25 January 2025 Horoscope and Panchang : २५ जानेवारी २०२५ रोजी माघ कृष्ण पक्षातील एकादशी तिथी आहे. एकादशी तिथी रात्री ८ वाजून ३२ मिनिटांपर्यंत चालेल. उद्या पहाटे ४ वाजून ३८ मिनिटांपर्यंत ध्रुव योग जुळून येईल. तसेच उद्या सकाळी ८ वाजून ३६ मिनिटांपर्यंत ज्येष्ठ नक्षत्र जागृत असणार आहे. राहू काळ सकाळी ९ वाजता सुरु होईल ते १० वाजून ३० मिनिटांपर्यंत असणार आहे.
याशिवाय आज षटतिला एकादशी असणार आहे. पौष मासात आणि विशेषत: मकर संक्रमण काळात येणारी षटतिला एकादशी अतिशय महत्त्वाची मानली जाते. षटतिला एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूची तिळाचा वापर करुन पूजा केली जाते. या दिवशी तिळाचा वापर अत्यंत शुभ आणि लाभदायक मानला जातो. तर आजचा दिवस विष्णू कृपेने कोणासाठी सुख-समृद्धी घेऊन येईल हे आपण जाणून घेऊया…
२५ जानेवारी पंचांग व राशिभविष्य:
मेष:- बुद्धीला पटेल तोच निर्णय घ्या. संमिश्र घटनांचा दिवस. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. ओळखीच्या लोकांकडून फायदा होईल. दिवस चांगला जाईल.
वृषभ:- आरोग्यात सुधारणा संभवते. मुलांच्या उत्कर्षाचा काळ. व्यापार्यांनी अधिक मेहनत घ्यावी. सरकारी कर्मचार्यांचे मतभेद होऊ शकतात. उगाचच वादात अडकू नका.
मिथुन:- नवीन संधी दार ठोठावेल. उगाच स्वत:ला एखाद्या वादात अडकवू नका. लाभदायक दिवस. शेअर बाजारातील गुंतवणूक फायदेशीर ठरेल.
कर्क:- अधिकाराचा अति वापर टाळावा. दिवसभर कामात गर्क राहाल. कौटुंबिक जबाबदारीत वाढ होईल. आत्ममग्न राहाल. वैचारिक दिशा बदलून पहावी.
सिंह:- कौटुंबिक सौख्याचा समतोल राखावा. कलाक्षेत्राबाबत अपेक्षित वार्ता मिळतील. हित शत्रू त्रास देण्याचा प्रयत्न करतील. मनातील अनामिक भीती काढून टाकावी. अनोळखी व्यक्तींशी व्यवहार टाळावेत.
कन्या:- कोणतीही गुंतवणूक सावधगिरीनेच करावी. आवक आणि जावक यांचा मेळ घालावा. वाहन चालवताना काळजी घ्यावी. रागावर नियंत्रण ठेवा. समोरील गोष्टीत आनंद शोधावा.
तूळ:- इतरांना सल्ले द्यायला जाल. कामाची दिवसभर धांदल राहील. वरिष्ठांकडून कामाचे कौतुक केले जाईल. एखादी घटना मन विचलीत करू शकते. इच्छा नसताना सुद्धा प्रवास करावा लागू शकतो.
वृश्चिक:- लोकांवर अवलंबून राहू नका. पुढे ढकललेले काम हाती घ्या. मानसिक संतुलन राखावे. मनातील निराशाजनक विचार काढून टाकावेत. उगाचच लपवाछपवी करायला जाऊ नये.
धनू:- दूरदृष्टी ठेवून विचार करावा. योग्य नियोजनावर भर द्यावा. शक्यतो आपल्या मुद्यावर ठाम रहा. कुटुंबातील सदस्यांची साथ लाभेल. व्यवहारात निष्काळजीपणा करू नका.
मकर:- जोडीदाराच्या साथीने मनोकामना पूर्ण करा. व्यवसायात अति विश्वास ठेऊ नका. जुन्या गोष्टी उगाळत बसू नका. कामातील उत्साह वाढीस लागेल. दिवस धावपळीत जाईल.
कुंभ:- फसवणुकीपासून सावध राहावे. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये. वडीलधार्यांचा योग्य तो मान राखावा. आवडीच्या वस्तु खरेदी कराल. मानसिक शांतता जपावी.
मीन:- कामात मित्रांचा सल्ला घ्याल. अति मसालेदार पदार्थ खाणे टाळावे. वैचारिक समतोल साधावा. उत्साहाने कामे हाती घ्यावीत. भडक विचार मांडू नका.