Daily Rashibhavishya in Marathi, 20 December 2023: जाणून घ्या आपल्या राशींसाठी दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.

मेष:-

जोडीदाराच्या दिलदार वृत्तीची प्रशंसा करा. कोणाकडून फसले जाणार नाही याची दक्षता घ्या. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. व्यापारी वर्गाने चिकाटी सोडू नये. नवीन गोष्टी आमलात आणाव्यात.

12 December Rashi Bhavishya In Marathi
दुसरा गुरुवार, १२ डिसेंबर पंचांग: महालक्ष्मीच्या कृपेने मेषला मिळेल प्रार्थनेचे फळ तर व्यवसायिकांचा असेल सोन्याचा दिवस, वाचा तुमचे राशिभविष्य
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Guru gochar gajkesari rajyog horoscope 2025 in marathi
२०२५ चा गजकेसरी राजयोग ‘या’ तीन राशींची करु शकतो आर्थिक भरभराट, हत्तीवरुन वाटाल साखर
10 December Mesh To Meen Horoscope in Marathi
१० डिसेंबर पंचांग: आज वृषभसह ‘या’ राशींच्या कुंडलीत धनलाभाचा योग; आज काय घडल्याने १२ राशींचे मन होईल प्रसन्न? वाचा मंगळवारचे राशिभविष्य
9th december 2024 Marathi Daily Horoscope in marathi
९ डिसेंबर पंचांग; दुर्गाष्टमीला सिद्धी योगामुळे १२ राशींचा आयुष्यात होतील मोठे बदल! सोमवारी तुमचे नशीब चमकणार का?
7 December astrological predictions for zodiac signs
७ डिसेंबर पंचांग: धनिष्ठा नक्षत्रात १२ राशींवर होणार सुखाचा वर्षाव; पद, पैसा, प्रतिष्ठेत होईल वाढ, तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय खास?
Kark Rashifal 2025
Kark Rashifal 2025: कर्क राशीसाठी कसे असेल नववर्ष २०२५? कोणत्या ग्रहाचे गोचर ठरणार लाभदायी, कोणाची होईल कृपा?
5 December Vinayak Chaturthi astrological predictions for zodiac signs
५ डिसेंबर पंचांग: मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी मेषसह ‘या’ ३ राशींवर लक्ष्मीकृपा; आज गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे घडणार का? वाचा राशिभविष्य

वृषभ:-

उगाचच भांडणात पडू नका. घरात खबरदारी घेऊन काम करावे. मन शांत ठेवून कार्यरत राहावे. कार्यालयीन सदस्यांशी मतभेद होण्याची शक्यता. धैर्याने परिस्थिती हाताळावी.

मिथुन:-

मनातील चुकीच्या विचारांना हद्दपार करा. उपासना सफल होईल. आजचा दिवस चांगला जाईल. घेतलेल्या कष्टाचे चीज होईल. नोकरदार वर्गाला चांगली बातमी मिळेल.

कर्क:-

स्थावर मालमत्तेत गुंतवणूक करण्याचा विचार कराल. वडीलधार्‍या मंडळींची काळजी घ्यावी. दिनक्रम व्यस्त राहील. भौतिक सुखाचा आनंद घ्याल. समोरच्या व्यक्तीमधील चुका काढत बसू नका.

सिंह:-

घरात शांततेचे वातावरण राहील. नवीन नोकरीच्या संधी दिसून येतील. आवडत्या वस्तू खरेदी कराल. संवाद कौशल्याने समोरच्या व्यक्तीवर प्रभाव पाडाल. कुटुंबासमवेत वेळ घालवाल.

कन्या:-

कष्टाच्या मानाने यश पदरी पडेल. स्पर्धेत यश मिळवाल. कामानिमित्त प्रवास घडेल. सर्वत्र आनंद शोधाल. अचानक खर्च उद्भवू शकतात.

तूळ:-

अनावश्यक खर्च कमी करा. नवीन गोष्टीत सावधानतेने पाऊल टाका. मित्रांचे सहकार्य लाभू शकेल. नोकरदार वर्गाला दिलासादायक दिवस. अधिकारात वृद्धी होईल.

वृश्चिक:-

केलेला संकल्प पूर्ण होईल. आपले विचार लोकांसमोर मांडाल. पोटाचे विकार त्रस्त करू शकतील. एखाद्या प्रसंगामुळे चिडचिड संभवते. अनावश्यक खर्च उद्भवतील.

धनू:-

आपला आत्मविश्वास कायम ठेवा. घरासंबंधीची कामे पूर्ण करा. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. भौतिक गोष्टींचा अनुभव घ्याल. आहारावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.

मकर:-

आपला संयम कमी येईल. अति साहस दाखवू नका. आपल्या निर्णय क्षमतेवर विश्वास ठेवा. व्यावसायिक निर्णय भविष्यात फायदेशीर ठरतील. मनातील इच्छा पूर्ण होईल.

कुंभ:-

कामाकडे संपूर्ण लक्ष द्या. छोटे प्रवास संभवतात. बोलण्यातून लोकांशी जवळीक साधाल. व्यावसाईकांना अधिक मेहनत घ्यावी लागेल. मनातील नवीन योजनांचा पाठपुरावा करावा.

मीन:-

नवीन संधी चालून येऊ शकते. लहान प्रवास कराल. मन काहीसे विचलीत राहण्याची शक्यता. पदोन्नतीचे योग संभवतात. घरात अतिथी जमतील.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर.

Story img Loader