Sun And Mangal Conjunction: ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह वेळोवेळी गोचर करुन इतर ग्रहांशी युती करतात. ज्याचा मानवी जीवनावर आणि पृथ्वीवर परिणाम होतो. अशातच आता दोन मित्र ग्रह सूर्य आणि मंगळ यांची युती होणार आहे. ही युती १८ ऑक्टोबर रोजी होणार आहे. कारण १८ ऑक्टोबरला सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करणार आहेत तर मंगळ आधीच तूळ राशीमध्ये विराजमान आहे. अशा परिस्थितीत या दोन ग्रहांच्या युतीचा परिणाम सर्व राशींवर दिसून येणार आहे. परंतु ३ राशी अशा आहेत, ज्यांना या काळात अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो तसेच करियर आणि व्यवसायात प्रगती होऊ शकते. तर या भाग्यवान राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया.
कन्या रास
सूर्य आणि मंगळाची युती कन्या राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते. कारण हा योग तुमच्या राशीच्या संपत्तीच्या स्थानी तयार होणार आहे. त्यामुळे, या काळात तुम्हाला अनपेक्षित पैसे मिळू शकतात. तुमच्या बोलण्याचा प्रभाव वाढू शकतो,ज्यामुळे लोक तुमच्याशी जोडले जाऊ शकतात. नोकरदारांच्या या काळात ऑफिसमध्ये नवीन ओळखी होतील आणि त्यांच्या कामाचे कौतुक होऊ शकते. मीडिया, मार्केटींग आणि शिक्षण क्षेत्राशी संबंधित लोकांसाठी हा काळ फायदेशीर ठरू शकतो.
धनु रास
धनु राशीच्या लोकांसाठी सूर्य आणि मंगळाची युती अनुकूल ठरू शकते. कारण तुमच्या राशीतून उत्पन्न आणि लाभाच्या स्थानी ही युती तयार होत आहे. त्यामुळे या काळात तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होऊ शकते. तसेच उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. परदेशात जाण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना यश मिळू शकते. तुम्हाला जुन्या गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो. तुम्हाला तुमच्या मुलांकडून चांगली बातमी मिळू शकते.
सिंह रास
सूर्य आणि मंगळाची युती तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. कारण ही युती तुमच्या राशीतून तिसऱ्या स्थानी होत आहे. त्यामुळे या काळात तुमचे धैर्य आणि शौर्य वाढू शकते. तुम्ही शत्रूंवर वर्चस्व गाजवू शकता तसेच कुटुंबातील सदस्यांमधील एकता वाढू शकते. ज्यांचा व्यवसाय परदेशाशी संबंधित आहे त्यांच्यासाठी हा काळ शुभ सिद्ध होऊ शकतो. तसेच, या काळात तुम्हाला तुमच्या भावा-बहिणींचे सहकार्य मिळू शकते.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)