- मेष:-
बैठ्या खेळात रमून जाल. चांगला आर्थिक लाभ संभवतो. गृहसौख्यात रमाल. घराची साफसफाई काढाल. हातातील कामात चिकाटी ठेवावी. - वृषभ:-
सर्वांशी प्रेमळपणे वागाल. जवळचा प्रवास मजेत होईल. वादविवादात यश येईल. महत्वाची कामे पार पाडाल. चिंतन-मनन कराल. - मिथुन:-
सफाईदारपणे सर्वांशी बोलाल. गायन कलेला उठाव मिळेल. फसवणुकीपासून सावध राहावे. नातेवाईकांची मदत मिळेल. खर्चाचे गणित नव्याने मांडावे. - कर्क:-
बोलतांना माधुर्याचा वापर कराल. कामाचा उत्साह वाढेल. तिखट पदार्थ खाण्याची हौस भागवाल. गप्पांमध्ये रमाल. अतिश्रमामुळे थकवा जाणवेल. - सिंह:-
कामाचा उत्साह वाढेल. पित्ताचा त्रास जाणवू शकतो. जोमाने कामे हाती घ्याल. खर्च करतांना विचार करावा. स्वतंत्रवृत्ती दर्शवाल.
कन्या:-
आशावादी दृष्टीकोन ठेवाल. वाचनाची आवड पूर्ण कराल. घरात तुमचे प्रभुत्व राहील. भावंडाना मदत कराल. स्वकष्टावर भर द्याल. - तुळ:-
चांगला व्यावसायीक लाभ संभवतो. सांपत्तिक स्थिती सुधारेल. व्यापारीवर्ग खुश असेल. गुंतवणुकीचा उत्तम पर्याय शोधाल. घरात मंगळ कार्य होईल. - वृश्चिक:-
कामात अपेक्षित बदल कराल. नोकरदारांना बदलीचे योग येतील. वरिष्ठांशी जुळवून घ्यावे. धार्मिक स्थळांना भेट द्याल. आध्यात्मिक प्रगती कराल. - धनु:-
खर्चावर नियंत्रण ठेवावे. कामानिमित्त घरापासून दूर राहावे लागेल. प्रापंचिक अडचणी दूर कराल. चोरांपासून सावध राहावे. मुलांचे प्रश्न समजून घ्यावेत. - मकर:-
गुरुजनांचा आशिर्वाद मिळेल. मोठ्या लोकांच्या ओळखी होतील. पैशाची अडचण दूर होईल. कामात स्त्रीवर्गाची मदत घ्याल. समाजप्रियता वाढेल. - कुंभ:-
योग्य संधीची वाट पहावी. वडिलधाऱ्यांचे मत जाणून घ्यावे. व्यावसायीक चिंता मिटेल. घरातून चांगली मदत मिळेल. घरगुती वातावरणात रमाल. - मीन:-
कर्तुत्वाला चांगला वाव मिळेल. हातून उत्तम लिखाण होईल. नावलौकिक वाढेल. बौद्धिक क्षेत्रात प्रगती कराल. सामाजिक कामात सहभाग घ्याल.– ज्योतिषी विद्याधर करंदीकर
आणखी वाचा