श्रावण सोमवार व्रत 2022: श्रावण महिन्याला हिंदी धर्मात धार्मिक महत्त्व आहे. हा महिना अतिशय पवित्र मानला जात असून तो शंकराला समर्पित आहे. या महिन्यातच भगवान विष्णू चार महिन्यांसाठी निद्रा अवस्थेत जातात. तेव्हा महादेव या सृष्टीचे चक्र चालवतात. असे म्हटले आहे की श्रावण महिन्यात महादेवाची उपासना करण्याला महत्त्व असून हा काळ महादेवाला प्रसन्न करण्यासाठी उत्तम काळ आहे. त्यातही श्रावणातील सोमवार अधिक महत्त्वपूर्ण मानला गेला आहे. यावर्षी श्रावण महिना २९ जुलैपासून सुरु होईल आणि २७ ऑगस्टला समाप्त होईल. दरम्यान १ तारखेला श्रावणातील पहिला सोमवार असून दुसरा श्रावणी सोमवार ८ ऑगस्ट, तिसरा १५ ऑगस्ट, आणि चौथा श्रावणी सोमवार २२ ऑगस्टला असेल. या चार श्रावण सोमवारी उपवास ठेवण्यात येतील.

श्रावण सोमवार महत्त्व

पौराणिक कथेनुसार, पार्वतीने या महिन्यात उपवास करून भगवान शंकराला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी कठोर उपवास ठेवले होते. असं मानलं जातं की, या कारणामुळे हा महिना भगवान शंकराला अत्यंत प्रिय आहे. म्हणूनच, या महिन्यात भक्त शंकराच्या पिंडीवर पाणी अर्पण करतात. त्याचप्रमाणे, श्रावणाच्या या महिन्यात रुद्राभिषेक करणं देखील खूप फलदायी असल्याचं सांगितलं जातं. ‘सोमवार’ हा शब्द संस्कृत शब्द ‘सोम’ म्हणजे चंद्र या हिंदू देवता चंद्रापासून आला आहे आणि भगवान शिव त्यांच्या कपाळावर अर्धचंद्र धारण करतात म्हणून भगवान शिव ‘सोमेश्वर’ म्हणून ओळखले जातात.

Guru Nakshatra Gochar 2024
२८ नोव्हेंबरला गुरु बदलणार आपली चाल! ‘या’ राशीच्या लोकांच्या आयुष्यात येणार आनंद, मिळेल अपार धन
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Shani gochar 2025
पुढील १३४ दिवसांचा काळ कमावणार बक्कळ पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार प्रत्येक कामात यश
ग्रहांचा राजा सूर्य करणार शनीच्या नक्षत्रामध्ये प्रवेश
१९ नोव्हेंबरला होऊ शकतो या राशींचा भाग्योदय! ग्रहांचा राजा सूर्य करणार शनीच्या नक्षत्रामध्ये प्रवेश, प्रत्येक कामात मिळणार यश
14th November Daily Astrology in Marathi
१४ नोव्हेंबर पंचांग: वैकुंठ चतुर्दशीला मेष ते मीनपैकी कोणाच्या डोक्यावर असेल श्रीहरी व महादेवाचे कृपाछत्र; वाचा तुमचे राशिभविष्य
Malavya Rajyog
शुक्र निर्माण करणार मालव्य राजयोग! २०२५ मध्ये ‘या’ राशींचे नशीब पलटणार, करिअरमध्ये यशासह मिळणार अपार धन
jupiter retrograde 2024
५ दिवसांनंतर शनी-गुरू करणार कमाल; ‘या’ तीन राशींच्या दारी नांदणार लक्ष्मी

( हे ही वाचा: श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशी ‘या’ राशींना भोलेनाथांचा आशीर्वाद मिळेल; जाणून घ्या तुमचाही यात समावेश आहे की नाही)

भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी भक्त सोमवारचा उपवास करतात. यावेळी श्रावण महिन्यात ४ सोमवार येणार आहेत. हिंदू धर्मग्रंथानुसार श्रावण महिना अविवाहित महिलांसाठी महत्त्वाचा असतो, ज्यांना इच्छित जीवनसाथी मिळण्याची इच्छा असते त्यांच्यासाठी हा महिना लाभदायी ठरू शकतो. असे मानले जाते की जे लोक श्रावण सोमवारी उपवास करतात, भगवान शिव त्यांना सुख, आरोग्य, संपत्ती आणि इच्छित इच्छा पूर्ण करतात.

श्रावण सोमवार 2022 विधी

  • प्रत्येक सोमवारी लोकांनी लवकर उठून पवित्र स्नान करावे आणि चांगले स्वच्छ कपडे परिधान करावेत.
  • त्यानंतर भगवान शिव आणि देवी पार्वतीची मूर्ती ठेवा आणि दिवा लावावा.
  • पांढरी आणि लाल फुले, पांढरी मिठाई, पानासोबत इलायची आणि सुपारी, पाच फळे आणि पंचामृत (दूध, दही, मध, साखर आणि तूप यांचे मिश्रण) देवाला अर्पण करावे.
  • भक्तांनी भगवान शिव आणि देवी पार्वतीला वस्त्र आणि जनेयू अर्पण करणे आवश्यक आहे.
  • महिला भक्त देवी पार्वतीला शृंगार देखील अर्पण करू शकतात.

( हे ही वाचा: Shravan 2022: श्रावणाचा पवित्र महिना लवकरच सुरू होतोय; जाणून घ्या उपवासाच्या खास टिप्स)

  • शिव चालिसा पाठ करा आणि भगवान शिवआरतीचा जप करा.
  • भक्तांनी रुद्राक्षाच्या मणीवर महामृयंजय मंत्राचा १०८ वेळा जप करावा.
  • श्रावण सोमवारच्या दिवशी मंदिरात जाऊन शिवलिंगाला पंचामृताने अभिषेक करावा.
  • भक्तांनी शिवलिंगाला किमान ११ किंवा २१ बेलपत्र, भांग आणि धतुरा अर्पण करावा.
  • शक्य असल्यास लोकांनी अभिषेक करताना भगवान शिवाला गंगाजल अर्पण करावे.

श्रावणी सोमवारी जपायचा मंत्र

  • ओम त्रयंभकम जजमहे सुगंधीम् पुष्टीवर्धनम् उर्वरुकमिव बंधनं मृत्युोर मुखिया ममृतात्..!!
  • कर्पूर गौरम करुणावतारम् संसारसारम् भुजगाईंद्र हरम सदा वसंतम् हृदय अरविंदे भवम भवानी साहित्यम् नमामि..!!
  • ओम नमः शिवाय..!!

(येथे दिलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)