Shukra-Shani Yuti: प्रत्येक ग्रह त्याच्या ठरलेल्या दिवशी राशीमध्ये बदल करतो. वैदिक ज्योतिष्यशास्त्रामध्ये शनि देवाला सर्वात संथ गतीने चालणारा ग्रह मानला जातो. शनिदेवाला सर्वात शक्तिशाली देवता मानलं जातं. शनिदेव आपल्या भक्तांना त्यांच्या कर्मानुसार फळ देतो. आता येत्या मार्चमध्ये शनिदेव आणि शुक्रदेवाची युती होणार आहे. ३० वर्षांनी ही युती कुंभ राशीत होणार आहे. ही युती अतिशय शुभ ठरणार असून काही राशींना याचा मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. शनि आणि शुक्रदेवाच्या कृपेने काही लोकांवर धनवर्षाव होण्याची शक्यता आहे. जाणून घेऊयात कोणत्या आहेत, या भाग्यशाली राशी…
‘या’ लोकांवर शनि-शुक्रदेवाची कृपा?
वृषभ राशी
शुक्र आणि शनिदेवाची कुंभ राशीतील युती वृषभ राशीच्या लोकांसाठी खूप फलदायी ठरु शकते. या राशीच्या लोकांच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होण्याची शक्यता आहे. या काळात तुमचा अडकलेला पैसा परत मिळण्याची शक्यता आहे. तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवीन स्रोतही निर्माण होऊ शकतात. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली होण्याची शक्यता आहे. या राशींच्या लोकांची त्यांच्या करिअरमध्ये खूप प्रगती होण्याची शक्यता आहे. या काळात अविवाहित लोकांचे लग्न ठरण्याची शक्यता आहे.
सिंह राशी
शुक्र आणि शनिदेवाचा हा संयोग सिंह राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर ठरु शकतो. या संयोगाच्या प्रभावामुळे काही लोकांना प्रमोशन मिळण्याचीही शक्यता आहे. काही चांगली बातमी कानावर येऊ शकते. मोठे पद आणि मान-सन्मानात वाढ होण्याची शक्यता आहे. माता लक्ष्मीच्या कृपेने तुम्हाला भरपूर संपत्ती मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायिकांसाठी हा काळ उत्तम ठरु शकतो. यावेळी गुंतवणूक करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरु शकते. प्रेमप्रकरणात अधिक गोडवा राहण्याची शक्यता आहे.
वृश्चिक राशी
शुक्र आणि शनिदेवाचा संयोग वृश्चिक राशींच्या लोकांसाठी खूप शुभ सिद्ध होऊ शकते. व्यापारी वर्गाला यावेळी मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. या राशीच्या लोकांना राजकारणात पुढे येण्याची संधी मिळू शकते. उच्च पद मिळण्याची आणि पगारात वाढ होण्याची शक्यता आहे. करिअरमध्ये सुधारणा होण्याची शक्यता आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर यश मिळण्याची शक्यता आहे. करिअरच्या प्रगतीसाठी जबरदस्त मार्ग उघडू शकतात. व्यवसाय करणाऱ्या लोकांनाही अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)