दैनिक राशिभविष्य: 3 October 2023: जाणून घ्या आपल्या राशींसाठी दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.

मेष:-

आपण ठरवलेल्या गोष्टी मार्गी लागतील. अडथळ्यांची शर्यत पार कराल. व्यापारी वर्गाला प्रगतीकारक दिवस. वैवाहिक जीवन आनंददायी असेल. जोडीदाराचे उत्तम सहकार्य लाभेल.

Navpancham rajyog 2025 in astrology
१३ जानेवारीच्या नवपंचम योगाने ‘या’ राशींचे लोक होणार कोट्यवधींचे मालक! मिळेल नोकरीत बढती, बक्कळ पैसा अन् सुख
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
rahu planet uttarabhadra nakshatra 2025
सहा दिवसांनंतर शनीच्या नक्षत्रात राहूच्या प्रवेशाने ‘या’ राशींचे चमकेल नशीब; धनाने भरेल झोळी, आयुष्यबदलाचा संकेत
Yearly Scorpio Astrology Prediction in 2025
Scorpio Yearly Horoscope 2025 : २०२५ मध्ये वृश्चिक रास करणार स्वतःला सिद्ध! मिळेल मनपसंत जोडीदार; ज्योतिष तज्ज्ञांकडून जाणून घ्या वर्षाचे राशीभविष्य
Mangal Margi 2025 horoscope
२१ जानेवारीपासून ‘या’ राशींचे झटक्यात पालटणार नशीब; मंगळ मार्गीमुळे मिळणार बक्कळ पैसा, संपती, जबरदस्त यश
Gajakesari Raja Yoga
९ जानेवारीला निर्माण होणार शक्तीशाली गजकेसरी राजयोग! या राशीच्या लोकांचा सुरु होईल सुवर्णकाळ, पद-पैसा अन् प्रगती होण्याचे प्रबळ योग
From February 24 the luck of people born under this zodiac sign
२४ फेब्रुवारीपासून ‘या’ राशीच्या लोकांचे नशीब फळफळणार! मंगळ होणार मार्गी, मिळणार पैसाच पैसा
Shukra Nakshatra Gochar 2025 astrology
शनिच्या नक्षत्रात शुक्राचा प्रवेश, ४ जानेवारीनंतर ‘या’ राशींचे लोक होतील मालामाल,कमावतील चिक्कार पैसा

वृषभ:-

घरामध्ये वेळ खर्च होईल. पण त्यातून समाधान मिळेल. दिवसभर मन प्रसन्न राहील. नवीन कार्याला चांगला दिवस. प्रयत्नात कसूर करू नका.

मिथुन:-

बोलण्यात माधुर्य कायम ठेवा. कचेरीची कामे मार्गी लागतील. कठीण कामे सुलभतेने करू शकाल. व्यावहारिक बाबीत सर्व गोष्टी तपासून पहा. एकंदर व्यवहाराचा आढावा घ्यावा.

कर्क:-

जुनी उधारी वसूल होईल. मिळकतीत वाढ होईल. हवे असलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळतील. कौटुंबिक वातावरणात रमून जाल. अधिकारी व्यक्तींची भेट होण्याची शक्यता.

सिंह:-

घेतलेला निर्णय कायम ठेवा. आत्मविश्वास वाढीस लागेल. कौटुंबिक खर्च जपून करावा. जुन्या मित्रांशी आशादायक संवाद घडेल. प्रेमप्रकरणात पुढाकार घ्याल.

कन्या:-

नवीन संधीकडे लक्ष ठेवा. अती श्रमाचा ताण जाणवेल. उत्तम निद्रा सौख्य लाभेल. नातेवाईकांशी दुरावा वाढू शकतो. जोडीदाराचे मत मान्य करावे लागेल.

तूळ:-

कामाचा जोर कायम ठेवावा. कामाच्या ठिकाणी मान मिळेल. संमिश्र घटनांचा दिवस. अघळ पघळ बोलू नका. स्त्रियांच्या सहवासात रमाल.

वृश्चिक:-

द्विधा मन: स्थितीत निर्णय घेऊ नका. कामावरून लक्ष उडू देऊ नका. लोकप्रियतेत वाढ होईल. प्रलोभनाला भुलू नका. मित्रांच्यात वाहवा होईल.

धनू:-

व्यावसायिक निर्णय घाईने घेऊ नका. कौटुंबिक जबाबदारी पार पाडाल. विरोधक पराभूत होतील. राजकीय सहकार्य लाभू शकेल. रोखीचे व्यवहार सावधानतेने करा.

मकर:-

जुनी येणी वसूल होतील. मित्रांच्या भेटीचे योग येतील. अचानक धनलाभाची शक्यता. शेअर्स मध्ये गुंतवणूक करा. इच्छेविरूद्ध प्रवास करावा लागू शकतो.

कुंभ:-

मित्रांची योग्य पारख करा. अती तिखट पदार्थ खाऊ नका. जोडीदाराच्या सहवासात आनंद लाभेल. उत्तम कार्यशैली वापराल. क्षुल्लक मतभेदाकडे दुर्लक्ष करा.

मीन:-

पित्त विकाराचा त्रास जाणवेल. चारचौघांत तुमची वाहवा होईल. कोणावरही अती विश्वास टाकू नका. जोडीदाराशी मतभेद संभवतात. मानसिक स्वास्थ्य जपावे.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर.

Story img Loader