या वर्षातील पहिले चंद्रग्रहण शुक्रवारी ५ मे रोजी होणार आहे. याच दिवशी बुद्ध पौर्णिमाही आहे. हे चंद्रग्रहण तूळ राशीत आणि स्वाती नक्षत्रात होणार असून ते रात्री ८ वाजून ४४ मिनिटांपासून ते मध्यरात्री १ वाजून २ मिनिटांपर्यंत राहणार आहे. या चंद्रग्रहणाचा कालावधी सुमारे ४ तास १४ मिनिटांचा असणार आहे. चंद्रग्रहणाचा सुतक कालावधी ९ तासांपूर्वी सुरू होतो, परंतु हे चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही, त्यामुळे त्याचा सुतक कालावधी येथे वैध ठरणार नाही. हे एक उपछाया चंद्रग्रहण आहे, याचा अर्थ या चंद्रग्रहणामध्ये पृथ्वीची सावली चंद्राच्या फक्त एका बाजूला राहते, त्यामुळे हे ग्रहण सर्व ठिकाणी दिसणार नाही. २०२३ वर्षातील पहिले चंद्रग्रहण तीन राशीच्या लोकांसाठी खूप शुभ असणार आहे. तर त्या भाग्यवान राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया.
मिथुन –
मिथुन राशीच्या लोकांना हे चंद्रग्रहण शुभ फळ देऊ शकते, या काळात तुमच्या कुटुंबात काही चांगली बातमी ऐकायला मिळू शकते, पण घाई टाळावी लागेल. तसेच तुमची आर्थिक बाजू भक्कम होऊ शकते. ग्रहणाच्या दिवशी एखाद्याशी मतभेद होऊ शकतात, त्यामुळे शांततेने काम करावी लागतील, तरच काही गोष्टी पूर्ण होऊ शकतात.
हेही वाचा- १५ मेपासून ‘या’ राशी होणार गडगंज श्रीमंत? सुर्यदेव वृषभ राशीत प्रवेश करताच मिळू शकतो प्रचंड पैसा
सिंह –
सिंह राशीचे लोक जे काही काम करतील त्यामध्ये त्यांना यश मिळू शकते. तसेच तुम्हाला धनलाभ होऊ शकतो. या काळात गुंतवणूक केल्यास भरपूर नफा मिळू शकतो. या काळात तुम्हाला चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. शिवाय कुटुंबातील सदस्यांशी बिघडलेले संबंध सुधारू शकतात. कष्ट केल्यास नक्की यश नक्की यश मिळू शकते.
मकर-
चंद्रग्रहणाच्या काळात मकर राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती मजबूत असू शकते. गेलेल पैसे परत मिळू शकतात तसेत करोडपती होण्याची शक्यता आहे. कष्ट केल्यास यश मिळू शकते. तसेच तुम्हाला पैसा मिळू शकतो. दीर्घकाळापासून नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना यश मिळू शकतो.
कन्या –
चंद्रग्रहणाच्या प्रभावामुळे कन्या राशीच्या लोकांच्या सर्व समस्या दूर होऊ शकतात. व्यवसायात मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. करिअरमध्ये फायदेशीर बदल दिसू शकतात. नवीन मालमत्ता खरेदी करु शकता. कुटुंबातील सर्वांचे आरोग्य उत्तम राहील तसेच नोकरदारांना प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे.
या ठिकाणी दिसणार चंद्रग्रहण –
वर्षातील पहिले चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही. हे चंद्रग्रहण युरोप, मध्य आशिया, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, अटलांटिक, हिंद महासागर आणि अंटार्क्टिका यांसारख्या ठिकाणी दिसणार आहे.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)