Zodiac Signs Daily Predictions, 9 November : आज ९ नोव्हेंबर २०२४ ला कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमी तिथी आहे. अष्टमी तिथी रात्री १० वाजून ४६ मिनिटांपर्यंत राहील.शनिवारी पहाटे ४ वाजून २३ मिनिटांपर्यंत वृद्धी योग राहील. तर दुपारी ११ वाजून ४८ मिनिटांपर्यंत श्रावण नक्षत्र जागृत असणार आहे. आज राहू काळ ९ वाजता सुरु होईल ते १० वाजून ३० मिनिटांपर्यंत असेल.

याशिवाय आज गोपाष्टमी व्रत पाळण्यात येणार आहे. कार्तिक मासातील शुक्ल पक्षाच्या अष्टमी तिथीला गोपाष्टमी मोहोत्सव साजरा केला जातो. या वर्षी हा उत्सव उद्या साजरा होणार आहे. मान्यतेनुसार, कार्तिक शुक्ल प्रतिपदेपासून सप्तमीपर्यंत श्रीकृष्णाने आपल्या करंगळीवर गोवर्धन पर्वत धारण केला होता. तेव्हापासून कार्तिक शुक्ल अष्टमीला गोपाष्टमी उत्सव साजरा केला जातो. तर आज तुमचा दिवस कसा जाईल हे आपण जाणून घेऊया…

shukra guru gochar 2024 in dhanu vrushabha astrology
७ नोव्हेंबरनंतर ‘या’ तीन राशींचे नशीब उजळणार, गुरु शुक्राच्या राशी बदलाने मिळणार भरपूर सुख अन् आर्थिक लाभ
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
Vinayak Chaturthi special 5th November Rashi Bhavishya
५ नोव्हेंबर पंचांग: विनायक चतुर्थीला ‘या’ राशींना होणार फायदा, भाग्याची साथ ते धनलाभाचे योग; वाचा तुमच्या नशिबात कसं येईल सुख?
Shukra Gochar 2024
Shukra Gochar 2024 : फक्त ३ दिवसानंतर या राशींचे बदलणार नशीब, शुक्र गोचरमुळे मिळणार अपार पैसा अन् धन
ketu nakshatra parivartan 2024
१० नोव्हेंबरपासून ‘या’ ३ राशी कमावणार नुसता पैसा; केतूचे नक्षत्र परिवर्तन २०२५ पर्यंत करणार मालामाल
4th November 2024 Rashi Bhavishya
४ नोव्हेंबर पंचांग : पूर्वाषाढा नक्षत्रात वृषभ,कर्कसह ‘या’ ३ राशींचा आनंदित जाईल दिवस; कामात यश ते गोड बातमी मिळणार; वाचा तुमचे राशिभविष्य
Budh Nakshatra Gochar 2024
Budh Nakshatra Gochar 2024 : बुध ग्रहाच्या नक्षत्र गोचरमुळे चमकणार ‘या’ तीन राशींचे नशीब, लक्ष्मीच्या कृपेने मिळणार अपार पैसा अन् धन
Shani Dev Margi 2024
१५ नोव्हेंबरपासून शनी होणार मार्गी; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळेल प्रत्येक कामात यश

९ नोव्हेंबर पंचांग व राशिभविष्य :

मेष:- शारीरिक दृष्ट्‍या सक्षम राहाल. आजचा दिवस व्यस्त असेल. जवळचा प्रवास घडेल. उत्साहाने व जोमाने कामे तडीस न्याल. आर्थिक प्रश्न सुटेल.

वृषभ:- शैक्षणिक क्षेत्रातील लोकांना दिवस लाभदायक असेल. धार्मिक कामात मदत नोंदवाल. इतरांना मदत केल्याचा आनंद मिळेल. थोरांचे आशीर्वाद घेता येतील. उत्कृष्ट कल्पनाशक्ती लाभेल.

मिथुन:- कोणतीही चर्चा जास्त वेळ ताणू नका. अन्यथा वादाचे प्रसंग उद्भवू शकता. आरोग्याबाबत निष्काळजीपणा करू नका. कौटुंबिक समस्यांकडे लक्ष द्यावे. मानसिक आरोग्याकडे लक्ष द्यावे.

कर्क:- जोडीदाराबरोबर चांगला वेळ घालवाल. संयमी भूमिका घ्यावी लागेल. नवीन योजनांवर अंमल करू शकाल. अचानक मूड बदलू शकेल. छोट्या छोट्या गोष्टींनी निराश होऊ नका.

सिंह:- नवीन आव्हानांना सामोरे जावे लागेल. सहकार्‍यांशी संयमी भूमिकेतून वागावे. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये. विरोधकांकडे विशेष लक्ष द्यावे. गुप्त शत्रूंकडे दुर्लक्ष करू नका.

कन्या:- पूर्वी शिकलेल्या गोष्टीतून लाभ मिळू शकेल. तज्ज्ञ लोकांकडून मार्गदर्शन मिळेल. मनातील प्रेमभावना व्यक्त करता येईल. नवीन पुस्तक खरेदी करू शकता. नवीन गोष्टीत रस घ्याल.

तूळ:- कौटुंबिक जीवनात सकारात्मक बदल घडून येतील. घरातील थोरांच्या मतांचा आदर करावा. आपले विचार प्रभावीपणे मांडावेत. घेतलेल्या मेहनतीचे फळ मिळेल. मनातील चिंता दूर होतील.

वृश्चिक:- पराक्रमात वाढ होईल. आत्मविश्वासाने कामे पूर्ण कराल. सहकार्‍यांशी असणारे संबंध सुधारतील. भावंडांना मदत कराल. अति उत्साहात नसते उद्योग करू नका.

धनू:- कौटुंबिक कामात सक्रिय सहभाग घ्याल. घाईने कोणतेही काम करायला जाऊ नका. दिवस आनंदात जाईल. बोलण्यात माधुर्य राखाल. चांगला आर्थिक लाभ संभवतो.

मकर:- कौटुंबिक जीवनात सौख्य लाभेल. नवीन विचारांना चालना द्यावी. जोडीदारासोबत मन मोकळ्या गप्पा होतील. जुन्या मित्रांच्या भेटीने मन प्रसन्न होईल. भविष्याची चिंता करत बसू नका.

कुंभ:- काही खर्च अचानक सामोरे येतील. आपल्या मतावर ठाम राहावे. आध्यात्मिक कार्यात सहभाग घ्याल. कोर्ट कचेरीची कामे वेळ घेतील. मानसिक व्यग्रता टाळण्याचा प्रयत्न करावा.

मीन:- कौशल्याने वागाल. व्यापार्‍यांना उत्पन्नात वाढ होईल. नवीन खरेदी करता येईल. जुने सहकारी भेटतील. मोठ्या भावंडांची मदत होईल.

(ज्योतिषी विद्याधर करंदीकर )