Chandra Mangal Rashi Parivartan Yog : ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रह नक्षत्रांचे स्थान परिवर्तनाला विशेष महत्त्व आहे. याचा थेट परिणाम राशिचक्रातील १२ राशींवर दिसून येतो. ३० नोव्हेंबर रात्री १० वाजून ३१ मिनिटापासून अमावस्या तिथीची सुरूवात झाली आहे. चंद्र आणि मंगळ राशी परिवर्तनामुळे योग निर्माण झाला आहे. मंगळ आणि चंद्र सध्या कर्क राशीमध्ये विराजमान आहे. मंगळ आणि चंद्रामुळे निर्माण झालेल्या या योगचा फायदा काही राशींवर दिसून येईल. मंगळ चंद्र राशी परिवर्तनाचा योग डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला या राशींसाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मिथुन राशी

मंगळ आणि चंद्र राशी परिवर्तन योग मिथुन राशीच्या लोकांसाठी अत्यंत लाभदायक ठरणार आहे. नवीन गुंतवणूकीसाठी वेळ शुभ ठरणार आहे. जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर हा काळ शुभ आहे. व्यवसायात अपेक्षेपेक्षा जास्त लाभ होईल. भविष्याचा विचार करून तयार केलेली योजना फायद्याची ठरेन. भूमि-भवनच्या क्रय- विक्रयसाठी हा काळ उत्तम आहे.

हेही वाचा : Shani Gochar 2025 : २०२५ मध्ये शनीदेव ‘या’ राशींवर करणार धनवर्षाव! मीन राशीत परिवर्तन करताच मिळणार नवी नोकरी, पैसा अन् प्रसिद्धी

सिंह राशी

मंगळ आणि चंद्राच्या या शुभ संयोगाचा परिणाम सिंह राशीवर सुद्धा दिसून येईल. डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला या राशीच्या लोकांना मनासारखा लाभ होणार. करिअरच्या क्षेत्रात या राशींची प्रगती दिसून येईल. कोणत्याही नवीन प्रोजेक्टवर काम करण्याची संधी मिळू शकते. घर कुटुंबात कोणतेही मंगल कार्यक्रम आयोजित केले जाऊ शकतात. आर्थिक स्थिती उत्तम राहीन.

धनु राशी

आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा जास्त मजबूत राहीन. जर तुम्ही कोणाला पैसे दिले असेल ते तुम्हाला परत मिळू शकतात. कुटुंबाबरोबर वेळ घालवण्याची संधी मिळू शकते. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा जास्त मजबूत राहीन. नवी नोकरी मिळू शकते. व्यवसायात चांगला नफा होईल. कामाच्या ठिकाणी नवी डिल मिळू शकते. लव लाइफसाठी डिसेंबरचा पहिला आठवडा अत्यंत शुभ ठरणार आहे. .

हेही वाचा : Mangal Vakri 2024 : डिसेंबर महिन्यात ‘या’ तीन राशींना लागणार बंपर लॉटरी! मंगळ वक्रीमुळे संपत्तीत होईल प्रचंड वाढ अन् करियरमध्ये प्रगती

कुंभ राशी

चंद्र मंगळ राशी परिवर्तनामुळे निर्माण होणारा हा योग कुंभ राशीच्या लोकांसाठी अत्यंत लाभदायक ठरणार आहे. या वेळी अपूर्ण स्वप्न पूर्ण होईल. मानसिक आणि आर्थित समस्या दूर होतील. पगारात वाढ होईल त्यामुळे आर्थिक स्थिती सुधारू शकते. व्यवसायात मनासारखा लाभ मिळेन. धनलाभाचे योग दिसून येत आहे. उच्च शिक्षण घेण्याचा विचार करत आहेत.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)