Mesh To Meen Horoscope Today : १५ एप्रिल २०२४ रोजी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील द्वितीया तिथी आहे. द्वितीया तिथी सकाळी १० वाजून ५६ मिनिटांपर्यंत राहील,त्यानंतर तृतीया तिथी सुरू होईल. विशाखा नक्षत्र रात्री ३ वाजून ११ मिनिटांपर्यंत जागृत असेल. तर वज्र योग रात्री ११ वाजून ३३ मिनिटांपर्यंत जुळून येईल. आज राहू काळ ३ वाजता सुरु होईल ते ४ वाजून ३० मिनिटांपर्यंत असणार आहे. तर आजचा दिवस तुमच्या जीवनात नवे काय घेऊन येणार हे आपण जाणून घेऊया…

१५ एप्रिल पंचांग व राशिभविष्य ( Today’s horoscope for zodiac signs)

मेष राशिभविष्य (Aries Horoscope Today)

कौटुंबिक प्रश्न सुटतील. तुमचे व्यक्तिमत्व बहरेल. नोकरदार वर्गाला चांगला नफा मिळेल. आर्थिक व्यवहार सावधगिरीने करावेत. तुमच्यातील उद्योगशीलता वाढेल.

वृषभ राशिभविष्य (Taurus Horoscope Today)

घरात महिलांचे वर्चस्व वाढेल. अवाजवी कामे अंगावर घेऊ नयेत. मेहनतीला मागेपुढे पाहू नका. उधार उसनवारीचे व्यवहार करू नयेत. खर्च आटोक्यात ठेवावा.

मिथुन राशिभविष्य (Gemini Horoscope Today)

बिनधास्तपणे वागणे ठेवाल. पत्नीच्या प्रेमळ सौख्यात भर पडेल. तरुण वर्गाशी संपर्क वाढेल. नियम बाह्य कामे करू नका. योग्य मार्गदर्शनाचा लाभ घ्या.

कर्क राशिभविष्य (Cancer Horoscope Today)

उत्तम वाहन सौख्य लाभेल. घरगुती कामे वेळेत पार पडतील. मनाजोगी खरेदी करता येईल. मित्र परिवारात वाढ होईल. मौल्यवान वस्तु लाभतील.

सिंह राशिभविष्य (Leo Horoscope Today)

कामानिमित्त प्रवास कराल. बोलण्यातून इतरांवर छाप पाडाल. दान धर्माचे पुण्य पदरी पडेल. स्पर्धकांवर मात करता येईल. हाताखालील लोकांवर लक्ष ठेवावे.

कन्या राशिभविष्य (Virgo Horoscope Today)

तब्येतीची काळजी घ्यावी. पित्त प्रकृतीत वाढ संभवते. मुलांचे वागणे मनाविरुद्ध वाटू शकते. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. आध्यात्मिक अनुभूतीचा लाभ मिळेल.

तूळ राशिभविष्य (Libra Horoscope Today)

व्यावसायिक प्रवास करावा लागेल. स्वत:चेच खरे करण्याचा प्रयत्न कराल. मनात उगीचच हुरहूर वाटेल. मानपमानाचे प्रसंग येऊ शकतात. जोडीदाराशी विचार विनिमय करावा.

वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Horoscope Today)

हित शत्रूंचा त्रास संभवतो. कामातील उत्साह वाढेल. भावंडांचे प्रश्न सामोरे येतील. स्वभावात काहीसा हटवादीपणा येईल. नवीन आव्हान पेलाल.

धनू राशिभविष्य (Sagittarius Horoscope Today)

कौटुंबिक खर्च आटोक्यात ठेवावा. व्यापारी वर्गाला चांगला धनलाभ होईल. जोडीदाराशी किरकोळ मतभेद संभवतात. हाताखालील लोकांचे सहकार्य मिळेल. नातेवाईकांना मदत करावी लागेल.

मकर राशिभविष्य (Capricorn Horoscope Today)

काही वेळ शांत राहणे उत्तम. फार उतावीळपणा करू नका. उष्णतेचे विकार संभवतात. कामातील उत्साह वाढीस लागेल. स्वत:च्या हिंमतीवर कामे पूर्ण कराल.

कुंभ राशिभविष्य (Aquarius Horoscope Today)

सामुदायिक वादात अडकू नका. काही कामे खिळून पडल्यासारखी वाटतील. प्रवासात काळजी घ्यावी. गैरसमजुतीतून त्रास संभवतो. हातापायांना किरकोळ इजा संभवते.

मीन राशिभविष्य (Pisces Horoscope Today)

कौटुंबिक जबाबदारी वाढेल. जवळचा प्रवास मजेत पार पडेल. मित्रांची नाराजी दूर करावी. तुमच्या शब्दाला वजन प्राप्त होईल. व्यवहारी दृष्टीकोन ठेवाल.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर