- मेष:-
कामातून समाधान शोधाल. जवळचे नातेवाईक भेटतील. प्रेमविवाहात सबुरीने घ्यावे. वारसाहक्काची कामे निघतील. जुनी येणी वसूल होतील. - वृषभ:-
प्रवासातील अडचणी दूर कराव्यात. घरासाठी दगदग वाढेल. सकारात्मक विचारांनी वाटचाल करावी. मोठ्या लोकांची गाठ पडेल. अंगीभूत कला सादर करता येईल. - मिथुन:-
आशावादी दृष्टिकोन ठेवावा. मनातील चुकीचे विचार काढून टाकावेत. परोपकाराची जाणीव ठेवाल. मनात नसते मांडे रचू नका. घरात नातेवाईक गोळा होतील. - कर्क:-
प्रेमात फसवणुकीची शक्यता. वरिष्ठांच्या जास्त पुढे करू नका. धोरणीपणाने वागाल. नातेवाईकांकडून विरोध होवू शकतो. प्रलोभनात वाहवत जाऊ नये. - सिंह:-
आवडीचे पदार्थ चाखाल. मुलांना योग्य प्रशिक्षण घेता येईल. अकारण ताणतणावाला बळी पडू नका. आरोग्यात सुधारणा होईल. जबाबदारीत वाढ होईल. - कन्या:-
आवडत्या गोष्टी करण्यावर भर द्याल. दिवस मनाजोगा व्यतीत कराल. नियमांचे काटेकोर पालन करावे. वाहनांवरील वेग नियंत्रित ठेवावा. हाताखालील लोकांचे प्रश्न नीट हाताळावेत. - तूळ:-
घरातील कुरबुरी दूर कराव्यात. जोडीदाराची प्रगती होईल. स्थावर संबंधीचे प्रश्न सोडवावेत. आधुनिक विचारांची जोड घ्यावी. सरकारी योजनेचा लाभ घ्यावा. - वृश्चिक:-
आततायीपणे वागू नये. क्षुल्लक गोष्टी फार मनावर घेऊ नयेत. आत्मविश्वासाने वाटचाल करता येईल. रखडलेली कामे उरकून घ्यावीत. कौटुंबिक बाबतीत दिलासा मिळेल. - धनू:-
आर्थिक व्यवहार सबुरीने करावेत. नवीन दृष्टिकोन ठेवावा. सामाजिक बाबीत फार लक्ष घालू नका. सहलीचे आयोजन कराल. लोकोपयोगी कामे कराल. - मकर:-
मानसिक त्रास काहीसा वाढू शकतो. कामाच्या वेळा सांभाळाव्यात. गप्पागोष्टींमध्ये वेळ घालवाल. चित्त चांचल्य जाणवेल. अडथळ्यातून मार्ग काढाल. - कुंभ:-
झोपेची तक्रार जाणवेल. खर्चाचे प्रमाण वाढू शकते. मनात उगाचच चिंता लागून राहील. कल्पनाशक्तीला चांगला वाव मिळेल. निराशा दूर सारावी. - मीन:-
अधिकारी व्यक्तींची गाठ पडेल. थोरांच्या सहवासात लाभेल. काही गोष्टी लपविण्याकडे कल राहील. व्यावसायिक वाढीचा विचार करावा. कामाच्या ठिकाणी मान वाढेल.– ज्योतिषी विद्याधर करंदीकर
आजचे राशीभविष्य, शुक्रवार, १७ जानेवारी २०२०
सर्व बारा राशींचे भविष्य
Written by लोकसत्ता ऑनलाइन
![आजचे राशीभविष्य, शुक्रवार, १७ जानेवारी २०२०](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2020/01/Astro-2.jpg?w=1024)
First published on: 17-01-2020 at 01:00 IST
मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daily horoscope astrology in marathi friday 17 january 2020 aau