Daily Astrology in Marathi : १६ डिसेंबर २०२४ रोजी मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्ण पक्षातील प्रतिपदा तिथी आहे. प्रतिपदा तिथी सोमवारी दुपारी १२ वाजून २८ मिनिटांपर्यंत राहील. शुक्ल योग रात्री ११ वाजून २२ मिनिटांपर्यंत राहील. तसेच आर्द्रा नक्षत्र दुपारी १ वाजून १४ मिनिटांपर्यंत राहील. तर राहू काळ ७ वाजून ३० मिनिटांनी सुरु होईल ते ९ वाजेपर्यंत असेल. तर १२ राशींच्या आठवड्याची सुरुवात कशी होणार चला जाणून घेऊ…

१६ डिसेंबर पंचांग व राशिभविष्य (Aries To Pisces Horoscope Today in Marathi) :

मेष:- छोटे प्रवास घडतील. एखादी विशेष व्यवस्था करावी लागेल. समजुतीत बदल होण्याची शक्यता. मनात आकर्षण भावना वाढू शकते. दिवस मनाजोगा जाईल.

meen Rashi Bhavishya 2025 in Marathi
Pisces Yearly Horoscope 2025: २०२५ मध्ये ‘या’ राशीच्या मेहनतीचे होईल चीज! अनेक समस्यांमधून होईल सुटका; सोनल चितळेंकडून १२ महिन्यांचे राशिभविष्य जाणून घ्या
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
In 17 days, these three zodiac signs will live a life of luxury and comfort
१७ दिवसांनी ‘या’ तीन राशी जगतील ऐशो-आरामाचे आयुष्य! शुक्र करणार मीन राशीत प्रवेश, नवीन नोकरीमुळे प्रगतीचा योग
Rahu Mangal Gochar 2025
Rahu Mangal Gochar 2025 : १०० वर्षानंतर राहु आणि मंगळ बदलणार चाल, ‘या’ तीन राशी होणार मालामाल, मिळणार पैसाच पैसा!
8 january rashi bhavishya and panchang in marathi todays horoscope rashi mesh to meen aries to pisces zodiac signs
८ जानेवारी राशिभविष्य: अश्विनी नक्षत्रात होणार इच्छापूर्ती! तर‌ ‘या’ राशींवर धनवर्षाव, आज १२ पैकी कोणत्या राशीच्या कुंडलीत लिहिलंय सुख? वाचा तुमचे राशिभविष्य
Rahu Nakshatra Parivartan 2025
Rahu Nakshatra Parivartan 2025: राहु करणार शनिच्या नक्षत्रामध्ये प्रवेश, या चार राशींना येणार सोन्याचे दिवस, वाढणार बँक बॅलेन्स
5 January 2025 Rashi Bhavishya In Marathi ५ जानेवारी राशिभविष्य
5 January Horoscope: जानेवारीच्या पहिल्या रविवारी ‘या’ राशींना होईल धनलाभ, तर यांचा दिवस जाईल आनंदात; जाणून घ्या मेष ते मीन राशींचे आजचे भविष्य
Mangal Gochar 2025
Mangal Gochar 2025: १७ दिवसानंतर चमकणार ‘या’ तीन राशींचे नशीब, राजाप्रमाणे मिळेल सुख-संपत्ती अन् पैसा

वृषभ:- अचानक कौटुंबिक खर्च वाढू शकतो. घरात आनंदवार्ता मिळेल. दिवस चांगला जाईल. नवीन करार पूर्णत्वास जाईल. कौटुंबिक गोष्टीत दिवस जाईल.

मिथुन:- महत्त्वाच्या गोष्टीत जोडीदाराचा सल्ला घ्यावा. निकाल तुमच्या बाजूचा असेल. अचानक धावपळ करावी लागू शकते. घरात शिस्त बाळगाल. नातेवाईक भेटायला येतील.

कर्क:- तुमचे कौशल्य पणाला लावा. नोकरीत उत्साही वातावरण राहील. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. व्यावसायिक प्रगती करता येईल. प्रलंबित कामे मार्गी लावाल.

सिंह:- आपल्याला आवडणार्‍या गोष्टीत अधिक लक्ष घालाल. आत्मविश्वास वाढीस लागेल. वैवाहिक जीवन सुखमय असेल. मधुर वाणीने सर्वांची मने जिंकून घ्याल. मानसिक शांतता लाभेल.

कन्या:- आपल्यातील कालगुणांना वाव द्यावा. मात्र कौतुकाची फार अपेक्षा करू नका. समोरील जबाबदारी उत्तमरित्या पेलाल. एखाद्याकडून मदतीची अपेक्षा बाळगाल. नसत्या काळज्या करू नका.

तूळ:- आपले स्वत्व राखून बोलाल. बोलण्यात अधिकार वाणी ठेवाल. सामाजिक प्रतिष्ठा जपाल. एखादी भेटवस्तू मिळेल. मित्रांच्या मदतीने एखादी योजना आखाल.

वृश्चिक:- काही कामे उगाचच अडकून पडल्यासारखी वाटू शकतात. जुनी उधारी वसूल होईल. मन प्रसन्न राहील. दिवसभरात काहींना काही लाभ मिळेल. तज्ञ व्यक्तीचा सल्ला मोलाचा ठरेल.

धनू:- स्वत:वरील विश्वास कायम ठेवावा. व्यावहारिक फसणूकीपासून सावध रहा. काही समस्यांचे निराकरण होऊ शकते. कायदेशीर बाबीत सकारात्मकता दिसेल. कौतुकास पात्र व्हाल.

मकर:- अचानक धनलाभ संभवतो. आपल्या तत्वांना मुराद घालू नका. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. जोडीदाराशी क्षुल्लक गोष्टीवरून मतभेद होऊ शकतो. दिवसाचा उत्तरार्ध चांगला जाईल.

कुंभ:- वडीलधार्‍या व्यक्तींना नाराज करू नका. तुमचे संपर्क क्षेत्र वाढेल. जोडीदार तुमच्यावर खुश असेल. मित्रांचे भरपूर सहकार्य लाभेल. मानसिक प्रसन्नता लाभेल.

मीन:- जुनी कामे मार्गी लावाल. जोडीदाराशी संघर्ष टाळावा. विवाह विषयक बोलणी पुढे सरकतील. नोकरदारांना दिवस चांगला जाईल. सासुरवाडीची मदत मिळेल.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर

Story img Loader