Eknath Shinde Kundali Astrology Before Loksabha 2024: लोकसभा निवडणूका सुरु होण्याआधीच महाराष्ट्र विधानसभेसाठी सुद्धा जय्यत तयारी सुरु झाली आहे. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी वेग धरत आहेत. अलीकडेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिल्लीत अमित शाह व महाराष्ट्रात एकनाथ शिंदेंची भेट घेतल्याने आता महायुतीला रेल्वेचं इंजिन लागणार अशाही चर्चा रंगत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड करून कमावलेल्या पदाची अडीच वर्षं पूर्ण होत असताना येत्या विधानसभा निवणुकीत मतांच्या बळावर पद राखून ठेवता येणार का याविषयी साहजिकच अनेक कयास राजकीय विश्लेषकांकडून बांधले जात आहेत. आज आपण याच जोडीने शिंदेंच्या पदरी मुख्यमंत्री पद पाडण्यासाठी ग्रह बळ साथ देणार का याविषयी ज्योतिषतज्ज्ञांचे मत जाणून घेऊया..

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एप्रिल २०२४ पर्यंत शिंदेंना त्रास आणि मग..

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कुंडलीत आलेल्या शुभ ग्रहांनी त्यांना अचानक मुख्यमंत्रीपद मिळवून दिले. पण आता त्यांच्या राशीत आलेल्या कुंभ राशीतील शनी- मंगळ युतीचा २३ एप्रिल २०२४ पर्यंत त्रास होणार आहे. साऱ्या समस्या सोडवताना, अनेकांची समजूत घालताना महायुतीतील अनेकांचे प्रवेश हे ग्रहांइतकेच त्रासदायक असतील. आपल्या आधीच्या पक्षातील लोकांच्या विरोधात उभे राहून यश मिळवणे हे इतके सोपे नाही. खासदार म्हणून हे नेते जेव्हा मतदारांच्या पुन्हा संपर्कात येतात तेव्हा त्यांनी केलेल्या बऱ्या वाईट कामाची पावती ही मतदार देणार असतो. पक्षप्रमुख म्हणून ही जबाबदारी स्वीकारताना या त्रासातून जाण्याची तयारी वेगळी करावी लागते. आता राहूच्या महादशेत शुक्राची अंतर्दशा संमिश्र फळ देईल पण राजकारणातील वर्चस्व कायम राखण्यास शिंदे यशस्वी ठरतील.

शिंदेंनी भूतकाळात रेंगाळण्यापेक्षा..

तसेच, परिवर्तन हे सर्व जीवनाचे मूळ आहे ते ज्यांच्यामध्ये रुजते तोच स्वत:मध्ये खरा बदल घडवू शकतो. भूतकाळामधल्या यशामध्ये रेंगाळण्यापेक्षा पुढच्या मोहिमेचा विचार करावा असा सुज्ञ सल्ला मकरेतील रवी-मंगळाने दिला आसावा तर पराक्रमातील गुरू-शुक्रासारख्या बुद्धिमान ग्रहांनी राजकारणातले डावपेच व वरिष्ठांशी सल्लामसलत करून राजकारणाची योग्य दिशा कशी ठरवावी हे सुचवले असेल, असे दिसते.

हे ही वाचा<< “उद्धव ठाकरेंचा घात करू शकतात ‘ही’ माणसं, जून २०२४ मध्ये..”, ज्योतिषतज्ज्ञांची मोठी भविष्यवाणी, लवकरच..

दुसरीकडे, शिवसेना पक्षाची कुंडली पाहिल्यास मंगळ, राहू, शनी अशा खडतर महादशांमधून प्रवास केल्यावर आता पक्षाच्या कुंडलीत बुधाची महादशा सुरु होत आहे. या महादशेत निश्चितच शिवसेनेचा प्रभाव पूर्ववत होऊन पुन्हा नव्या जोमाने वाटचाल सुरु होईल. साधारण जून २०२४ मध्येच या साऱ्या गोष्टी दिसू लागतील. शिवसेना नाव व चिन्हं सध्या शिंदेंकडे असल्याने पक्षाची भरभराट मुख्यमंत्र्यांच्या किती कामी येते हे पाहणे सुद्धा महत्त्वाचे ठरेल.

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm eknath shinde suffer trouble till april 2024 jyotishi ulhas gupte prediction during maha yuti discussions with mns raj thackeray svs