Shani Budh Yuti 2024: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह त्याच्या विशिष्ट वेळेनुसार संक्रमण करत असतात. प्रत्येक ग्रहाची दशा ही बदलत असते. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह विशिष्ट वेळी त्यांची राशी बदलतात आणि इतर ग्रहांशी युतीदेखील करतात. बुध ग्रहांचा राजकुमार आणि शनिदेव यांची युती होणार आहे. २० फेब्रुवारी, २०२४ रोजी सकाळी ०६:०७ वाजता, बुधदेव शनिच्या राशीत म्हणजेच कुंभ राशीत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे कुंभ राशीत शनिदेव आणि बुधदेव यांचा संयोग होईल. ज्योतिष शास्त्रात बुध आणि शनि यांचा हा संयोग खूप महत्त्वाचा मानला जातो. कारण शनि आणि बुध यांच्यात मैत्रीची भावना आहे. या युतीचा सर्व १२ राशीच्या लोकांवर मोठा प्रभाव पडेल. यापैकी ३ राशींच्या लोकांसाठी शनि आणि बुध ग्रहाचा योग अत्यंत फलदायी ठरु शकतो. जाणून घेऊया कोणत्या राशींच्या व्यक्तींना याचा लाभ मिळू शकतो.
‘या’ राशी होणार अपार श्रीमंत?
वृषभ राशी (Taurus)
बुध-शनिदेव यांच्या युतीमुळे वृषभ राशीच्या लोकांना खूप शुभ परिणाम मिळू शकतात. व्यवसायात प्रगती होण्याची शक्यता आहे. या लोकांच्या उत्पन्नात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित लोकांना यश मिळू शकतो.परीक्षा-स्पर्धेत यश मिळू शकेल. या काळात रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात. तुमचे घर आणि कुटुंब आनंदाने भरून जाण्याची शक्यता आहे. धार्मिक कार्यात रुची वाढू शकते. मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे.
(हे ही वाचा: मकर संक्रांतीपासून ‘या’ राशींचे शुभ दिवस होतील सुरु? सूर्यदेव शनिदेवाच्या लाडक्या राशीत गोचर करताच बदलू शकते भाग्य )
मिथुन राशी (Gemini)
बुध आणि शनिदेवाच्या संयोगामुळे मिथुन राशीच्या लोकांचे भाग्य उजळण्याची शक्यता आहे. कोणत्याही जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला प्रचंड फायदा मिळू शकतो. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. व्यवसायाशी संबंधित नवीन काम सुरू केल्यास काही दिवसांत यांचे चांगले परिणाम पाहायला मिळू शकतात. या काळात तुम्हाला व्यवसायात चांगला नफा मिळू शकतो. तुमच्या जोडीदाराचीही प्रगती होऊ शकते. सन्मान आणि प्रतिष्ठा देखील मिळू शकते.
मकर राशी (Capricorn)
बुध-शनिदेवाचा संयोग मकर राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतं. करिअर आणि बिझनेसमध्ये तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो. यश आणि आर्थिक लाभ दुप्पटीने मिळण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो. अविवाहित लोकांना विवाहाचा प्रस्ताव येऊ शकतो. जुन्या आजारातून आराम मिळू शकतो. या काळात आत्मविश्वास आणि धैर्यात वाढ होण्याची शक्यता आहे. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली होण्याची शक्यता आहे.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)