Billionaire Signs Palmistry: हातावरून भविष्य ओळखणे हा ज्योतिषशास्त्राचा एक भाग आहे. वास्तविक यामागील तथ्य हे असतं की, एखाद्या माणसाच्या हातावरील चिन्ह किंवा हाताची ठेवण ही त्या माणसाचे स्वभाव गुण अधोरेखित करत असते. भविष्यात काय घडणार हे तुमच्या स्वभावावरच आधारित असल्याने हाताच्या रेषा, चिन्ह व ठेवण पाहून भविष्याचे वेध घेता यतात. आज आपण हस्तरेखा शास्त्रानुसार, हातावरील काही दुर्मिळ रेषांविषयी जाणून घेणार आहोत. असं म्हणतात की अगदी नशीबवान लोकांच्या हातावरच अशी चिन्हे असतात. आणि या मंडळींना वयाच्या चाळीशीत व पुढे राजयोग अनुभवता येऊ शकतो. ही मंडळी आयुष्यात नानाविध मार्गांनी इतके धन कमावतात की त्यांची गणना करोडपती, अरबपतींमध्ये होऊ शकते. ही चिन्हे नेमकी कोणती व ती तुमच्या हातात आहेत का हे जाणून घ्या..

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ज्या मंडळींच्या हातावर इंग्रजी अक्षर H चे चिन्ह असते त्यांची आयुष्याची सुरुवातीची वर्षे अत्यंत कठीण जाऊ शकतात. अनेकदा त्यांना लहानपण नीट सुखाने अनुभवता आलेले नसते. पण ४० व्या वर्षी त्यांचे नशीब अशी काही कलाटणी घेते की त्यांना अचानक व अनपेक्षित धनलाभ होऊ लागतो. यानंतर या मंडळींचे पूर्ण आयुष्यच बदलू शकते. आता लक्षात घ्या हे निशाण तुमच्या हाताच्या मध्यभागी असायला हवे. याची नाळ थेट हृदय, नशीब व माथ्याशी जोडलेली असते. म्हणजेच मानसिक शांती, आरोग्य व नशिबात येणाऱ्या संधी यावर हे निशाण प्रभाव टाकत असते.

हे ही वाचा<< शनीदेव आजपासून होणार पॉवरफुल! वक्री होत ‘या’ राशींच्या श्रीमंतीचा मार्ग करणार सरळ, देणार अपार समृद्धी

असं म्हणतात की तळव्याच्या मध्यभागी H हे निशाण असणाऱ्या मंडळींना त्यांचं पूर्वसंचिताचे फळ ४० व्या वर्षांपासून पुढे मिळत असते. अगदी सहज घेतलेला एखादा निर्णय त्यांचे आयुष्य बदलून टाकतो. त्यांच्या कामाच्या बळावर ते हळूहळू प्रगतीचा एक एक टप्पा पार करत असतात. या मंडळींना धनच नव्हे तर समाजातील मान- सन्मानाची सुद्धा कधी कमी भासत नाही. सुख सुविधांनी समृद्ध आयुष्य जगताना त्यांनी आपले पाय जमिनीवर असतील याची मात्र खात्री करावी.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Crorepati billionaire signs palmistry do you have these sign in middle of your palm that indicate huge money at the age of 40 svs