Daily Horoscope 6 January 2025 in Marathi : आज ६ जानेवारी २०२५ रोजी पौष शुक्ल पक्षाची सप्तमी तिथी आणि सोमवार आहे. ही सप्तमी तिथी सोमवारी सायंकाळी ६ वाजून २४ पर्यंत राहील. तर परीघ योग ६ जानेवारीला दुपारी २ वाजून ०५ पर्यंत राहील. तसेच उत्तर भाद्रपद नक्षत्र सोमवारी ७ वाजून ७ वाजेपर्यंत राहील. उत्तरा भाद्रपद हे आकाशात स्थित २७ नक्षत्रांपैकी २६ वे नक्षत्र आहे. या नक्षत्राचा स्वामी शनिदेव आहे, जो न्याय देवता आणि परिणामकारक ग्रह मानला जातो.

दरम्यान आज अभिजीत मुहूर्त दुपारी १२ वाजून ५ मिनिटांपासन ते १२ वाजून ४६ मिनिटांपर्यंत असेल. तर राहू काळ सकाळी ९ वाजून ५२ मिनिटांपासून ते ९ वाजून ५२ मिनिटांपर्यंत आहे. याशिवाय चंद्र मीन राशीत असेल.दरम्यान आजचा उत्तर भाद्रपद नक्षत्र अन् परिघ योगाचा संयोग १२ पैकी कोणत्या राशींना करेल श्रीमंत जाणून घेऊ…

Budhaditya Rajyog 2025 astrology news
Budhaditya Rajyog 2025 : २४ जानेवारीनंतर ‘या’ तीन राशींच्या व्यक्ती होतील श्रीमंत! बुधादित्य राजयोगाने घराची स्वप्नपूर्ती अन् जीवनात आनंदाचे क्षण
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
From Makar Sankranti the locks of luck of these 5 zodiac signs
मकर संक्रातीपासून ‘या’ ५ राशींच्या नशीबाचे टाळे उघडणार! चांगले दिवस सुरू होणार, सूर्याच्या कृपेने भाग्य चमकणार
7 January Horoscope In Marathi
शाकंभरी नवरात्रोत्सव, ७ जानेवारी पंचांग: १२ पैकी कोणत्या राशींना मिळणार सुख, शांती आणि वैभव; तुमच्या मनोकामना पूर्ण होणार का? वाचा राशिभविष्य
Surya Dev Lucky Rashi
Surya Dev Lucky Rashi : ‘या’ तीन राशींवर असते सूर्य देवाची विशेष कृपा, जीवनात मिळते अपार धन संपत्ती अन् यश
29th October 2024 Horoscope Today
Daily Horoscope, 29 October : धनत्रयोदशीला मेष, सिंहसह ‘या’ राशींवर होणार धन-सुखाचा वर्षाव, तुमच्यावर असणार का लक्ष्मीची कृपा? वाचा राशिभविष्य
diwali 2024 1st october 2024 panchang marathi horoscope mesh to meen
Laxmi Pujan Horoscope : लक्ष्मी कृपेने नोव्हेंबरचा पहिला दिवस मेष ते मीन राशीला कसा जाईल; कुणावर होणार धन अन् सुखाचा वर्षाव? वाचा तुमचे राशीभविष्य
2nd november 2024 rashi bhavishya
२ नोव्हेंबर पंचांग: पाडव्याला नात्यात येईल गोडवा तर व्यवसायात होईल फायदा; तुमच्या नशिबात कोणत्या प्रकारात येईल सुख? वाचा राशिभविष्य

६ जानेवारी राशीभविष्य आणि पंचांग ( Daily Horoscope 6 January 2025 in Marathi)

मेष:- मनातील जुनी इच्छा पूर्ण कराल. महिला मनाजोगी खरेदी करतील. गुंतवणुकीचे पर्याय समोर येतील. अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्यावा. सामाजिक स्तरावर मान मिळेल.

वृषभ:- कामाच्या ठिकाणी अति घाई करू नका. वेळेचे महत्त्व लक्षात घ्या. वडीलांचे मोलाचे मार्गदर्शन मिळेल. व्यावसायिक ठिकाणी नवीन योजना आमलात आणाल. सहकार्‍यांची मने जिंकून घ्याल.

मिथुन:- आजचा दिवस मनाजोगा जाईल. आध्यात्मिक कामातून समाधान लाभेल. धार्मिक स्थळी मन रमेल. दानधर्म कराल. उच्च शिक्षणाचा मार्ग खुला होईल.

कर्क:- गूढ गोष्टी जाणून घ्याल. मानसिक चंचलता जाणवेल. भावनेला आवर घालावी लागेल. अति विचार करत बसू नका. अनपेक्षित लाभाची शक्यता.

सिंह:- काही सकारात्मक बदल घडून येतील. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. मनातील कडवटपणा दूर होईल. काही नवीन मार्ग सापडतील. जनसंपर्कात वाढ होईल.

कन्या:- खोटी स्तुति करणार्‍यांपासून सावध राहावे. आपले निर्णय आपणच घ्यावेत. इतरांवर फार विसंबून राहू नका. बुद्धीला योग्य मार्गाला लावावे. वादाचे प्रसंग टाळावेत.

तूळ:- आनंदाची अनुभूति मिळेल. विद्यार्थ्यांना दिवस चांगला जाईल. अनुभवी व्यक्तींची मदत घेता येईल. मुलांकडून चांगली बातमी मिळेल. वातावरण सकारात्मक राहील.

वृश्चिक:- कुटुंबासमवेत फिरायला जाल. दिवस आनंदात घालवाल. घरासाठी काही नवीन खरेदी करता येईल. प्रवास मजेत पार पडेल. नोकरदारांना दिवस चांगला जाईल.

धनू:- जोडीदाराच्या मदतीने कामे पूर्ण कराल. तुमच्यातील आत्मविश्वास वाढीस लागेल. कामाच्या ठिकाणी शुभ परिणाम पहायला मिळतील. भावंडांशी संबंध सुधारतील. शेजार्‍यांना मदत कराल.

मकर:- बोलण्यात गोडवा राखून कामे करून घ्याल. आळस झटकावा लागेल. जुन्या गोष्टी उकरून काढू नका. जोडीदार तुमच्यावर खुश होईल. पारंपरिक कामातून लाभ संभवतो.

कुंभ:- मानसिक अस्थिरता दूर होईल. मनाला येईल तसे वागाल. आज समाधानाला अधिक महत्त्व द्याल. ध्यान धारणेला प्राधान्य द्यावे. क्षुल्लक गोष्टींना फार महत्त्व देऊ नका.

मीन:- अति विचारात वेळ वाया घालवू नका. सकारात्मक दृष्टीकोन ठेवावा. परदेशी भाषा शिकण्याची आवड निर्माण होईल. कर्जाची प्रकरणे आज टाळावीत . आध्यात्मिक क्षेत्रात काम करणार्‍यांना दिवस चांगला जाईल.

(ज्योतिषी विद्याधर करंदीकर)

Story img Loader