- मेष:-
प्रवासाचा आनंद घ्याल. भावंडांचा प्रेमळ सहवास लाभेल. मानसिक चांचल्य जाणवेल. चित्त एकाग्र करावे. विविध विषयांमध्ये रुची दाखवाल. - वृषभ:-
घरगुती कामात अडकून पडाल. फार विचार करण्यात वेळ वाया घालवू नका. आवडत्या गोष्टी करण्यावर भर द्यावा. व्यापारी वर्ग खुश राहील. हौसेला महत्त्व द्याल. - मिथुन:-
एकावेळी अनेक कामे अंगावर घेऊ नका. मुलांच्या कारवायांवर लक्ष द्यावे. कामात घाई करू चालणार नाही. काही गोष्टी अचानक सामोऱ्या येतील. महिलांनी आरोग्याची काळजी घ्यावी. - कर्क:-
भावनेच्या आहारी जाऊ नका. अतिविचार करत बसू नका. उधारीची कामे करू नका. वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवावे. घराची कामे काही काळासाठी पुढे ढकलावीत. - सिंह:-
फसव्या लोकांपासून दूर राहावे. इच्छा पूर्ण करण्यासाठी अडून बसू नका. जवळच्या प्रवासात संपूर्ण सतर्कता ठेवावी. अधिकाराचा यथायोग्य वापर करावा. मुलांचा चंचलपणा समजून घ्यावा. - कन्या:-
घेतलेल्या श्रमाचे चीज होईल. व्यवसायात चांगला आर्थिक लाभ होईल. मनातील आकांक्षा पूर्ण होईल. कामाची धांदल उडेल. कामात एकसूत्रता ठेवावी. - तूळ:-
व्यवसायात प्रगती करता येईल. परोपकाराची जाणीव ठेवाल. धार्मिक कामात हातभार लावाल. वरिष्ठ तुमच्यावर खुश होतील. सामाजिक वजन वाढेल. - वृश्चिक:-
काही गोष्टींची कमतरता जाणवेल. संयम बाळगावा लागेल. सैरभैर होण्याची गरज नाही. योग्य वेळेची वाट पाहावी. ध्यानधारणा करावी लागेल. - धनु:-
जोडीदाराविषयी चटकन मत बनवू नये. पत्नीचे लाडिक हट्ट पुरवाल. वैवाहिक सौख्यकडे लक्ष द्यावे. प्रगल्भ विचार मांडाल. अकारण चिंता करत बसू नका. - मकर:-
गैरसमजातून वितुष्ट निर्माण होऊ शकते. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी. कफाचा त्रास होण्याची शक्यता आहे. मानसिक व्यग्रता जाणवेल. कामाच्या ठिकाणी घाई करू नका. - कुंभ:-
मुलांशी मतभेद संभवतात. शैक्षणिक कामात अडथळे येऊ शकतात. करमणूक प्रधान गोष्टींकडे लक्ष राहील. रेस, जुगार यातून लाभ संभवतो. वरिष्ठांची मर्जी राखावी लागेल. - मीन:-
घरातील वातावरण हसते-खेळते असेल. एकाचवेळी कामाची गडबड उडेल. बागकामाची आवड पूर्ण कराल. घाईगडबडीत कामे उरकू नका. जोडीदाराला समजून घ्या.– ज्योतिषी विद्याधर करंदीकर
आजचे राशीभविष्य, शुक्रवार, १३ डिसेंबर २०१९
सर्व बारा राशींचे भविष्य
Written by लोकसत्ता ऑनलाइन

First published on: 13-12-2019 at 00:04 IST
मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daily horoscope astrology in marathi friday 13 december 2019 aau