मेष

आज चंद्राचे भ्रमण कर्क राशीतून जाणार आहे. हे भ्रमण मेष राशीला कौटुंबिक सौख्य प्रदान करणारे ठरेल. कुटुंबासमवेत चांगला वेळ जाईल. कुलस्वामिनीच्या दर्शनाने दिवसाची सुरुवात करावी. महिलांनी घरामध्ये देवी कवचाचे पाठ करावे.
आजचा रंग- फिकट हिरवा

वृषभ

आज सकाळपासूनच कर्क राशीमध्ये चंद्राचे भ्रमण असणार आहे. आज पूर्ण दिवस आनंदी आणि उत्साही असेल. मित्र मंडळी, आप्तस्वकीयांची भेट होऊ शकते. भावंडाच्या सुवार्तेमुळे दिवस आनंदी जाईल. गणपती मंदिरामध्ये लाल, तांबडी फुले अर्पण करावी.
आजचा रंग- गुलाबी

मिथुन

आज संकष्टी चतुर्थी आहे. मिथुन राशीला या दिवसाचा खूप चांगला आर्थिक फायदा होईल. जुन्या देण्यांची वसुली होईल. नव्या आर्थिक कामांचे नियोजन करण्यासाठी दिवस चांगला आहे. गणपती मंदिरामध्ये हिरवे धान्य अर्पण करावे.
आजचा रंग- पोपटी

कर्क

संकष्टी चतुर्थीमुळे सकाळपासून चंद्राचे भ्रमण राहणार आहे. तरीदेखील कर्क राशीच्या व्यक्तींनी सावध राहावे. गणपती अथर्वशीर्षाचे पाठ करावेत.
आजचा रंग- पोपटी

सिंह

आज कुठल्याही नवीन कामांची सुरुवात करू नये. जुन्या कामांचा पाठपुरावा करावा. आलेला दिवस शांत चित्ताने घालवावा. कुलदैवताचे दर्शन करावे.
आजचा रंग- पिवळा

कन्या

आज कदाचित जुने लाभ मिळतील. पुर्वी केलेल्या कामांचे चांगले फळ मिळू शकते. वरिष्ठांशी सलोखा ठेवावा. कुलस्वामिनीचे दर्शन घ्यावे.
आजचा रंग- नारंगी

तुळ

घरातील वातावरण आनंदी ठेवू शकाल. अधिकाऱ्यांशी सुसंवाद राहील. ओम श्री नमः या मंत्राचा जप करावा.
आजचा रंग- निळा

वृश्चिक

आजचा दिवस वृश्चिक राशीसाठी मोठ्या संधी निर्माण करणारा असेल. सरकारी, कायदेशीर गोष्टींचा पाठपुरावा करावा. आज केलेल्या पाठपुराव्यांचे भविष्यात चांगले फळ मिळेल. कुलस्वामिनीचे दर्शन घ्यावे आणि उपवास करावा.
आजचा रंग – हिरवा

धनु

संमिश्र प्रतिसादाचा दिवस. लोकांचा अंदाज घेऊन मत प्रदर्शन करावे. मोठे निर्णय घेताना सल्ला मसलत करावी. महिलांनी आजाराकडे दुर्लक्ष करू नये. सकाळी आणि संध्याकाळी लक्ष्मी अष्टकाचे पाठ करावेत.
आजचा रंग पांढरा

मकर

व्यावसायिक दृष्टीने चांगला दिवस आहे. आर्थिक नियोजन करावे. कुटुंबासमवेत चांगला वेळ घालवू शकाल. ग्रामदैवतेला धान्य आणि फुले अर्पण करावी.
आजचा रंग- पोपटी

कुंभ

आठवड्याच्या सुरुवातीपासून असलेली घोडदौड मंदावणारा दिवस आहे. व्यवसायातील, नोकरीतील सगळ्यांची मते जाणून घेऊन दिवस मार्गी लावावा. लक्ष्मी अष्टकाचे पाठ करावेत.
आजचा रंग- मोरपंखी

मीन

आज मीन राशीच्या व्यक्तींना संमिश्र पण प्रगतीकारक ग्रहदशा आहे. अधिकारी व्यक्तींना मोठ्या निर्णयाला सामोरे जावे लागण्याचा प्रसंग येऊ शकतो. कुलस्वामिनी मंदिरात पांढऱ्या फुलांचा गजरा अर्पण करणे.

– डॉ. योगेश मुळे
Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu

Story img Loader