Daily Horoscope 4 January 2025 in Marathi : ४ जानेवारी २०२५ रोजी पौष महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमी तिथी आहे. पंचमी तिथी रात्री १० वाजून २ मिनिटांपर्यंत राहील. सकाळी १० वाजून ८ मिनिटांपर्यंत सिद्धी योग जुळून येईल. तसेच शततारका नक्षत्र रात्री ९ वाजून २४ मिनिटांपर्यंत जागृत असेल. याशिवाय आज दुपारी १२.०२ वाजता बुध धनु राशीत प्रवेश करेल. राहू काळ सकाळी ९ वाजता सुरु होईल ते १० वाजून ३० मिनिटांपर्यंत असेल. आज तुमचा दिवस कसा जाईल हे आपण जाणून घेऊया…

४ जानेवारी पंचांग व राशिभविष्य :

मेष:- कामाच्या ठिकाणी चांगला समन्वय साधला जाईल. स्वभावातही चांगले बदल दिसून येतील. चारचौघात तुमचा प्रभाव पडेल. वडीलांचा मोलाचा सल्ला मिळेल. सर्व कामांचा ताळमेळ साधावा.

What happens when you drink Clove lemon tea every day health news
दररोज एक कप लिंबू-लवंगयुक्त चहाचे सेवन करा अन् शरीरातील ‘हे’ बदल पाहा; तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Surya Transit In shanis Kumbh rashi
१३ फेब्रुवारीपासून चमकणार ‘या’ तीन राशींचे नशीब; सूर्याच्या कृपेने घरी येईल लक्ष्मी, मिळणार बक्कळ पैसा!
2nd February 2025 Rashi Bhavishya
२ फेब्रुवारी पंचांग: सरस्वतीच्या कृपेने कोणाच्या घरात येईल यश आणि प्रसिद्धी? रविवारी तुमच्या राशीची होणार का इच्छापूर्ती?
gajlakshmi
२६ जुलैपासून ‘या’ ३ राशींवर होईल माता लक्ष्मीची कृपा! शुक्र-गुरुच्या युतीमुळे निर्माण होईल ‘गजलक्ष्मी राजयोग’, चांगले दिवस येणार
venus and sun yuti 2025
शुक्रादित्य राजयोग देणार पैसाच पैसा; १२ महिन्यानंतर निर्माण झालेल्या राजयोगाने ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार
Daily Astrology in Marathi
३१ जानेवारी राशिभविष्य: महिन्याचा शेवटच्या दिवशी१२ पैकी ‘या’ राशींच्या नशिबी आनंदासह धनलाभाचेही संकेत; तुम्हाला कोणत्या मार्गे मिळेल सुख?
Libra Horoscope Today
Libra Horoscope Today : आजच्या दिवशी सावधगिरी बाळगा अन् खर्चावर नियंत्रण ठेवा; जाणून घ्या तूळ राशीला कसा जाईल संपूर्ण दिवस

वृषभ:- आज नशीब आजमावण्याची संधी मिळेल. आज सुरू केलेले काम फायदेशीर ठरेल. मनात परोपकाराची भावना जपाल. धार्मिक स्थळाला भेट द्याल. थोरांचा आशीर्वाद मिळेल.

मिथुन:- मनाची चलबिचलता जाणवेल. एकाच वेळी अनेक कामे अंगावर घेऊ नका. जुन्या विचारात अडकून पडू नका. अचानक धनलाभाची शक्यता. वाहन चालवताना काळजी घ्यावी.

कर्क:- वैवाहिक जीवनात अनुकूलता येईल. मनातील इच्छा पूर्ण कराल. फार हट्टीपणा करू नका. कुटुंबातील व्यक्तींशी चर्चेला अधिक प्राधान्य द्यावे. जनसंपर्क वाढेल.

सिंह:- आरोग्याकडे लक्ष द्यावे. पोटाचे त्रास संभवतात. वातूळ पदार्थ खाणे टाळावे. हित शत्रूपासून सावध राहावे. योग साधनेवर भर द्यावा.

कन्या:- आजचा दिवस मजेत घालवाल. चांगले शैक्षणिक परिणाम मिळतील. प्रेम जीवनाला बहर येईल. मित्रांबरोबर फिरायला जाल.

तूळ:- उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल. घराची साफसफाई कराल. दिवस प्रसन्नतेत जाईल. घरच्यांशी सुसंवाद साधाल. जवळचा प्रवास कराल.

वृश्चिक:- सामाजिक स्तरावर सक्रिय राहाल. स्वभावात सौम्यता ठेवावी. मित्रांशी सलोखा वाढेल. जवळच्या ठिकाणाला भेट द्याल. आपले मत स्पष्टपणे मांडाल.

धनू:- गोड बोलून कामे करून घ्याल. सर्वांची आपुलकीने चौकशी कराल. मनातील कडवटपणा दूर करता येईल. उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल. वडिलोपार्जित कामातून लाभ संभवतो.

मकर:- आरोग्यात सुधारणा होईल. मानसिक स्थैर्य लाभेल. आवडीच्या कामात मन गुंतवावे. समोरील अडचण सहज दूर करू शकाल. हातातील कामातून यश येईल.

कुंभ:- कामाच्या ठिकाणी सतर्क राहावे. राजकारणापासून दूर राहावे. अनावश्यक खर्च टाळावा. दूरच्या कामातून लाभ संभवतो. मनात चुकीच्या विचारांना थारा देऊ नका.

मीन:- नवीन गुंतवणूक फायदेशीर ठरेल. मनातील जुनी इच्छा पूर्ण होईल. जवळच्या मित्राजवळ मन मोकळे करावे. कामे जलद गतीने पूर्ण होतील. व्यापारी वर्ग खुश असेल.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर

Story img Loader