Daily Rashibhavishya in Marathi, 16 December 2023: जाणून घ्या आपल्या राशींसाठी दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.

मेष:-

निर्णय क्षमतेत सुधारणा होईल. अति तिखट पदार्थ खाऊ नका. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. नातेवाईकांची गाठ पडेल. सामाजिक गोष्टींची जाणीव ठेऊन वागाल.

The effect of the Sun's Mahadasha lasts for 6 years on a person
Surya Mahadasha: सूर्याच्या महादशेमुळे कोणत्या राशींचे नशीब चमकते करिअर अन् व्यवसाय? मिळते अपार धन-संपत्ती, ६ वर्षांसाठी राहतो प्रभाव
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
rahu planet uttarabhadra nakshatra 2025
सहा दिवसांनंतर शनीच्या नक्षत्रात राहूच्या प्रवेशाने ‘या’ राशींचे चमकेल नशीब; धनाने भरेल झोळी, आयुष्यबदलाचा संकेत
Yearly Scorpio Astrology Prediction in 2025
Scorpio Yearly Horoscope 2025 : २०२५ मध्ये वृश्चिक रास करणार स्वतःला सिद्ध! मिळेल मनपसंत जोडीदार; ज्योतिष तज्ज्ञांकडून जाणून घ्या वर्षाचे राशीभविष्य
Mangal Margi 2025 horoscope
२१ जानेवारीपासून ‘या’ राशींचे झटक्यात पालटणार नशीब; मंगळ मार्गीमुळे मिळणार बक्कळ पैसा, संपती, जबरदस्त यश
Gajakesari Raja Yoga
९ जानेवारीला निर्माण होणार शक्तीशाली गजकेसरी राजयोग! या राशीच्या लोकांचा सुरु होईल सुवर्णकाळ, पद-पैसा अन् प्रगती होण्याचे प्रबळ योग
From February 24 the luck of people born under this zodiac sign
२४ फेब्रुवारीपासून ‘या’ राशीच्या लोकांचे नशीब फळफळणार! मंगळ होणार मार्गी, मिळणार पैसाच पैसा
Shukra Nakshatra Gochar 2025 astrology
शनिच्या नक्षत्रात शुक्राचा प्रवेश, ४ जानेवारीनंतर ‘या’ राशींचे लोक होतील मालामाल,कमावतील चिक्कार पैसा

वृषभ:-

तडकाफडकी निर्णय घेऊ नका. वाचनातून वैचारिकता सुधारेल. मुलांच्या वागण्याने खुश व्हाल. प्रेमातील व्यक्तींना मनमोकळेपणाने बोलता येईल. जुगारात चांगली कमाई करता येऊ शकेल.

मिथुन:-

नोकरीत वरचष्मा राहील. घरातील वातावरण आपल्याला अधिक आनंदी करेल. कामात काही सकारात्मक बदल दिसून येतील. तत्काळ निर्णयावर येऊ नका. सारासार विचारावर भर द्यावा.

कर्क:-

हस्त कौशल्याचे कौतुक केले जाईल. प्रगतीच्या दृष्टीने पाऊल टाकाल. मित्रमंडळींच्या सहवासात रमून जाल. अधिकार्‍यांवर छाप पाडता येईल. घरगुती खर्चावर नियंत्रण ठेवा.

सिंह:-

सर्वांशी गोडीने सुसंवाद साधाल. हातातील अधिकार वापरता येतील. व्यापारी क्षेत्रात चटकन विश्वास ठेऊ नका. आवडीचे पदार्थ चाखाल. नोकरदारांच्या अधिकारात वाढ होईल.

कन्या:-

आपल्या मर्जीचे आपणच मालक असाल. मनाजोगी खरेदी करता येईल. दिवस शुभ ठरेल. मानसिक प्रसन्नता लाभेल. रुचकर भोजनाचा आनंद घ्याल.

तूळ:-

योग्य तरतूद करण्याकडे कल राहील. उगाच फार काळजी करत बसू नका. सारासार विचाराशिवाय निर्णयापर्यंत पोहोचू नका. पोटाचे विकार जाणवू शकतात. क्षुल्लक समस्या सोडवू शकाल.

वृश्चिक:-

लोकांच्या गळ्यातील ताईत बनाल. एखादी बहुमूल्य वस्तु मिळण्याचे संकेत मिळतील. नोकरदाराच्या अधिकारात वाढ होईल. साहस आणि पराक्रमात वाढ होईल. मनातील इच्छा पूर्ण कराल.

धनू:-

सामाजिक कामाची ओढ लागेल. घरात कामाचा बोजा वाढेल. आध्यात्मिक ज्ञानात भर पडेल. नवीन काहीतरी संशोधन करण्याकडे कल राहील. प्रलंबित येणी मिळतील.

मकर:-

मन:शांती लाभेल. जुन्या चिंता मिटतील. लोकांच्या प्रशंसेस पात्र व्हाल. व्यावसायिक बदल नियोजनाबद्ध असावेत. गुरुजनांचा आशीर्वाद मिळेल.

कुंभ:-

नवीन गुंतवणूक करता येईल. मानसिक स्वास्थ जपावे. उगाचच चिडचिड करू नये. नसत्या भानगडीत अडकू नका. घरातील ज्येष्ठांचा सल्ला घ्यावा.

मीन:-

बोलताना संपूर्ण विचार करूनच बोला. आपल्यामुळे कोणी दुखावले जाणार नाही याची काळजी घ्या. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. पचनाचा त्रास संभवतो. अति साहस करायला जाऊ नका.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर.

Story img Loader