Chaturgrahi Yog In Meen: जोतिषशास्त्रामध्ये ग्रह, नक्षत्र, राशींना प्रचंड महत्त्व आहे. शास्त्रानुसार ग्रह-नक्षत्र एका ठराविक काळानंतर राशीपरिवर्तन करून त्रिग्रही आणि चतुर्ग्रही योग निर्माण करत असतात. मान्यतेनुसार, याचा परिणाम मानवी आयुष्यावरदेखील होत असतो. येत्या काही दिवसांत असाच एक राजयोग जुळून येणार आहे. आता लवकरच एक महत्त्वाची ज्योतिषीय घटना घडणार आहे. १४ एप्रिल रोजी बुध, शुक्र, शनी आणि राहू मीन राशीत एकत्र येतील, ज्यामुळे चतुर्ग्रही योग निर्माण होईल. हा विशेष योग काही राशींसाठी खूप शुभ संकेत घेऊन येत आहे. हा चतुर्ग्रही योग काही राशींना प्रचंड फायदा मिळवून देईल आणि त्यांच्या संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे; कोणत्या राशींना सुखाचे दिवस अनुभवायला मिळू शकतात ते जाणून घेऊया…
‘या’ राशींचे नशीब चमकणार?
वृषभ
चतुर्ग्रही योगाचा वृषभ राशीच्या व्यक्तींना खूप फायदा होऊ शकतो. या राशीतील मंडळीचं भाग्य चमकणार असून तुमच्या सर्व योजना पूर्ण होऊ शकतात. या राशीतील लोकांना अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. आरोग्याला जडलेले जुने आजार दूर होण्याची चिन्हे आहेत. या काळात तुम्हाला नोकरीत पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. तुमचे उत्पन्न वाढू शकते आणि तुम्ही मालमत्ता खरेदी करू शकता. या कालावधीत या राशीच्या लोकांना धनवान होण्याची संधी लाभू शकते. आई-वडिलांच्या रूपात तुम्हाला जुन्या गुंतवणुकीचा लाभ होऊ शकतो. या काळात आपल्याला भौतिक सुखाची प्राप्ती होऊ शकते. प्रेम जीवनातही आनंद राहू शकतो.
कर्क
चतुर्ग्रही योगाचा कर्क राशीच्या व्यक्तींना खूप लाभ होऊ शकतो. या कालावधीत या राशीच्या मंडळींचे नशीब उजळण्याची शक्यता आहे. या कालावधीत आपल्या मार्गातील अडथळे दूर होऊ शकतात. या कालावधीत प्रेमाचा वर्षाव अनुभवण्याची संधी मिळू शकते. आपली एखादी जुनी इच्छा पूर्ण होऊ शकते. विवाह इच्छुक मंडळींना आपल्या मनाप्रमाणे जोडीदार मिळू शकतो, जुन्या मित्रांची भेट होऊ शकते. तुम्हाला कामाच्या ठिकाणी पदोन्नती व पगारवाढीचा योग आहे. सर्व प्रलंबित कामं मार्गी लागू शकतात. तुम्हाला स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळू शकते.
कन्या
कन्या राशीच्या व्यक्तींसाठी चतुर्ग्रही योग शुभ ठरू शकतो. या राशीच्या लोकांना सुखाचे दिवस अनुभवता येऊ शकतात. हात घालाल त्या कामात यश मिळू शकते. तुम्हाला कामाच्या ठिकाणी प्रगतीचा व पगारवाढीचा योग आहे. माता लक्ष्मी अनपेक्षितपणे आपल्या दारी येऊ शकते. तुम्हाला शेअर बाजारातून काही अंशी लाभ होण्याची चिन्हे आहेत. आपण शक्य झाल्यास वाहन व प्रॉपर्टीमध्ये पैसे गुंतवू शकता, यातून तुम्हाला प्रचंड धनलाभ होऊ शकतो. आपल्याला माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळू शकतो.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)