Daily Rashibhavishya in Marathi, 20 October 2023: जाणून घ्या आपल्या राशींसाठी दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.

मेष:-

आपल्या मर्जीने दिवस घालवाल. दरवेळेस घाई उपयोगाची नाही. अती उत्साह दाखवू नका. निश्चयाने कामे हाती घ्या. कौटुंबिक गोष्टीत अधिक वेळ रमाल.

shani gochar 2025 zodiac sign today horoscope in marathi
Shani Gochar 2025 : २०२५ मध्ये शनीचे मीन राशीत गोचर, ‘या’ राशींच्या नशिबाचं टाळं उघडणार; रिकामी तिजोरी धनधान्याने भरण्याचे संकेत
14 December Rashi bhavishya In Marathi
१४ डिसेंबर पंचांग: आज १२ पैकी ‘या’ राशींवर…
12 December Rashi Bhavishya In Marathi
दुसरा गुरुवार, १२ डिसेंबर पंचांग: महालक्ष्मीच्या कृपेने मेषला मिळेल प्रार्थनेचे फळ तर व्यवसायिकांचा असेल सोन्याचा दिवस, वाचा तुमचे राशिभविष्य
surya gochar 2024 astrology horoscope in marathi
Surya Gochar 2025 : १५ डिसेंबरपासून करोडपती होऊ शकतात ‘या’ तीन राशींचे लोक; सूर्यदेवाच्या कृपेने जगू शकतात राजासारखे जीवन?
Guru gochar gajkesari rajyog horoscope 2025 in marathi
२०२५ चा गजकेसरी राजयोग ‘या’ तीन राशींची करु शकतो आर्थिक भरभराट, हत्तीवरुन वाटाल साखर
9th december 2024 Marathi Daily Horoscope in marathi
९ डिसेंबर पंचांग; दुर्गाष्टमीला सिद्धी योगामुळे १२ राशींचा आयुष्यात होतील मोठे बदल! सोमवारी तुमचे नशीब चमकणार का?
Kark Rashifal 2025
Kark Rashifal 2025: कर्क राशीसाठी कसे असेल नववर्ष २०२५? कोणत्या ग्रहाचे गोचर ठरणार लाभदायी, कोणाची होईल कृपा?
mithun
Mithun Rashifal 2025: नववर्षात मिथुन राशीच्या लोकांचे नशीब चमकणार! शनीदेवाची होणार कृपा

वृषभ:-

आपल्या वर्तनावर कोणी संशय घेणार नाही याची काळजी घ्या. सावध भूमिका घ्या. वडीलांचे मोलाचे मार्गदर्शन घ्या. कौटुंबिक खर्च चिंतेत टाकू शकतो. मनाची चंचलता जाणवेल.

मिथुन:-

मित्रांचे सल्ले तपासून घ्या. डोळे झाकून निर्णय घेऊ नका. नवीन कार्यात जोडीदाराचा सल्ला घ्यावा. कठोर मेहनतीला पर्याय नाही. कौटुंबिक सौख्यासाठी खर्च कराल.

कर्क:-

आपली चूक मान्य करायला शिका. निष्काळजीपणा कमी करावा. जुन्या मित्रांची गाठ घ्याल. शेजार्‍यांची मदत मिळेल. नातेवाईकांशी संबंध सुधारतील.

सिंह:-

जोडीदाराच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करू नका. दिवस आनंदात जाईल. मित्रांसोबत फिरायला जाल. मुलांसोबत चांगला काळ व्यतीत कराल. कार्यालयातील कामे सकारात्मक परिणाम देतील.

कन्या:-

लोकांशी बोलताना विचार पक्के ठेवा. आपले मुद्दे ठामपणे मांडा. आजचा दिवस मध्यम फलदायी. काही घटनांमुळे ताण वाढू शकतो. अस्थिरतेमुळे मन विचलीत होऊ शकते.

तूळ:-

बाहेरचे खाणे टाळावे. उगाच आजारांना निमंत्रण देऊ नका. मित्रांना मदत कराल. अपेक्षित यशासाठी मेहनत घ्यावी लागेल. बोलताना तारतम्य बाळगावे.

वृश्चिक:-

लोकांना बोलण्यातून दिलासा द्यावा. कामाच्या ठिकाणी प्रशंसा केली जाईल. कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यात वेळ जाईल. कर्ज मुक्तीसाठी प्रयत्न कराल. प्रेमातील व्यक्तींना नवीन ऊर्जा मिळेल.

धनू:-

कामाचा उरक वाढवावा. मुलांकडून लाभ होतील. संमिश्र घटनांचा दिवस. परोपकाराची जाणीव ठेवाल. घराबाहेर पडताना काळजी घ्यावी. वाहन खरेदी बाबत चर्चा कराल.

मकर:-

तुमचा निर्णय समोरची व्यक्ती मान्य करेल. घरातील कामात गुंग राहाल. मानसिक शांतता लाभेल. कौटुंबिक कामे प्राधान्याने पूर्ण कराल. मित्रांच्या मदतीने महत्त्वाची कामे पार पाडाल.

कुंभ:-

रोजच्या गोष्टी संभ्रमात पाडू शकतात. कार्यालयीन वातावरण चांगले राहील. उत्साहाने कार्यरत राहाल. धार्मिक गोष्टीत आनंद मिळेल. अधिकार्‍यांच्या सहकार्याने समस्या दूर होईल.

मीन:-

व्यवसायात चलती झालेली दिसून येईल. आहाराची पथ्ये पाळावीत. कौटुंबिक कामात हिरीरीने भाग घ्याल. जोडीदाराशी मतभेद संभवतात. दिवसाची सुरुवात कंटाळवाणी असू शकते.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर.

Story img Loader