Daily Rashibhavishya in Marathi, 23 December 2023: जाणून घ्या आपल्या राशींसाठी दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.

मेष:-

सकारात्मक दृष्टीकोन ठेवा. आजूबाजूच्या लोकांना सोबत घेऊन चालाल. धार्मिक कार्याची आवड निर्माण होईल. कुटुंबातील लोकांसमवेत प्रवास कराल. आर्थिक प्रगती साधता येईल.

12 December Rashi Bhavishya In Marathi
दुसरा गुरुवार, १२ डिसेंबर पंचांग: महालक्ष्मीच्या कृपेने मेषला मिळेल प्रार्थनेचे फळ तर व्यवसायिकांचा असेल सोन्याचा दिवस, वाचा तुमचे राशिभविष्य
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
10 December Mesh To Meen Horoscope in Marathi
१० डिसेंबर पंचांग: आज वृषभसह ‘या’ राशींच्या कुंडलीत धनलाभाचा योग; आज काय घडल्याने १२ राशींचे मन होईल प्रसन्न? वाचा मंगळवारचे राशिभविष्य
9th december 2024 Marathi Daily Horoscope in marathi
९ डिसेंबर पंचांग; दुर्गाष्टमीला सिद्धी योगामुळे १२ राशींचा आयुष्यात होतील मोठे बदल! सोमवारी तुमचे नशीब चमकणार का?
7 December astrological predictions for zodiac signs
७ डिसेंबर पंचांग: धनिष्ठा नक्षत्रात १२ राशींवर होणार सुखाचा वर्षाव; पद, पैसा, प्रतिष्ठेत होईल वाढ, तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय खास?
Kark Rashifal 2025
Kark Rashifal 2025: कर्क राशीसाठी कसे असेल नववर्ष २०२५? कोणत्या ग्रहाचे गोचर ठरणार लाभदायी, कोणाची होईल कृपा?
6 December astrological predictions for zodiac signs
६ डिसेंबर पंचांग: श्रवण नक्षत्रात जुळून येणार धनवृद्धीचे योग तर ‘या’ राशींना मिळेल प्रेमाची साथ; शुक्रवारी तुमचे भाग्य कसे चमकणार?
5 December Vinayak Chaturthi astrological predictions for zodiac signs
५ डिसेंबर पंचांग: मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी मेषसह ‘या’ ३ राशींवर लक्ष्मीकृपा; आज गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे घडणार का? वाचा राशिभविष्य

वृषभ:-

आरोग्याच्या काही तक्रारी जाणवू शकतात. व्यायामाला कंटाळा करू नका. अचानक धनलाभाची शक्यता. वैवाहिक जीवनात सुसंवाद ठेवावा. फार काळजी करत बसू नये.

मिथुन:-

लहान व्यवसायिकांना लाभ होईल. सामाजिक व्याप्ती वाढेल. जनसंपर्कात वाढ होईल. जोडीदारासोबत मजेत वेळ घालवाल. तुमचे विचार सकारात्मक ठेवा.

कर्क:-

कार्यक्षेत्रात सावधानता बाळगा. विरोधकांपासून सावध राहावे. कोणावरही जास्त विश्वास ठेऊ नका. सामाजिक स्तरावर बोलताना भान राखावे. कोणालाही शब्द देऊ नका.

सिंह:-

प्रेम जीवनात सुखद अनुभव मिळतील. सहवासाचा आनंद लुटाल. मनातील भावना मांडता येतील. आर्थिक बाबतीत केलेले प्रयत्न यश देतील. लॉटरीमधून लाभ मिळू शकतो.

कन्या:-

आज देवीचा आशीर्वाद मिळेल. मनातील इच्छेला मूर्त रूप द्याल. कौटुंबिक जीवनात समाधान लाभेल. कामाच्या ठिकाणी एकाग्रता ठेवावी. घरातील टापटीप कटाक्षाने पाळाल.

तूळ:-

आज तुमच्यातील धैर्य वाढीस लागेल. विना संकोच बोलाल. जवळच्या मित्रांना घरी बोलवाल. निसर्गरम्य ठिकाणाला भेट द्याल. खाण्यावर नियंत्रण ठेवावे.

वृश्चिक:-

बोलण्यातून सामाजिक मान वाढेल. घरात तुमच्या मताला प्राधान्य दिले जाईल. आवडीचे पदार्थ चाखाल. कौटुंबिक जीवनात काही सुखद अनुभव येतील. दिवस मनाजोगा घालवाल.

धनू:-

आज आपल्या मनाप्रमाणे सर्व गोष्टी कराल. आवडते छंद जोपासाल. भावनेच्या भरात वाहून जाऊ नका. बुद्धिमत्ता आणि विवेक यांचा मेळ घालावा. सूक्ष्म निरीक्षणावर भर द्यावा.

मकर:-

आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. खर्चात वाढ संभवते. मनातील नसत्या चिंता काढून टाकाव्यात. ध्यानधारणा करण्यावर लक्ष केंद्रित करावे. कचेरीची महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत.

कुंभ:-

आजचा दिवस आनंदात जाईल. बरेच दिवस रेंगाळत असलेली इच्छा पूर्ण होईल. वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल. मित्रांची उत्तम साथ मिळेल. व्यापार्‍यांना चांगला आर्थिक लाभ होईल.

मीन:-

कामाच्या ठिकाणी कौतुकास पात्र व्हाल. सहकार्‍यांशी होणारे मतभेद संपुष्टात येतील. खेळीमेळीचे वातावरण राहील. घाईघाईने निर्णय घेऊ नका. घरासाठी थोडा वेळ काढावा लागेल.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर.

Story img Loader