Chandra Mangal Yog: ज्योतिष शास्त्रात चंद्राला विशेष महत्त्व आहे. वैदिक ज्योतिष्य शास्त्रामध्ये चंद्र हा सर्वात वेगवान ग्रह मानला जातो. तो एका राशीत सुमारे अडीच दिवस राहतो. कुंडलीतील चंद्राच्या स्थितीचा मानवी जीवनावर विशेष प्रभाव पडतो. मन, भौतिक वस्तू, प्रवास, सुख-शांती, धन-संपत्ती इत्यादींचा कारक चंद्र आहे. आता येत्या ११ डिसेंबरला सकाळी ६ वाजून ११ मिनिटांनी चंद्र वृश्चिक राशीत प्रवेश करत आहे. मंगळ आधीच वृश्चिक राशीत असल्याने ‘चंद्र मंगळ योग’ तयार होताना दिसतोय. दरम्यान चंद्र मंगळ योग तयार झाल्याने काही राशींच्या व्यक्तींना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. चला तर पाहूया कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी…
‘या’ राशींना होणार अपार धनलाभ?
मिथुन राशी
चंद्र मंगळ योग मिथुन राशींच्या लोकांसाठी लाभकारी ठरु शकतो. पैसे कमावण्याचे नवे मार्ग, नवीन स्रोत मिळू शकतात. वेगवेगळ्या कामामध्ये यश मिळू शकतो. या काळात आर्थिक परिस्थिती सुधारण्याची शक्यता आहे. मुलांकडून सकारात्मक बातमी मिळू शकते. बेरोजगारांना नवीन नोकरी मिळू शकते. नोकरदार लोकांना करिअरच्या दृष्टीने अनेक सुवर्ण संधी मिळू शकतात. वैवाहिक जीवनात पूर्वीपेक्षा जास्त आनंद मिळू शकतो.
(हे ही वाचा : तब्बल ५०० वर्षांनी ‘कुलदीपक राजयोग’ बनल्याने ‘या’ राशी होणार गडगंज श्रीमंत? २०२४ पासून मिळू शकतो बक्कळ पैसा )
सिंह राशी
सिंह राशीच्या मंडळींना चंद्र मंगळ योग बनल्याने सकारात्मक परिणाम मिळू शकतात. या काळात उपजीविकेच्या साधनांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. या कालावधीत तुम्हाला वेळोवेळी अनपेक्षित पैसे मिळू शकतात. करिअर आणि व्यवसायात तुम्हाला अनपेक्षित प्रगती मिळण्याची शक्यता आहे. नोकरदार लोकांना त्यांच्या इच्छित ठिकाणी पदोन्नती आणि बदली मिळू शकते. या काळात तुम्हाला आर्थिक बाबतीत खूप फायदा होऊ शकतो.
वृश्चिक राशी
वृश्चिक राशीच्या लग्न भावात चंद्र मंगळ योग तयार होणार आहे. त्यामुळे या राशींच्या लोकांच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे. या राशीच्या लोकांना अनपेक्षितपणे पैसे कमविण्याच्या संधी देखील मिळू शकतात. पैशाची बचत करण्यात यशस्वी होऊ शकता. परदेशात जाण्याचीही संधी मिळू शकते. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहण्याची शक्यता आहे.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)