Shani Budh Yuti 2024: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह त्याच्या विशिष्ट वेळेनुसार संक्रमण करत असतात. प्रत्येक ग्रहाची दशा ही बदलत असते. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह विशिष्ट वेळी त्यांची राशी बदलतात आणि इतर ग्रहांशी युतीदेखील करतात. बुध ग्रहांचा राजकुमार आणि शनिदेव यांची युती होणार आहे. २० फेब्रुवारी, २०२४ रोजी सकाळी ०६:०७ वाजता, बुधदेव शनिच्या राशीत म्हणजेच कुंभ राशीत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे कुंभ राशीत शनिदेव आणि बुधदेव यांचा संयोग होईल. ज्योतिष शास्त्रात बुध आणि शनि यांचा हा संयोग खूप महत्त्वाचा मानला जातो. कारण शनि आणि बुध यांच्यात मैत्रीची भावना आहे. या युतीचा सर्व १२ राशीच्या लोकांवर मोठा प्रभाव पडेल. यापैकी ३ राशींच्या लोकांसाठी शनि आणि बुध ग्रहाचा योग अत्यंत फलदायी ठरु शकतो. जाणून घेऊया कोणत्या राशींच्या व्यक्तींना याचा लाभ मिळू शकतो.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा