Chaturmas 2024: ज्योतिषशास्त्रानुसार जुलैमध्ये सूर्य, बुध यांसारख्या काही महत्त्वपूर्ण ग्रहांचे राशी परिवर्तन झाले आहे. तसेच या महिन्यात १७ जुलै रोजी (आज) देवशयनी एकादशी आहे. देवशयनी एकादशीपासून भगवान विष्णू योगनिद्रेमध्ये जातात. या दिवसापासून चातुर्मासाला सुरुवात होते. या काळात शुभ कार्य करणे वर्ज्य मानले जाते. तसेच कार्तिक महिन्यातील देवउठनी एकादशीला भगवान विष्णू योगनिद्रेतून जागे होतात. कार्तिक एकादशीनंतर शुभ कार्यांना सुरुवात होते. यंदा १२ नोव्हेंबर रोजी कार्तिक एकादशी साजरी केली जाईल. १७ जुलै ते १२ नोव्हेंबरपर्यंतचा हा काळ काही राशींच्या व्यक्तींसाठी खूप खास असेल. या काळात त्या राशीच्या व्यक्तींवर श्री विष्णूचा आशीर्वाद असेल.

चार्तुमासाचा काळ या राशींसाठी शुभ (Chaturmas 2024)

वृषभ

Pune Metro passenger service
पुणे: गणेशोत्सवानिमित्त मेट्रो प्रवासी सेवेच्या वेळेत वाढ, मध्यरात्री पर्यंत प्रवासी सेवा सुरू ठेवण्याचा निर्णय
how does suiceide pod work
इच्छामरणासाठी तयार करण्यात आलेले ‘सुसाईड पॉड’ काय आहेत? हे मशीन कसे कार्य करते? याची चर्चा का होत आहे?
jupiter retrograde 2024 in cancer
गुरु वृषभ राशीत होणार वक्री! कर्कसह ‘या’ ३ राशींचे नशीब उजळणार; मिळणार अपार पैसा अन् पद-प्रतिष्ठा
Lottery draw 2030 houses of Mumbai Mandal of MHADA on September 13 was finally postponed Mumbai news
म्हाडाच्या मुंबई मंडळाची १३ सप्टेंबरची सोडत अखेर लांबणीवर; अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रियेला १५ दिवसांची मुदतवाढ
vinod tawde latest marathi news
भाजपची २ सप्टेंबरपासून देशव्यापी सदस्य नोंदणी, सरचिटणीस विनोद तावडे यांची घोषणा
Vakri Guru 2024
पैसाच पैसा! गुरू ग्रहाच्या प्रभावाने ९ ऑक्टोबरपासून ‘या’ तीन राशी होणार मालामाल
Shani transit 2024 Next 216 days earn money
पुढचे २१६ दिवस नुसता पैसा; शनीच्या कृपेने ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींचा होणार भाग्योदय
Jupiter Nakshatra Transit 202
८९ दिवसांपर्यंत गुरु देणार जगातील प्रत्येक सुख! ‘या’ राशीच्या लोकांच्या दारी येईल लक्ष्मी, मिळेल पैसाच पैसा

चार्तुमासाचा काळ वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी खूप लाभदायी सिद्ध होईल. या काळात तुमचा भाग्योदय होईल. मेहनत केलेल्या कामात हवे तसे यश मिळविता येईल. आर्थिक परिस्थिती उत्तम होईल. करिअर व व्यवसायात मनासारखे यश प्रस्थापित कराल. अडकलेले पैसे परत मिळतील. कुटुंबीयांसोबतचे संबंध अधिक दृढ होतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील.

मिथुन

मिथुन राशीच्या व्यक्तींनादेखील चातुर्मासाचा काळ खूप फायदेशीर ठरेल. या काळात अनेकदा कामामुळे दूरचे प्रवास करावे लागतील. कुटुंबातही आनंदी आनंद असेल. त्याशिवाय तुम्ही त्यांच्यासोबत पिकनिकचा प्लानदेखील कराल. समाजात मान-सन्मान वाढेल. स्पर्धा परीक्षेत यश मिळेल.

कर्क

कर्क राशीच्या व्यक्तींसाठीही चातुर्मासाचा काळ खूप खास असेल. या काळात भौतिक सुखाची प्राप्ती होईल. नवीन कार्य सुरू करण्यासाठी अनुकूल काळ आहे. वैवाहिक जीवन सुखमय असेल. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. करिअरमध्ये हवे तसे यश मिळेल.

कन्या

चातुर्मासाचा काळ कन्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ परिणाम देणारा ठरेल. या काळात समस्यांपासून सुटका होईल. ताणतणाव दूर होण्यास मदत होईल. मुलांकडून आनंदी वार्ता कानी पडतील. कन्या राशीच्या व्यक्तींची आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. समाजात मान-सन्मान प्राप्त होईल. कर्ज फेडण्यास मदत होईल. वाहन, मालमत्ता खरेदी करण्याची इच्छा पूर्ण कराल.

हेही वाचा: ७९ दिवस होणार धनप्राप्ती; मंगळ ग्रहाची उलटी चाल ‘या’ तीन राशीधारकांना करणार मालामाल

कुंभ

चार्तुमासाचा काळ कुंभ राशीच्या व्यक्तींसाठीदेखील खूप अनुकूल असेल. या काळात भौतिक सुखाची प्राप्ती होईल. नवीन कार्य सुरू करण्यासाठी अनुकूल काळ आहे. वैवाहिक जीवन सुखमय असेल. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील.

(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)