• मेष :
    स्थावरचे प्रश्न सोडवावे लागतील.
    घरगुती प्रश्न संयमाने सोडवावा.
    शांततेचे धोरण ठेवावे.
    वाहन चालवताना काळजी घ्यावी.
    कामात काही बदल करावे लागतील.
  • वृषभ :
    भावंडांचे प्रश्न सोडवाल.
    नवीन जबाबदारी हाती घ्याल.
    महत्त्वाकांक्षा वाढीस लागेल.
    किरकोळ दुखापतींपासून स्वत:ची काळजी घ्यावी, धैर्य वाढेल.
  • मिथुन :
    अनपेक्षित जबाबदारी येवू शकते.
    खर्च करताना मागचा-पुढचा विचार करावा.
    आर्थिक नियोजन करावे.
    उष्णतेचे किरकोळ त्रास जाणवू शकतात.
    रागावर नियंत्रण ठेवावे.
  • कर्क :
    काही कामे उडकून राहू शकतात.
    दृढनिश्चय व हट्टीपणा यातील फरक लक्षात घेवून वागावे.
    रागावर नियंत्रण ठेवावे.
    फार चिंता करु नये.
    पित्तविकाराचा त्रास जाणवू शकतो.
  • सिंह :
    वादविवादामुळे मानसिक स्वास्थ्य नष्ट होणार नाही याकडे लक्ष द्यावे.
    निराश होवू नये.
    कर्ज प्रकरणे पुढे ढकलावीत.
    लहान मुलांमध्ये रमून जाल.
    नवीन मित्र जोडाल.
  • कन्या :
    मौल्यवान वस्तू खरेदी कराल.
    मैत्रीतील दुरावा टाळावा.
    कामातून अपेक्षित लाभ होईल.
    जमीनीची कामे पार पडतील.
    स्त्री समूहात वावराल.
  • तुळ :
    दिवसभर कामाची लगबग राहील.
    विरोधकांवर लक्ष ठेवावे.
    आपली प्रतिष्ठा जपण्याचा प्रयत्न करावा.
    घेतलेल्या कष्टाचे चीज होईल.
    वादात अडकू नका.
  • वृश्चिक :
    कामात अडथळ्यातून मार्ग काढावा लागेल.
    प्रवासात काळजी घ्यावी.
    मोठ्या व्यक्तींच्या मताचा विचार करावा.
    सेवेचे व्रत अंगीकारावे.
    मानापमानाचे प्रसंग टाळावेत.
  • धनु :
    वैवाहिक सौख्य जपावे.
    जोडीदाराचे विचार समजून घ्या.
    उष्णतेचे विकार जाणवतील.
    शारीरिक कष्ट वाढू शकतात.
    अचानक लाभाची शक्यता.
  • मकर :
    जोडीदाराला चांगला लाभ होईल.
    पत्नीशी क्षुल्लक कारणांवरुन होणारे वादविवाद फार ताणू नयेत.
    पोटाची काळजी घ्यावी.
    भागादाराशी जुळवून घ्यावे.
    फार चिंता करू नये.
  • कुंभ :
    भाजणे, कापणे यांसारखे त्रास जाणवू शकतात.
    जिद्दीने कामे पार पाडाल. कामातून समाधान लाभेल.
    जवळचे नातेवाईक भेटतील.
    तुमचा मान वाढेल.
  • मीन :
    आपले विचार शांतपणे मांडाल.
    काही गोष्टींमध्ये विरोध समोर येवू शकतो.
    ऐनवेळी येणारे त्रास सोडवावे लागतील.
    चैनीची वृत्ती वाढू शकते.
    उपासनेत प्रगती कराल.– ज्योतिषी विद्याधर करंदीकर

Story img Loader