Chandra Grahan On Buddha Purnima: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार २२ एप्रिल २०२३ ला गुरु ग्रहाने मेष राशीत प्रवेश केला आहे. मेष राशीत आधीपासून राहुचा वास आहे. अशात मेष राशीत गुरु आणि राहुची युती झाली आहे. यामुळे तयार झालेला गजलक्ष्मी राजयोग काही राशींसाठी शुभ काळ घेऊन येऊ शकतो. अशातच आता मे महिन्यात चंद्रग्रहण आणि बुद्ध पौर्णिमा व गजलक्ष्मी राजयोग एकत्र जुळून आले आहे. ज्योतिष अभ्यासकांच्या माहितीनुसार असा सुवर्ण योग हा तब्बल १३० वर्षांनी जुळून आला आहे. या दुर्मिळ ग्रहस्थितीनुसार १२ राशींपैकी नक्की कोणाला लाभ व कोणाला कष्ट असे योग आहेत हे पाहूया..

चंद्र ग्रहणाला १२ राशींवर काय प्रभाव दिसणार? (Chandra Grahan Zodiac Signs Horoscope)

मेष रास (Aries Zodiac)

यावेळी तुमच्या आत्मविश्वासात चढ-उतार होऊ शकते, ज्यामुळे तुम्ही परिस्थिती आणि नातेसंबंधांमध्ये तुमची भूमिका ठरवण्यास असमर्थ होऊ शकता. तुमच्या आयुष्यातील वैभव आणि सकारात्मकतेचे कौतुक करण्यासाठी वेळ काढा. तुम्हाला स्वतःसाठी वेळ व पैसे दोन्हीची बचत करावी लागेल.

Shani Pluto Ardhakedra Yog
२२ जानेवारीला शनि-यम निर्माण करणार शक्तीशाली योग! ‘या’ ३ राशींचे नशीब पलटणार, अचानक होईल धनलाभ
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Mangal rashi parivrtan 2024
येणारे ७० दिवस मंगळ करणार कृपा; ‘या’ तीन राशींची होणार चांदी
Kark Rashi mata lakshmi
कर्क राशीमध्ये निर्माण होईल डबल लक्ष्मी राजयोग! ‘या’ ३ राशीचे भाग्य उजळणार, माता लक्ष्मीच्या कृपेने प्रत्येक काम मिळणार अपार यश
Rahu Shukra Yuti In Uttarabhadra Nakshatra
१८ वर्षांनंतर मित्र ग्रह शुक्र आणि राहूची युती! ‘या’ राशीच्या लोकांच्या नशीबाचे टाळे उघडणार, मिळेल अपार पैसा
In 17 days, these three zodiac signs will live a life of luxury and comfort
१७ दिवसांनी ‘या’ तीन राशी जगतील ऐशो-आरामाचे आयुष्य! शुक्र करणार मीन राशीत प्रवेश, नवीन नोकरीमुळे प्रगतीचा योग
The effect of the Sun's Mahadasha lasts for 6 years on a person
Surya Mahadasha: सूर्याच्या महादशेमुळे कोणत्या राशींचे नशीब चमकते करिअर अन् व्यवसाय? मिळते अपार धन-संपत्ती, ६ वर्षांसाठी राहतो प्रभाव
shani surya budha will make tigrahi yog 2025
Tirgrahi Yog 2025 : ५० वर्षांनंतरच्या त्रिग्रही योगामुळे ‘या’ राशींचे चमकणार नशीब! बुध, सूर्य अन् शनीच्या संयोगाने होतील गडगंज श्रीमंत, वाढेल मानसन्मान

वृषभ रास (Taurus Zodiac)

तुम्हाला ज्यांची काळजी आहे त्यांच्या गरजांवर लक्ष केंद्रित केल्याने तुम्हाला नातेसंबंध दृढ करण्यास मदत होईल. तुमच्या जवळचे लोक जे काही ना काही कारणाने संघर्ष करत आहेत त्यांच्यासाठी उपलब्ध राहिल्यास तुम्हाला आत्मीय समाधान लाभू शकते. तुम्हाला मानसिक सौख्य लाभून धनप्राप्तीसाठी नीट मेहनत घेता येईल.

मिथुन रास (Gemini Zodiac)

चंद्र ग्रहणाच्या दरम्यान प्रत्येक गोष्ट काळजीपूर्वक करावी. कामात घाई करू नका. अनपेक्षित समस्या टाळण्यासाठी तुमचे कान व डोळे सदैव उघडे ठेवा. सर्व तपशीलांवर लक्ष द्या. तुम्हाला गुंतवणुकीच्या रूपात धनलाभ होऊ शकतो पण बेजाबदारपणा करू नका.

कर्क रास (Cancer Zodiac)

तुमच्या क्रश किंवा एखाद्या आवडीच्या व्यक्तीसह रोमँटिक डेट वर जाण्याचा योग आहे. परिस्थितीला धीराने सामोरे जाल. भावनावश न होता व्यावहारिक दृष्टीने प्रश्न सोडवावे लागतील. सर्वच गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होतील अशी अपेक्षा ठेऊ नका.लाभ स्थानातील रवीचे भ्रमण मानसन्मान देईल. आर्थिक स्थिती सुधारेल. आत्मविश्वास बळावल्याने नव्याने आव्हान स्वीकाराल. जोडीदाराची साथ सोबत चांगली मिळेल.

सिंह रास (Leo Zodiac)

लाभ स्थानातील शुक्र आणि व्यय स्थानातील मंगळ यांमुळे अतिरिक्त खर्च कराल. प्रवास, यात्रा ,स्नेहसंमेलने यात सहभागी व्हाल. जोडीदाराची साथ मिळेल. कौटुंबिक प्रश्न हळुवार सोडवावे लागतील. मुलांना धीर द्याल. त्यांचा आत्मविश्वास वाढवाल. नोकरी व्यवसायात रवी साहाय्यकारी ठरेल. संतती प्राप्तीसाठी वैद्यकीय सल्ला घ्यावा. गुरुबल चांगले आहे. प्रयत्न यशस्वी होतील. आर्थिक नियोजन उपयोगी पडेल. ओळखीमुळे स्थावर मालमत्तेची कामे पुढे सरकतील.

कन्या रास (Virgo Zodiac)

नोकरीत बदल करू इच्छित असाल तर एप्रिलनंतरच्या मुलाखतीत यश मिळण्याची शक्यता दाट आहे. नव्या ठिकाणी इतरांवर आपल्या ज्ञानाची छाप पाडाल. कामासंबंधीत परदेशाशी निगडीत बाबी मार्गी लागतील. सध्या रवी, राहू , हर्षलसह गुरू ग्रह आहे. लक्षात ठेवा, सर्वगुणसंपन्न असे कोणीच नसते. विद्यार्थ्यांचे मन विचलित करणारे ग्रहयोग आहेत. उन्हाळी सर्दी, अपचन असे त्रास उद्भवतील.

तूळ रास (Libra Zodiac)

तुमची आर्थिक स्थिती तपासण्यासाठी ही चांगली वेळ आहे. चांगली बातमी अशी आहे की तुम्ही लवकरच प्रगती करू शकाल आणि तुमच्या परिस्थितीमध्ये सुधारणा करण्यासाठी कार्य करू शकाल.

वृश्चिक रास (Scorpio Zodiac)

षष्ठ स्थानात पाच ग्रह एकत्र आले आहेत. रवी, राहू, हर्षल, बुध आणि गुरू यामुळे आत्मविश्वास डळमळीत होईल. भाग्यातील मंगळ नीच असला तरी बुडत्याला काठीचा आधार नक्कीच देईल. नोकरी व्यवसायात अडीअडचणींचा सामना करत पुढे जावे लागेल. विद्यार्थी वर्गाने सावध राहावे. उच्च शिक्षणाची तयारी जोरदारपणे करता येईल. जोडीदाराच्या कर्तृत्वाचा अभिमान वाटेल.

धनु रास (Sagittarius Zodiac)

एकनाथ हवाहवासा वाटेल. तुम्हाला आवश्यक तितका वेळ घ्या, स्वतःसह घालवलेला प्रत्येक क्षण तुम्हाला प्रगतीच्या वाटेवर पुढे नेण्यास मदत करू शकतो. तुम्हाला वाडवडिलांच्या संपत्तीने समृद्ध होता येईल.

मकर रास (Capricorn Zodiac)

२१ एप्रिलला गुरूने चतुर्थातील मेष राशीत प्रवेश केला आहे. सध्या गुरू, राहू, हर्षल, रवी आणि बुध अशी पंचग्रही मेषेत आहे. मानसिक संतुलन साधणे कठीण जाईल. तोल जाऊ देऊ नका. आतापर्यंतचा संयम तसाच ठेवणे महत्वाचे आहे. नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी देखील आपल्या शब्दाने घोळ वाढू शकतो. विद्यार्थी वर्गाला मेहनातीसह चिकटीची देखील गरज भासेल. षष्ठातील शुक्र आर्थिक स्थिती सुधारेल. भरपूर धनसंपत्ती मिळेल.

कुंभ रास (Aquarius Zodiac)

आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात संतुलन शोधणे आव्हानात्मक असू शकते. तुम्ही कधीकधी तुमची बहुतांश ऊर्जा कामासाठी समर्पित करता. शांततापूर्ण आयुष्यासाठी कौटुंबिक संबंध मजबूत करण्यावर भर द्या.

हे ही वाचा<< १३९ दिवस शनीदेव ‘या’ राशींना देणार अचानक धनलाभ; ‘या; व्यक्तींच्या रूपात होऊ शकता कोट्याधीश

मीन रास (Pisces Zodiac)

द्वितीय स्थानातील पंचग्रहीमुळे कामाचा वेग कमी- अधिक होण्याची दाट शक्यता आहे. प्रलोभनांपासून स्वतःला दूर ठेवा. तत्कालीन लाभापेक्षा कायमस्वरूपी लाभ महत्वाचा असणार आहे, हे ध्यानात असू द्यावे नोकरीतील कामात अडथळे येतील. व्यवसायात नवी झेप घेताना विशेष काळजी घ्यावी. जोडीदाराला समजून घेणे आवश्यक! विवाहोत्सुक मंडळींनी जरा धीराने घ्यावे. संतान प्राप्तीसाठीचे प्रयत्न लांबणीवर पडतील.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

Story img Loader