Chaturgrahi Yog 2023 October in Tula: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ऑक्टोबर महिना खूपच महत्त्वाचा असणार आहे. कारण या महिन्यात अनेक ग्रहांच्या चालीमध्ये मोठे बदल होणार आहेत. या महिन्यात अनेक ग्रहांच्या राशी बदलामुळे तूळ राशीत ‘चतुर्ग्रही योग’ तयार होणार आहे. हा योग १९ ऑक्टोबरला मंगळ, केतू, बुध आणि सूर्यदेवाच्या युतीमुळे बनणार आहे. हा योग बनल्याने काही राशींना धनप्राप्ती होण्याची शक्यता आहे. चला तर पाहूया कोणत्या आहेत या राशी…

‘या’ राशींना मिळणार धन योगाचा लाभ?

मिथुन राशी

चतुर्ग्रही योग मिथुन राशींच्या मंडळीसाठी लाभदायी ठरु शकतो. या राशीतील लोकांना आर्थिक लाभासह मानसिक सुखशांती लाभण्याची शक्यता आहे. या राशीतील लोकांचे कामाच्या ठिकाणी कौतुक केले जाऊ शकते. या काळात कुंटुबातील व्यक्तीकडून विशेष सहकार्य मिळू शकतो. धार्मिक कार्य करण्याची संधी मिळू शकते. या राशीतील लोकांना या काळात वेगवेगळ्या मार्गाने धनलाभ होण्याची शक्यता आहे.

budh uday 2024
आता नुसता पैसा; डिसेंबरपासून बुधाच्या प्रभावाने ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींच्या धनसंपत्तीत होणार वाढ
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Mangal Gochar 2024
पुढील १२९ दिवस मंगळ करणार मालामाल; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार बक्कळ पैसा अन् प्रत्येक कामात यश
guru and shukra yuti | Gaj Lakshmi Rajyog
Gaj Lakshmi Rajyog : मिथुन राशीमध्ये १२ वर्षानंतर निर्माण होणार गजलक्ष्मी राजयोग, या तीन राशींचे नशीब चमकणार, होणार आकस्मिक धनलाभ
shani surya gochar 2024 saturn Vakri and sun transit in vrishchik
सूर्य आणि शनि बदलणार आपली चाल, ‘या’ राशीच्या लोकांचे नशीब पलटणार, विलासी जीवनासह मिळेल अपार पैसा
Gajakesari Yoga
१६ नोव्हेंबरला निर्माण होणार शक्तीशाली गजकेसरी योग! ‘या’ राशींचे लोक जगणार आलिशान आयुष्य, नव्या नोकरीसह होईल धनलाभ
shani vakri 2024 saturn retrograde
शनिदेव ३० वर्षांनंतर मीन राशीत होणार वक्री, २०२५ पासून उजळणार ‘या’ राशींचे भाग्य; मिळेल भरपूर सुख अन् आर्थिक लाभ

(हे ही वाचा : ३० वर्षानंतर नवरात्रीला शुभ राजयोग घडल्याने ‘या’ राशींना होणार प्रचंड धनलाभ? शनिदेवाच्या कृपेने मिळू शकते अमाप संपत्ती )

कन्या राशी

कन्या राशीतील लोकांना चतुर्ग्रही योग बनल्याने या काळात नशिबाची उत्तम साथ लाभू शकते. जुन्या गुंतवणुकीतून चांगला फायदा होऊ शकतो. या कालावधीत महागडी वस्तू खरेदी करू शकता.  या काळात तुम्ही विदेशवारीला जाण्याचा विचारही करू शकता. मार्केटिंग आणि सल्लागार क्षेत्राशी संबंधित लोकांना या काळात सकारात्मक फळ मिळू शकते. या राशीतील लोकांची आर्थिक स्थिती या काळात मजबूत राहू शकते.

मकर राशी

चतुर्ग्रही योग बनल्याने मकर राशींच्या लोकांच्या जीवनात सुख-समृद्धी येऊन तुमच्या जीवनातील सुख-सुविधांमध्ये वाढ होऊ शकते. या राशीतील व्यावसायिकांना भरघोस नफ्याच्या संधी मिळू शकतात. मालमत्तेबाबत काही वाद सुरू असतील, तर त्यात तुम्ही जिंकूही शकता. या काळात तुमच्या जोडीदाराशी संबंध चांगले राहू शकते. उत्पन्नाचे नवे स्त्रोत निर्माण होऊ शकतात. एकंदरीत हा काळ तुमच्यासाठी चांगला जाऊ शकतो.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)