1. मेष:-
    प्रेमभावना वाढीस लागेल. भागिदारीतून चांगला लाभ संभवतो. व्यापार विस्ताराचा विचार कराल. आपले महत्व इतरांना पट‍वून द्याल. जोडीदाराची उत्तम साथ लाभेल.
  2. वृषभ:-
    मनातील आकांक्षा पूर्ण होतील. स्त्रीवर्गाशी मैत्री कराल. तुमच्यातील शालीनता दिसून येईल. चारचौघात तुमचे कौतुक होईल. आर्थिक दर्जा सुधारण्याचा प्रयत्न कराल.
  3. मिथुन:-
    औद्योगिक वातावरण चांगले राहील. बोलण्यातून इतरांची मने जिंकून घ्याल. सजावटीच्या वस्तू खरेदी कराल. सहृदयतेने वागणे ठेवाल. मित्रांच्या ओळखीने कामे केली जातील.
  4. कर्क:-
    मनाची विशालता दाखवाल. धार्मिकस्थळांना भेटी द्याल. कलेला पोषक वातावरण मिळेल. मुलांकडून आनंदाच्या बातम्या मिळतील. वाचनाची आवड जोपासाल.
  5. सिंह:-
    जवळच्या सहलीचा आनंद घ्याल. मित्रमंडळी जमवाल. रेस, सट्टा यांतून लाभ होईल. सासुरवाडीची मदत मिळेल. काही कामे कमी श्रमात पार पडतील.
  6. कन्या:-
    उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल. आवडी-निवडीवर भर द्याल. एकमेकांची बाजू उत्तमरीत्या समजून घ्याल. पत्नीच्या शांत स्वभावाची जाणीव होईल. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल.
  7. तूळ:-
    लोकोपवादाकडे दुर्लक्ष करावे. आळशीपणा करू नका. हाताखालील नोकरांचे सहकार्य लाभेल. ऐषारामाच्या गोष्टींची आवड निर्माण होईल. व्यसनाच्या आहारी जाऊ नका.
  8. वृश्चिक:-
    मैत्रीचे संबंध अधिक घट्ट होतील. मित्र परिवारात भर पडेल. आधुनिक विचार मांडाल. हातून चांगले लिखाण होईल. मनमोकळ्या गप्पा मारता येतील.
  9. धनु:-
    मानसिक समाधान लाभेल. मदत करण्याचा आनंद कमवाल. घरात टापटीपपणा ठेवाल. उत्तम वाहन सौख्य लाभेल. नवीन वाहन खरेदीचा विचार कराल.
  10. मकर:-
    भावंडांचे उत्तम सौख्य लाभेल. प्रवासाची हौस पूर्ण करता येईल. चांगली कल्पनाशक्ती लाभेल. इतरांच्या आनंदात आनंद मानाल. निसर्गाच्या सहवासात रमून जाल.
  11. कुंभ:-
    कामाचा व्याप वाढू शकतो. गप्पा-गोष्टींमध्ये वेळ जाईल. आवडत्या वस्तू खरेदी कराल. एकलकोंडेपणा बाजूला ठेवावा. गुरूजनांचा सहवास लाभेल.
  12. मीन:-
    मानसिक चंचलता जाणवेल. अचानक धनलाभ संभवतो. सर्वांशी आपलेपणाने वागाल. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. चैनीकडे कल राहील.

    – ज्योतिषी विद्याधर करंदीकर

Story img Loader