Six Shubh Rajyog: ज्योतिषशास्त्रानुसार, १२ एप्रिल २०२५ हा दिवस खूप खास मानला जात आहे. कारण, या दिवशी हनुमान जयंती आणि चैत्र पौर्णिमादेखील आहे. तसेच या शुभ दिवशी काही खास राजयोग निर्माण होतील. ज्याचा काही राशींच्या व्यक्तींवर शुभ परिणाम पाहायला मिळेल. पंचांगानुसार, चैत्र पौर्णिमेच्या दिवशी पंचग्रही, लक्ष्मी-नारायण योग, बुधादित्य, शुक्रादित्य, मालव्य राजयोग निर्माण होणार आहेत. यासह चंद्र कन्या राशीत विराजमान असून वृषभ राशीतील गुरूची चंद्रवर दृष्टी असेल ज्यामुळे गजकेसरी राजयोग निर्माण होईल. त्यामुळे पौर्णिमेचा दिवस खूप खास निर्माण होत आहे.

‘या’ तीन राशींवर ग्रहांची विशेष कृपा

वृषभ (Tauras)

चैत्र पौर्णिमेचा दिवस वृषभ राशीसाठी खूप खास असेल. या दिवशी तुम्ही कुटुंबीयांसह उत्तम वेळ घालवाल. आयुष्यातील संकटांचे वादळ दूर होईल.आकस्मिक धनलाभ होईल. मनातील सर्व इच्छा-आकांक्षा पूर्ण होतील. या काळात आई-वडील आणि तुमच्या गुरूंचा आर्शीवाद तुमच्या पाठीशी असेल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना कामाच्या ठिकाणी सहकार्यांकडून मदत मिळेल. अचानक धनलाभ होईल. वैवाहिक जीवन सुखमय होईल. आयुष्यात सुख-शांती निर्माण होईल.

मिथुन (Gemini)

मिथुन राशीच्या व्यक्तींवर चैत्र पौर्णिमेच्या दिवशी ग्रहांची विशेष कृपा असेल. भाग्याची पुरेपुर साथ मिळेल आणि प्रत्येक क्षेत्रात यशही मिळेल. तुमच्या आत्मविश्वास वाढ होईल. या काळात नोकरीत हवे तसे यश मिळवाल. मनातील सर्व इच्छा-आकांक्षा पूर्ण होतील. या काळात आई-वडील आणि तुमच्या गुरूंचा आर्शीवाद तुमच्या पाठीशी असेल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना कामाच्या ठिकाणी सहकार्यांकडून मदत मिळेल. अचानक धनलाभ होईल. शत्रूंवर विजय मिळवाल.तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला मिळेल. पद-प्रतिष्ठेत वाढ होईल. जोडीदाराबरोबरचे नातेसंबंध अधिक गोड होतील.

मीन (Pisces)

मीन राशींच्या व्यक्तींसाठी हे राजयोग अत्यंत लाभदायी ठरतील. या काळात देवी लक्ष्मीची तुमच्यावर विशेष कृपा असेल. आयुष्यात सुखाचे क्षण येतील. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा सहज पूर्ण होतील. भाग्याची साथ पदोपदी मिळेल. व्यवसायात चांगला नफा मिळू शकतो. काळात अचानक धनलाभ, भौतिक सुखाची प्राप्ती होईल. अनेक दिवसांपासून अडकलेले कामही पूर्ण होण्यास मदत मिळेल. नात्यांमध्ये गोडवा निर्माण होईल. भावंडांकडून मदतीचा हात मिळेल.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)