22 December Rashi Bhavishya : २२ डिसेंबर २०२४ रोजी मार्गशीष महिन्याच्या कृष्ण पक्षातील सप्तमी तिथी आहे. सप्तमी तिथी रविवारी दुपारी २ वाजून ३२ मिनिटांपर्यंत राहील. तर संध्याकाळी ७ वाजेपर्यंत आयुष्मान योग राहील. तसेच रविवारी दुपारी २ वाजून ३३ मिनिटांपर्यंत त्रिपुष्कर योग राहील. याशिवाय उत्तरा फाल्गुनी नक्षत्र सोमवारी सकाळपर्यंत ९ वाजून ९ मिनिटांपर्यंत राहील. राहू काळ ४ वाजून ३० मिनिटांनी सुरु होईल ते ६ वाजेपर्यंत असेल. तर आजचा दिवस १२ राशींसाठी कसा जाईल हे आपण जाणून घेऊया…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

२२ डिसेंबर पंचांग व राशिभविष्य :

मेष:- दिवस संमिश्र असेल. भविष्याची फार चिंता करू नका. नातेवाईकांशी मन मोकळेपणाने बोलाल. सकारात्मक विचारांची जोड घ्यावी. उगाचच निराश होऊ नका.

वृषभ:- जोडीदाराबरोबर प्रेमळ क्षण घालवाल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. आनंददायी अनुभव येतील. भागीदारीत फार विसंबून राहू नका. आजचा अंतिम निर्णय तुमचा असेल.

मिथुन:- आज कामाचा थकवा येईल. परंतु आळस झटकून कामाला लागावे. उगाच उदास होऊ नका. कोणावरही अति विश्वास ठेऊ नका. मतभेदाला बळी पडू नका.

कर्क:- उगाचच रेंगाळत बसून राहू नका. वेळेचा सदुपयोग करावा. एखादे चांगले पुस्तक वाचनात येईल. आवडता छंद पूर्ण करता येईल.

सिंह:- मनात शंकेला थारा देऊ नका. सकारात्मक गोष्टींचा विचार करावा. शैक्षणिक अडचणी दूर होतील. काही नवीन खरेदी करता येईल. घरात टापटीप ठेवाल.

कन्या:- जवळच्या ठिकाणाला भेट द्याल. प्रवासाचा सुखद अनुभव घ्याल. दुचाकी वाहन जपून चालवावे. शंकेचे समाधान करून घ्याल. नसते साहस दाखवायला जाऊ नका.

तूळ:- मोकळ्या स्वभावाने लोकांचे मन जिंकाल. लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. जुन्या कामातून लाभ संभवतो. इच्छे विरुद्ध प्रवास करावा लागू शकतो. कौटुंबिक गैरसमज टाळावेत.

वृश्चिक:- अति संवेदनशीलता दाखवू नका. वाईट गोष्टींकडे लक्ष वेधले जाईल. सारासार विचार करण्यावर भर द्यावा. आपलेच मत खरे कराल. नवीन मार्गांचा विचार कराल.

धनू:- आजचा दिवस सामान्य असेल. भावांकडून मदत मिळेल. कोणावरही विसंबून राहू नका. खर्चावर नियंत्रण ठेवावे. मोहाळा बळी पडू नका.

मकर:- आपल्या क्षमतेचा योग्य वापर करावा. खरेदी करताना सावध राहावे. मौल्यवान वस्तु सांभाळाव्यात. सामाजिक स्तरावर कौतुक केले जाईल. प्रवासात काळजी घ्यावी.

कुंभ:- कार्यालयीन कामात गोंधळ उडू शकतो. चित्त स्थिर ठेवावे. कामात वडीलांचे सहकार्य मिळेल. व्यवसायिकांनी नवीन धोरण आखायला हरकत नाही. एकावेळी अनेक कामे हाताळू नका.

मीन:- भाग्याची चांगली साथ मिळेल. नवीन गुंतवणूक करता येईल. त्यातून चांगला नफा मिळेल. नातेवाईकांची भेट आनंद देणारी असेल. आध्यात्मिक प्रगती करता येईल.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daily astrology in marathi on 22nd december aries to pisces which zodiac signs get good news in work and love life asp