Rahu- Ketu Gochar Effect in 2024: राहू- केतू हे मंदगतीने (वक्रगतीने) मार्गक्रमण करणारे ग्रह प्रत्येकाच्या जीवनावर चांगले वाईट परिणाम करीत असतात. दिनांक २८ ऑक्टोबर २०२३ रोजी राहू मीन राशीत तर केतूने कन्या राशीत प्रवेश केला होता. राहू गोचर होण्याआधी ज्योतिषतज्ज्ञ उदयराज साने यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे, शरद पवार अशा सर्व पक्षातील नेत्यांच्या राशिनुरूप त्यांच्यावर काय प्रभाव होणे अपेक्षित आहे याविषयी सविस्तर माहिती दिली होती.
मागील काही कालावधीत घडलेल्या राजकीय घडामोडी पाहता त्यातील अनेक अंदाज हे खरे होताना दिसत आहेत. १६ आमदारांच्या अपात्रतेवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिलेला निर्णय, शिवसेना कोणाची या मुद्द्यावरून शिंदेंच्या हाती आलेलं यश, अलीकडेच मिलिंद देवरा यांनी केलेला शिवसेना पक्षप्रवेश आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बहुचर्चित महाराष्ट्र दौरा या घटनांनी आता २०२४ च्या लोकसभा निवडणुकांच्या तयारीला सुद्धा वेग आला आहे. महाराष्ट्रातील या प्रमुख नेत्यांसाठी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत कोणत्या मोठ्या संधी उपलब्ध होतील व त्यासाठी त्यांना कोणाचे पाठबळ लाभेल याचा ज्योतिषीय अनुषंगाने घेतलेला हा आढावा..
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde Kundali)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कुंडलीतील राहू त्यांच्या मेष लग्नाच्या व्यय स्थानात येत असून, त्यांच्या मूळ कुंडलीतील राहुच्या दशमात येत आहे, त्यामुळे हा राहू त्यांना अतिशय चांगली फळे देणार आहे. त्यांच्या शिवसेनेतील काही नेते येणाऱ्या २०२४ लोकसभेत निश्चितपणे प्रवेश करतील. त्यांचा मूळचा राहू बलवान असल्यामूळे शत्रू पक्षातील नेते मंडळींचा बुद्धीभेद करण्यात त्यांना विलक्षण यश मिळेल.
उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar Kundali)
अजित पवार यांच्या कुंडलीत येणारा मीन राशीतील राहू, हा मूळ कुंडलीतील चंद्राच्या षडाष्टकात येत आहे. त्यांच्या मूळ कुंडलीत शनी-राहू केंद्र योगात आहेत. गोचर कुंभ राशीतील शनी हा रवीला ओलांडून मूळ कुंडलीतील बुधा च्या षडाष्टकातून जाणार आहे. मीन राशीतील राहू त्यांना संमिश्र असून, २०२४ च्या निवडणुकीत स्वतःच्या पक्षाच्या लोकांना नव्या लोकसभेत पाठवण्यासाठी त्यांनाही प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार असली तरी, राष्ट्रवादीतील फूट यामुळे चांगलीच स्पष्ट आणि ठळकपणे दिसून येईल. त्यांना गुरु ग्रहाची चांगली अनुकूलता असल्याने, त्यांच्या नव्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला लोकसभेत स्वतःचा उमेदवार आणणे शक्य होणार आहे.
हे ही वाचा<< उद्धव ठाकरेंचे अच्छे दिन कधी येणार? शिवसेनेचा निर्णय होण्याआधी ज्योतिष तज्ज्ञांनी केली होती भविष्यवाणी
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis Kundali)
फडणवीस यांच्या कुंडलीत मीन राशीतील गोचर राहूचे भ्रमण सप्तमस्थानातून होणार आहे. या राहू मुळे त्यांच्या मनस्थितीचा अंदाज इतरांना येणार नाही. त्यांच्या मूळ कुंडलीतील मंगळ-राहू षडाष्टक, राहू-नेपच्यून केंद्रयोग या महत्त्वाच्या योगामुळे ते राजकारणातील कमालीची गुप्तता पाळू शकतात. मीन राशीतील राहू निवडणुकीत यश मिळवून देण्यासाठी उपयोगी पडेल.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)