Chaturgrahi yoga: ज्योतिषशास्त्रानुसार नवग्रह ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन करतात. त्यामुळे कोणत्या ना कोणत्या तरी ग्रहासोबत त्यांची युती होते. येत्या काही दिवसांत वृषभ राशीत अनेक ग्रहांची युती होणार आहे. १ मे रोजी गुरू ग्रहाने वृषभ राशीत प्रवेश केला होता; जो पुढील एक वर्ष याच राशीमध्ये उपस्थित असेल. मे महिन्यात वृषभ राशीत काही इतर ग्रहदेखील प्रवेश करतील; ज्यामुळे गुरू ग्रहासोबत त्यांची युती तयार होईल. मे महिन्याच्या शेवटी वृषभ राशीत चतुर्ग्रही योग निर्माण होणार आहे; ज्याच्या प्रभावाने काही राशींच्या व्यक्तींना अनेक फायदे होतील.
ज्योतिषशास्त्रानुसार वृषभ राशीमध्ये १ मे रोजी गुरू ग्रहाने प्रवेश केला. त्यानंतर ग्रहांचा राजा सूर्य १४ मे रोजी संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी वृषभ राशीत प्रवेश करील. त्याशिवाय १९ मे रोजी शुक्र ग्रहदेखील सकाळी ८ वाजून ५१ मिनिटांनी या राशीत प्रवेश करील. तसेच ३१ मे रोजी दुपारी बुध ग्रहदेखील या राशीत प्रवेश करील. ज्यामुळे वृषभ राशीत चतुर्ग्रही योग निर्माण होईल..
वृषभ
वृषभ राशीतच चतुर्ग्रही योग निर्माण होत असल्याने या राशीच्या व्यक्तींना हा काळ खूप लाभकारी सिद्ध होईल. या राशीच्या व्यक्तींना व्यवसाय, नोकरीसोबतच आर्थिक परिस्थितीतही सकारात्मक बदल पाहायला मिळतील. कुटुंबीयांसोबत आनंदाचे क्षण व्यतीत कराल. भावंडांसोबत सुरू असलेले वाद मिटतील आणि तुमच्या नात्यामध्ये गोडवा निर्माण होईल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींच्या मेहनतीचे कौतुक होईल. या काळात तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खूश असतील. नवीन नोकरी शोधणाऱ्यांना मनासारखी नोकरी मिळेल. आरोग्यही उत्तम राहील.
कर्क
कर्क राशीच्या अकराव्या घरात चतुर्ग्रही योग निर्माण होत आहे. त्यामुळे या राशीच्या व्यक्तींना आयुष्यात खूप नवे बदल दिसून येतील. त्यांची अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील. आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील. कुटुंबीयांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. प्रेमसंबंध सुखमय होतील. नवे लोक, नवे छंद यांच्याशी जोडले जाल. तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खूश असतील. करिअरमध्ये चांगली प्रगती होईल.
मकर
मकर राशीमध्ये पाचव्या घरात चतुर्ग्रही योग निर्माण होत आहे. त्यामुळे या राशीच्या व्यक्तींना अनेकदा कामांमुळे दूरचे प्रवास करावे लागतील. शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम असेल. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल. कुटुंबातही आनंदी आनंद असेल. त्याशिवाय तुम्ही त्यांच्यासोबत सहलीची योजनादेखील आखाल. नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. वरिष्ठांची मदत मिळेल. विद्यार्थ्यांसाठीही हा उत्तम काळ आहे. या काळात नोकरी-व्यवसायामध्ये यश मिळेल; तसेच बढतीही मिळेल.