second lunar eclipse 2023 : खगोलशास्त्रात आणि ज्योतिषशास्त्रात ग्रहणाला खूप महत्त्व आहे. खगोलशास्त्रात ग्रहणाकडे वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिले जाते. वर्षभरात दोन चंद्रग्रहणे आणि दोन सूर्यग्रहणे अशी मिळून चार ग्रहणे असतात. यापैकी आत्तापर्यंत एक सूर्यग्रहण आणि एक चंद्रग्रहण झाले आहे. या वर्षीतील पहिले सूर्यग्रहण २० एप्रिल रोजी झाले आणि चंद्रग्रहण ५ मे रोजी म्हणजे वैशाख पौर्णिमेच्या दिवशी झाले. आता पुढील सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहणाची पाळी आहे. आत्तापर्यंत दोन ग्रहणे झाली पण यातील एकही भारतात दिसले नाही. यामुळे त्यांचा सुतक काळ विचारात घेतला गेला नाही. मात्र आता वर्षातील दुसरे आणि शेवटचे चंद्रग्रहण होणार असून ते भारतातही दिसणार आहे, तसेच याचे परिणामही दिसून येणार आहेत.
या वर्षातील दुसरे चंद्रग्रहण कधी असेल?
जेव्हा सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एका सरळ रेषेत असतात तेव्हा चंद्रग्रहण होते. या वर्षातील दुसरे चंद्रग्रहण रविवार २९ ऑक्टोबर २०२३ रोजी होणार आहे. हे वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण असून ते खूप खास असणार आहे, कारण संपूर्ण वर्षभर भारतात दिसणार्या सर्व ग्रहणांपैकी हे एकमेव ग्रहण असेल. हे चंद्रग्रहण भारतात दिसणार असल्याने त्याचा सुतक कालावधीही वैध असेल. २०२३ या वर्षातील दुसरे आणि शेवटचे चंद्रग्रहण भारतात २९ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री ०१.०६ वाजता सुरू होईल आणि ०२.०० वाजता समाप्त होईल. भारतातील या चंद्रग्रहणाचा एकूण कालावधी १ तास १६ मिनिटे असेल
या चंद्रग्रहणाचा सुतक कालावधी वैध
२९ ऑक्टोबर रोजी होणारे चंद्रग्रहण भारतात दिसणार असून त्याचा सुतक कालावधी हा भारतीयांसाठी वैध असणार आहे. वर्षातील हे शेवटचे ग्रहण असून युरोप, आशिया, ऑस्ट्रेलिया, पूर्वी अमेरिका आणि आफ्रिका या देशात दिसणार आहे.