वेळ किती असेल? सुतक कालावधी असणार की नाही? असे अनेक प्रश्न लोकांच्या मनात आहेत. चंद्रग्रहणाशी संबंधित प्रत्येक महत्त्वाची माहिती सविस्तरपणे जाणून घेऊ या.
चंद्रग्रहण किती वाजता होईल?
वर्षातील पहिले चंद्रग्रहण शुक्रवार, ५ मे रोजी म्हणजेच उद्या होणार आहे. चंद्रग्रहण रात्री ८.४४ वाजता सुरू होईल आणि उशिरा १.०२ वाजता संपेल. चंद्रग्रहणाचा एकूण कालावधी ४ तास १५ मिनिटे आहे.
कुठे कुठे दिसणार चंद्रग्रहण?
वर्षातील पहिले चंद्रग्रहण युरोप, आशियातील बहुतांश भाग, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, पॅसिफिक, अटलांटिक, अंटार्क्टिका आणि हिंदी महासागरात दिसणार आहे. हिंदू पंचांगानुसार हे चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही.
चंद्रग्रहणात सुतक कालावधी असेल का?
सुतक कालावधी चंद्रग्रहणाच्या ९ तास आधी सुरू होतो. सुतक काळात मंदिरांचे दरवाजे बंद केले जातात आणि देवाची पूजा करण्यास मनाई आसते. मात्र, ५ मे रोजी होणारे चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही, त्यामुळे त्याचा सुतक कालावधीदेखील भारतात असणार नाही. तुम्ही पूजा करू शकता. तसेच जेवण, विश्रांती किंवा दैनंदिन कामांवर कोणतेही बंधन असणार नाही. गर्भवती महिलांनी कोणतेच नियम पाळण्याची गरज नाही.
हेही वाचा – २०२३ च पहिलं चंद्रग्रहण ‘या’ राशींना देणार धनरूपी चांदणं? बक्कळ धनलाभाने जीवन होऊ शकते सुखी
देशावर आणि जगावर काय परिणाम होईल?
चंद्रग्रहण हे भारतात होणार नसल्याने भारतीयांनी घाबरण्याची गरज नाही. मात्र पाश्चात्त्य देशांमध्ये समस्या वाढू शकतात. नैसर्गिक आपत्ती येण्याचीही शक्यता असते.
ग्रहण काळात लाभ कसा मिळेल?
ग्रहण काळात मंत्रजप, ईशस्तुती आणि ध्यान करणे विशेष फायदेशीर आहे. तुम्ही ‘ओम नमः शिवाय’ किंवा चंद्राच्या मंत्राचा जपदेखील करू शकता. या काळात केलेली उपासना निश्चितच स्वीकारली जाते. ग्रहणानंतर आंघोळ केल्यावर एखाद्या गरीब व्यक्तीला काहीतरी दान जरूर करा.
चंद्रग्रहणानंतर काय करावे?
चंद्रग्रहणानंतर पूजास्थळाची स्वच्छता करावी. पूजेच्या ठिकाणी गंगाजल शिंपडा. आंघोळ करून स्वच्छ कपडे घाला, यानंतर आपल्या देवाची किंवा भगवान शिवाची पूजा करा. त्यानंतर एखाद्या गरीब व्यक्तीला पांढरी वस्तू दान करा.
उपछाया चंद्रग्रहण म्हणजे काय?
उद्या होणारे चंद्रग्रहण हे उपछाया चंद्रग्रहण आहे. प्रत्येक चंद्रग्रहण सुरू होण्यापूर्वी चंद्र पृथ्वीच्या सावलीत प्रवेश करतो, ज्याला उपछाया म्हणतात. अनेकदा चंद्र पृथ्वीच्या सावलीत शिरतो आणि तिथून बाहेर येतो आणि त्याचे स्वरूप अस्पष्ट दिसू लागते. याला छाया चंद्रग्रहण म्हणतात. उपछाया चंद्रग्रहणाला धार्मिक महत्त्व दिलेले नाही, त्यामुळे त्यात सुतक काळही वैध नाही.