• मेष:-
    वडीलधाऱ्यांच्या आज्ञेचे पालन कराल. जमिनीच्या व्यवहारातून फायदा संभवतो. शेतमालातून चांगले उत्पन्न मिळेल. व्यवसायात नवीन शिकायला मिळेल. आत्मविश्वास वाढेल.
  • वृषभ:-
    पुढारीपणाचा मान मिळेल. बुद्धीकौशल्यावर कामे कराल. भावंडांची मदत होईल. कामातील बदल अनुकूल ठरेल. प्रवासाची मजा घ्याल.
  • मिथुन:-
    घरातील कामात सढळ हाताने मदत कराल. खाण्यापिण्याची चंगळ होईल. योग्य कामासाठी खर्च कराल. घरगुती वातावरणात रममाण व्हाल. आवडीच्या गोष्टी मिळतील.
  • कर्क:-
    कलेत यश मिळेल. ध्यानधारणा कराल. मानसिक दुर्बलता टाळावी लागेल. हौस पूर्ण करण्यावर भर द्याल. गप्पांमध्ये रमून जाल.
  • सिंह:-
    करमणुकीवर खर्च कराल. प्रवासात दिवस जाईल. वादविवादात अडकू नका. रागराग करू नका. संयमाची जोड घ्यावी.
  • कन्या:-
    इतरांशी स्पर्धा कराल. जमिनीच्या व्यवहारात फायदा होईल. समाजविरोधी कामात अडकू नये. भांडणात अडकू नका. मोठ्या व्यक्ती भेटतील.
  • तुळ:-
    कामाचा वेळ इतरत्र वाया जाणार नाही याची काळजी घ्यावी. सरकारी कामात अडकून पडाल. कलेकडे अधिक लक्ष द्यावे. लेखनाला उठाव मिळेल. स्थावरची कामे निघतील.
  • वृश्चिक:-
    कामाला जोम येईल. आध्यात्मिक विचार मांडाल. काही बदलांना सामोरे जाल. आनंदी दृष्टीकोन ठेवाल. मदत करतांना मागेपुढे पाहणार नाही.
  • धनु:-
    भावंडांशी जुळवून घ्यावे. लिखाणाला बळ लाभेल. कमिशन मधून पैसा मिळेल. चिकाटी सोडून चालणार नाही. सर्वदूर विचार करावा.
  • मकर:-
    कामात पत्नीची साथ लाभेल. कौटुंबिक वातावरणात रमाल. वैवाहिक सौख्य जपावे. ओळखीचा फायदा करू घ्यावा. व्यवहारी दृष्टीकोन ठेवाल.
  • कुंभ:-
    जोडीदाराशी खटके उडणार नाहीत याची काळजी घ्यावी. पाठीचे त्रास संभवतात. सामाजिक भान ठेवावे. कामानिमित्त प्रवास करावा लागेल. रागावर नियंत्रण ठेवून वागावे.
  • मीन:-
    मुलांच्या कारवायांकडे लक्ष द्यावे. स्वतंत्र मतावर भर द्याल. हट्टीपणा कमी करावा लागेल. मुलांचे प्रश्न समजून घ्यावेत. खेळात रमून जाल.– ज्योतिषी विद्याधर करंदीकर
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daily horoscope astrology in marathi friday 16 august 2019 aau