Today’s Horoscope, 25 October For All Signs : आज २५ ऑक्टोबर २०२४ रोजी अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षाची नवमी तिथी आहे. नवमी तिथी रात्री ३ वाजून २३ मिनिटांपर्यंत चालेल. तर शनिवारी पहाटे ५ वाजून २६ मिनिटांपर्यंत शुभ योग जुळून येईल. त्याचबरोबर पुष्य नक्षत्र सकाळी ७ वाजून ४० मिनिटांपर्यंत जागृत असेल, त्यानंतर आश्लेषा नक्षत्र दिसेल. आज राहू काळ १ वाजून ३० मिनिटांपासून सुरु होईल ते ३ वाजेपर्यंत असेल. तर मेष ते मीन राशींचा शुक्रवार कसा जाईल हे आपण जाणून घेऊया…

२५ ऑक्टोबर पंचांग व राशिभविष्य (Horoscope Predictions October 25) :

मेष:- संमिश्र फळे मिळतील. मनातील बदलांकडे लक्ष द्या. कामाच्या ठिकाणी स्पर्धेला तोंड द्यावे लागेल. हेतु मनात धरून कामे कराल. महिलांनी शांत राहावे.

24th October 2024 Horoscopes In Marathi
24 October Horoscope : गुरुपुष्यामृत योग कोणत्या राशींसाठी ठरणार भरभराटीचा? भाग्याची साथ ते कामात मिळेल भरपूर यश; वाचा तुमचे राशिभविष्य
Zeeshan Siddique slams Uddhav Thackeray
झिशान सिद्दिकींच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंनी दिला उमेदवार; खोचक…
Gurupushyamrut yog
Gurupushyamrut Yoga : गुरुपुष्यामृताचा शुभ योग साधण्यासाठी उमेदवारांची धडपड, मुहुर्तावर कोण-कोण अर्ज भरणार?
Surya transit in tula rashi
सूर्य देणार नुसता पैसा; राशीपरिवर्तनाने ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यात येणार मानसन्मान अन् पैसा
Health Special, water to drink in monsoon, water,
Health Special: पावसाळ्यातील कोणते पाणी प्यावे? कोणते पिऊ नये?
how the rare Samsaptak Yog formed by Jupiter and Venus after Dussehra
दसऱ्यानंतर गुरू शुक्र निर्माण करतील समसप्तक योग, ‘या’ चार राशींचे नशीब फळफळणार, मिळेल अपार पैसा अन् धनसंपत्ती
Surya Grahan 2024 on Sarva Pitru Amavasya: Do We Worship Our Ancestors
Surya Grahan on Sarva Pitru Amavasya : सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी सूर्यग्रहण आल्याने पितरांची पुजा करावी की नाही? जाणून घ्या
Sarva Pitru Amavasya 2024
Sarva Pitru Amavasya 2024: सर्वपित्री अमावस्येला सूर्यग्रहणाचे सावट; या दिवशी सुतक काळ पाळावे की नाही? जाणून घ्या

वृषभ:- समोरील संधी सोडू नका. स्वत:चा फायदा लक्षात घेऊन वागाल. नवीन विचारांनी त्रस्त राहाल. ठोस निर्णयाची गरज आहे. भावंडांमध्ये प्रेमभाव राहील.

मिथुन:- दिवसाची सुरुवात प्रफुल्लित होईल. स्थिर चित्ताने कामे सुरू करावीत. सुंदर वस्त्रे परिधान कराल. मनातील नकारात्मक विचार दूर सारा. आवडती व्यक्ति भेटेल.

कर्क:- मानसिक अस्वस्थता जाणवेल. अंतिम निर्णयाला पोहोचायला वेळ लागेल. संबंधितांचे गैरसमज होऊ शकतात. वादापासून दूर राहा. आरोग्याची काळजी घ्यावी.

सिंह:- दिवस चांगला जाईल. मनाची द्विधावस्था टाळावी. नवीन कार्य हाती घेताना संपूर्ण विचार करावा. सहलीचा बेत आखाल. धनलाभ संभवतो.

कन्या:- दिवस शुभ आहे. वरिष्ठ अधिकार्‍यांकडून फायदा होईल. कुटुंबात सामंजस्याचे वातावरण राहील. कामासाठी बाहेर गावी जावे लागू शकते. सरकारी कामात अधिक वेळ जाईल.

तूळ:- बौद्धिक कामात व्यग्र राहाल. कौटुंबिक जबाबदारीत वाढ होईल. दूरचा प्रवास संभवतो. धार्मिक स्थळाला भेट द्याल. मुलांविषयी चिंता लागून राहील.

वृश्चिक:- दिवस सावधानतेने घालवावा. रागावर नियंत्रण ठेवावे. अनैतिक कृत्ये करू नयेत. नामस्मरणाने लाभ होईल. राजकीय खेळ खेळू नका.

धनू:- दिवस समाधानात जाईल. स्वत:चे निर्णय स्वत: घ्या. राजकीय गोष्टींपासून दूर राहावे. प्रवासाचा बेत आखाल. आपली आवड जोपासाल.

मकर:- व्यापारात वाढ होईल. मनाजोगी कमाई करता येईल. आज वैचारिक बदल दिसून येईल. सहकारी मदत करतील. आवश्यक ठिकाणीच खर्च कराल.

कुंभ:- नवीन कामाची सुरुवात करू शकता. मत परिवर्तन होण्याची शक्यता आहे. महिलांनी सबुरीने वागावे. मुलांविषयी चिंता लागून राहील. पोटाच्या तक्रारी राहतील.

मीन:- नावडत्या घटनांनी निराश होऊ नका. कौटुंबिक स्वास्थ्य जपावे. मनाची मरगळ दूर सारावी. वाहन जपून चालवावे. कागदपत्रे जपून ठेवावीत.

(ज्योतिषी विद्याधर करंदीकर )