Conjunction Of Venus And Saturn Yuti 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, या वर्षी डिसेंबरच्या शेवटी दोन अनुकूल ग्रहांचा संयोग होणार आहे. शनी आणि धनाचा दाता शुक्र यांचा कुंभ राशीत संयोग होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, शनी आणि शुक्र या दोघांमध्ये मैत्रीची भावना आहे. अशा स्थितीत या दोन ग्रहांच्या संयोगामुळे काही राशींचे नशीब चमकू शकते. तसेच २०२५ च्या सुरुवातीला या राशींच्या व्यक्तींना अचानक आर्थिक लाभ होऊन, त्यांची प्रगती होण्याची शक्यता आहे. चला तर जाणून घेऊ कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी…

शनी- शुक्राच्या संयोगाने ‘या’ राशी होणार मालामाल (Venus And Saturn Yuti 2024)

मेष

शनी आणि शुक्र यांचा संयोग मेष राशींच्या व्यक्तींना फायदेशीर ठरू शकतो. या काळात मेष राशीच्या लोकांच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होईल. तसेच हा काळ तुम्हाला करिअरच्या दृष्टीने फलदायी ठरेल. या काळात तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये प्रगती साधता येईल. कामानिमित्त तुम्हाला फिरण्याची संधी मिळेल. या संधीचा तुम्हाला खूप फायदा मिळेल. या काळात उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. आर्थिक गुंतवणुकीतून नफा मिळण्याचीही शक्यता आहे.

Malavya Yoga and Kendra Trikon Rajyoga 2025
२०२५मध्ये ग्रहांचा अद्भुत संयोग! मीन राशीत निर्माण होईल केंद्र त्रिकोण-मालव्य राजयोग; नोकरीत होईल पदोन्नती, अचानक होईल आर्थिक लाभ
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Budh Margi 2024
बुध चालणार सरळ चाल, ‘या’ तीन राशींचे उजळणार नशीब; मिळणार अपार पैसा अन् धन
Shani-Mercury kendra drishti
२७ डिसेंबरपासून ‘या’ तीन राशींचे चमकणार भाग्य; शनी-बुधाची केंद्र दृष्टी देणार भरपूर पैसा
Mangal Rashi Parivartan 2024
४२ दिवसानंतर नुसता पैसा; मंगळाच्या राशी परिवर्तनाने ‘या’ तीन राशीच्या व्यक्ती होणार भाग्यवान
Shukra Nakshatra parivartan 2024
उद्यापासून पडणार पैशांचा पाऊस; शुक्राच्या नक्षत्र परिवर्तनाने ‘या’ तीन राशींना होणार भौतिक सुखाची प्राप्ती
Shani Budh Yuti 2025 astrology
Shani Budh Yuti 2025 : नवीन वर्षात सोन्याचा हंडा घेऊन लक्ष्मी ठोठावेल ‘या’ राशींच्या मंडळींचे दार? शनी-बुधाच्या संयोगाने होऊ शकाल लखपती
Shukra Budh Labh Yog
चार दिवसानंतर अचानक पलटणार या ३ राशींचे नशीब, शुक्र-बुधच्या लाभ दृष्टीचा दुर्मिळ योग

कुंभ

शनी व शुक्र यांच्या संयोगाने कुंभ राशीला फायदा होऊ शकतो. या काळात तुम्हाला सन्मान आणि प्रतिष्ठा मिळू शकते. याव्यतिरिक्त व्यवसायाचा विस्तार होईल आणि नवीन व्यावसायिक संबंध निर्माण होतील. उत्पन्न वाढेल आणि आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता आहे. विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन आनंदी राहील. भागीदारीच्या कामातूनही तुम्हाला लाभ मिळू शकतो. या काळात विवाहित लोकांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात.

हेही वाचा – Vastu Tips : घरात ‘या’ दिशेला चुकूनही लावू नका घड्याळ अन् आरसा, करावा लागेल भयंकर संकटाचा सामना! वास्तु शास्त्र काय सांगते वाचा

मिथुन

शनी आणि शुक्र यांचा संयोग मिथुन राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरू शकतो. या काळात तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. तुमचा आत्मविश्वासही वाढेल आणि तुमचे नेतृत्वगुण सुधारतील. नोकरीत प्रमोशन मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. विद्यार्थ्यांना करिअरमध्ये यश मिळेल. या काळात तुम्हाला नोकरी किंवा व्यवसायासाठी प्रवासाची संधी मिळेल.तुमच्या मनोकामना पूर्ण होऊ शकतात.

Story img Loader