दैनिक राशिभविष्य: 30 September 2023: जाणून घ्या आपल्या राशींसाठी दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.
मेष:-
मित्र व नातेवाईकांशी जपून व्यवहार करा. कचाट्यात सापडू नका. आपली ऊर्जा कामी लावा. वादाच्या प्रसंगात हस्तक्षेप करू नका. रागावर नियंत्रण ठेवावे.
वृषभ:-
स्वत:ला सतत गुंतवून ठेवा. मन स्थिर ठेवा. जवळच्या प्रवासाचा योग येईल. मित्रांशी मतभेद वाढवू नका. कष्टाला पर्याय नाही हे लक्षात घ्या.
मिथुन:-
कौटुंबिक समाधान लाभेल. डोक्यावरचा ताण हलका होईल. व्यापार्यांना चांगला लाभ होईल. काही समस्यांचे निराकरण होईल. भविष्याचा विचार करून योजना आखा.
कर्क:-
घरासाठी खरेदी कराल. आत्ममग्न राहाल. टीकेकडे दुर्लक्ष करावे. केवळ कामावर लक्ष केन्द्रित करा. दिवस मनाजोगा घालवाल.
सिंह:-
कर्तृत्वाने लोकांपर्यंत पोहोचाल. नीतिचा मार्ग अवलंबाल. फार विचार करण्यात वेळ वाया घालवू नका. आत्मविश्वास वाढीस लागेल. लाभाच्या संधींकडे लक्ष ठेवा.
कन्या:-
मनाचा गोंधळ टाळावा. कामे तत्परतेने पार पाडा. सामाजिक मान वाढेल. दिवस मावळताना थकवा जाणवेल. मनात एखादी नवीन कल्पना रूजेल.
तूळ:-
वाहन जपून चालवा. कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा करून चालणार नाही. पद आणि अधिकार वाढेल. व्यापारी वर्गाच्या समस्या वाढू शकतात. मित्रांचा सल्ला घ्याल.
वृश्चिक:-
आहाराची पथ्ये काटेकोरपणे पाळावीत. महत्त्वाचे निर्णय लांबणीवर टाकू नका. दिनक्रम व्यस्त राहील. नकारात्मक विचार दूर ठेवावेत. घरातील लोकांची मदत घ्यावी लागेल.
धनू:-
आज नवीन चैतन्य जाणवेल. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. गरजूंना योग्य सल्ला द्याल. मदतीचे समाधान मिळेल. कौटुंबिक कामे प्राधान्याने पार पाडाल.
मकर:-
आज नवीन चैतन्य जाणवेल. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. गरजूंना योग्य सल्ला द्याल. मदतीचे समाधान मिळेल. कौटुंबिक कामे प्राधान्याने पार पाडाल.
कुंभ:-
तडकाफडकी निर्णय घेऊ नका. वाहन खरेदीच्या योजना आखाल. धनसंचय वृद्धिंगत होईल. कौटुंबिक वातावरणाकडे लक्ष द्यावे. सासरच्या मंडळींकडून सहकार्य लाभेल.
मीन:-
गरज ओळखून पैसे खर्च कराल. घरी पाहुणे येतील. विद्यार्थी वर्गाला अपेक्षित यश मिळेल. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. कार्यक्षेत्रात विशेष ध्येय साध्य होईल.
– ज्योतिषी विद्याधर करंदीकर.